आयपीएल नावाची सर्कस - द ग्रेटेस्ट रिअ‍ॅलिटी शो ईन ईंडिया

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 October, 2020 - 14:07

जे ईटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्वचितच घडते ते सारे काही अदभुत या आयपीएलमध्ये वारंवार लगातार घडत राहते.

ईथे एकावेळी भन्नाट कॅचेस पकडल्या जातात तर त्याच वेळी हलवा कॅचेस सोडल्या जातात.

ईथे सामन्याची पहिली ओवर स्पिनरला दिली जाते तर अखेरची ओवरही स्पिनरला दिली जाते.

ईथे सामना अटीतटीचा चालू असताना अचानक छातीवरचे नो बॉल टाकले जातात, तर कधी पाय फूटभर पुढे टाकून नो बॉल दिला जातो.

त्या फ्री हिटपासून मग शॉर्ट वाईड फुलटॉस यांची जी खैरात सुरू होते ते सामन्याचा नूर पलटवूनच थांबते.

ईथे चार ओवरमध्ये ८० धावा हव्या असताना सामना सुपरओवरम्ध्ये जातो

ईथे तीन ओवरमध्ये ११ धावा हव्या असताना आणि सेट बेटसमन खेळत असतानाही सामना सुपरओवरमध्ये जातो

ईथे सुपरओवरही सुपरओवरमध्ये जाते Happy

ईथे एका दिवशी दोन सामन्यात तीन सुपरओवर होतात.

आणि मग स्पर्धा निम्यावर येताच अचानक वरचे संघ हरायला लागतात आणि खालचे संघ जिंकायला लागतात.

गुण तालिकेत टॉपला असणारी दिल्ली सलग चार सामने हरते

तर तळाला असणारी पंजाब सलग पाच सामने जिंकते. त्यानंतर एक सामना हरते तो देखील तळाच्या राजस्थानशी हरते आणि त्यांचेही स्पर्धेतील आव्हान कायम ठेवते.

आज हॅलोवीनच्या शुभमुहुर्तावर पुन्हा दिल्ली हरली, आज पुन्हा बेंगलोरही हरली,

नुसती हरली नाही तर रनरेटच्या मोठ्या फरकानेही हरली

आणि त्यामुळे आता प्रत्येकाचा प्रत्येकी केवळ एक सामना शिल्लक असताना स्पर्धा अगदी रोचक रंगतदार स्थितीत आलीय की कोणीही आत येऊ शकते, कोणीही बाहेर जाऊ शकते अशी झाली आहे.

जणू हे आयपीएल म्हणजे एका गोंडस लहान मुलाने काढलेले एक सुंदर चित्र आहे ज्यात त्याने आपल्या मनाप्रमाणे आपल्याला हवेहवेसे वाटणारे रंग भरलेत.

झाडांना सोनेरी, सुर्याला चंदेरी, घराला गुलाबी, नदीला पर्पल, आणि त्यात छान छान हिरवे हिरवे मासे, ज्यांचे पिवळे पिवळे डोळे !!

वास्तवाशी जरी हे चित्र मेळ खाणारे नसले तरी बघायला छान वाटते ना……

मग बघायचे Happy

- कवी ऋन्मेष !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्ली आणि बंगलोर ज्यांनी कधीही आयपील जिकंली नाही ते स्वतः सलग मॅच मध्ये हार पत्करुन फायनल ला जाण्याचे चान्सेस कमी करतेय पहिल्या दोन मध्ये न येता माञ मुंबई 1 नंबर ला राहणार. आयपील काय फक्त मुंबई जिकांवी म्हणून बनवली आहे की मुंबई टाॅप 2 मध्ये ठेवले आहे. त्यांना का सांगत नाहीये की कोणी की तुम्ही पण हारत चला म्हणजे अजुन रोमांचक होईल स्पर्धा.

एकाचा फायदा हे दुसर्या चं नुकसान हे साधं गणित आहे म्हणजे काही संघ फक्त हरायला च खेळता. कोणीतरी सांगा आम्ही हरणार मग स्पर्धा रंगतदार करु ?

सर्वात महत्वाचे की असेल ही सर्कस पण तिची पण मजा घ्या की. सर्कस चा जोकरपण ठरवुन हसवतात आणि माहिती असुनही लोक आनंद घेताच की.

चित्रपट पण बघताच ना तुम्ही माहित असतं की खोटं खोटं आहे. एवढेच कशाला पहिल्या दिवशी चित्रपटाची कथा माहीत होते तरीही लोक बघतातच ना महिना भर तिकीट काढून.

फिक्स नाही च्रप्स
स्क्रिप्टेड ! Happy

आणि सध्या ड्रीम ईलेव्हन नावाचा जो जुगार चालू झालाय.
तो लवकरच येत्या काळात ईतका त्रासदायक होणार आहे की पिढी बरबाद करणार आहे ...

हरचंद ओके. लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन.

प्रविण, मुंबई जिंकलेली आवडते बघायला बहुतांश लोकांना. आणि ती अंबानीची टीम आहे. ती हरून स्पर्धा रंगतदार नाही होणार. मी सुद्धा मुंबई सपोर्टर आहे. मलाही मुंबई जिंकल्यावरच जास्त आनंद होतो Happy

हो मजा असतेच, कारण सारेच काही ठरलेले नसते. फक्त भावनिक होताना दुसरी बाजूही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे ईतकेच.

कालच्या निकालानंतर याला बळकटीही मिळाली.
दिल्ली आणि बेंगलोर हे सुरुवातीचे वरचे संघच त्या दोन आणि तीन नंबरवर क्वालिफाय झाले. पण मधल्या काळात जे डाऊन होत त्यांनी पॉईंटटेबलमध्ये रंगतदार स्थिती केली त्यानेच मजा आणली Happy

दहा!

१३!