सोसायटी मेंटेनन्स बिलिंगविषयी

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 25 October, 2020 - 14:09

मी राहत असलेल्या रहिवासी सोसायटीचे दरमहा मेंटेनन्स बिल्स (प्रत्येक सदनिकाधारकाला देण्यासाठी) बाहेरून एका व्यक्तीकडून तयार करून घेतले जाते. तेव्हा माझ्या मनात असे आले की, आपल्या सोसायटीचे मेंटेनन्स बिल्स आपणच बनवावे, म्हणजे सोसायटीचे थोडेफार पैसे वाचतील आणि आपल्या सोसायटीचे काम नीट जमू लागले की मग आजूबाजूच्या इतर सोसायट्यांचेही काम घ्यावे, म्हणजे अधिकचे चार पैसे कमावता येतील.

तर या कामाविषयी थोडी माहिती हवी आहे.

१. अशा प्रकारच्या सेवेला काय संबोधले जाते? म्हणजे जर उद्या मला जाहिरात करायची असेल तर नेमकी काय service देत आहोत असे जाहिरातीत द्यायचे??

२. सोसायटी मेंटेनन्स बिलिंगसाठी कोणते software वापरले जाते? Tally की अन्य कोणते? (मायबोलीकरांपैकी वा त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणी हे काम करत / केले आहे का?)

३. Tally शिकण्यासाठी commerce graduate असणे आवश्यक आहे का? Commerce चे कितपत ज्ञान आवश्यक आहे? (माझे शिक्षण विज्ञान शाखेतून झाले आहे.)

४. अशा प्रकारच्या बिलिंगसाठी Dot Matrix Printer (कर्रकर्र आवाज करणारा) आवश्यक आहे की (उपलब्ध असलेल्या) laser printer च्या साहाय्याने देखील bill printout काढू शकतो???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही ही अकाउंट्सची कामं घेणार आहात तर डीटेल बिल बनवून द्यावे लागते.
१) वीस पंचवीस मेंबरांची बिलं काढणे - हे संगणक न वापरता लेजरमध्ये करता येते.

२) ५० - २०० सभासदांची बिलं काढणे - यासाठी संगणक, सॉफ्टवेर उपयोगी पडेल.

ट्रेजररशी संपर्कात राहावे लागेल किंवा तुमच्या सोसायटीत तुम्ही ट्रेजरर असाल. कारण या महिन्याच्या बिलाची रक्कम अधिक/ वजा थकबाकी आणि टोटल असे बिल बनवता येते.
-------------------
बिलामध्ये काय वर्गवारी अपेक्षित आहे

पुढे अकाउंट्स लिहून balance sheet करताना बिलामध्ये या गोष्टी वेगळ्या दिसाव्या लागतात.
१) म्यु tax
२) सिंकिंग फंड
३) मेंटेंनन्स फिक्स्ट चार्जेस - इलेक्ट्रीसिटी, वॉचमन, लिफ्ट इत्यादी सर्वांना लागू असलेली रक्कम.
४) फंड वर्गणी असल्यास - पेंटिंग आणि रिपेर फंडासाठी काही रक्कम ठरवली असल्यास.
५) पार्किंग चार्जेस असल्यास
६) एन ओ सी चार्जेस असल्यास
७) इतर काही नैमित्तिक असल्यास ( पुजा वर्गणी वगैरे)
- क्र (१) ते (६) याची बेरीज ही या महिन्याच्या बिलाची रक्कम
------------
८) अधिक/ उणे थकबाकी
--------------
९) अधिक मागील बिले वेळेत न भरल्याने लागलेली पेनल्टी
---------------
अधिक थकबाकी वर लागणारे व्याज @21%

__________________________________________
क्र (८) आणि (९) साठी ट्रेजररशी संपर्क करावा लागेल. कुणी बिले भरली केव्हा इत्यादी.
आता हेच लेजरमध्ये करायचे का संगणक सॉफ्टवेरने ते पाहा. Excel वगैरे तुम्ही स्वत: बनवून प्रिंटाउट काढू शकता.
________________________
आणि तुम्ही ट्रायल बँलन्सही म्याच करून दिलात तर नंबर वन काम.

अपार्टमेंट अड्डा वर फक्त महिन्याचे बिल आणि इतर खूप काही ट्रॅक करता येते. सोसायटीच्या सभासद संख्येवर त्यांची फी असते. सोसायटीचे लेजर सांभाळणे तसे वेळखाऊ होऊ शकते कारण लेट पेमेंट आणि चार्जेस वरून काही सभासद खूप वाद घालतात आणि मग सोसायटीचे खजिनदार आणि सेक्रेटरी तुम्हाला बदल करायला सांगू शकतात. हा कामाचा भाग आहे पण दर महिन्याला त्रासदायक होऊ शकतो.