मदत हवी आहे 

Submitted by kalyanib on 21 October, 2020 - 05:37

सगळ्यात आधी सांगायचे म्हणजे मी इथे जो मुद्दा/प्रश्न मांडते आहे तो १००% खरा आहे. धाग्यावरती रिप्लाय वाढावेत किंवा बाकी काहीही हेतू नाही. आता सरळ मुद्याला येते. गेली १५ वर्षे हे नेहमीच घडत आलेले आहे आणि आता त्यामुळे डिप्रेशन,चिडचिड, वाढत जातंय. आमच्या कडे म्हणजे (होणाऱ्या सासरच्या घरी ) एकही काम मार्गी लागत नाही. सासरे नाही आहेत सासू, नवरा (होणारा) आणि त्याचा मोठा भाऊ घरी असतात. सगळे उच्च शिक्षित आहेत. बिझनेस करण्याकरीता सगळे करून झाले. मेहनत, खरेपणा हेच आता भोवती आहे असे वाटते आहे. सासरचे नाव आमच्या शहरात प्रसिद्ध आहे राजकारणात आहेत सगळेजण. सासू ला पटले नाही म्हणून लहानपणिच वेगळे झाले. त्या आडनावाचा reference  सुद्धा हे लोक वापरात नाही  जेंव्हा कि तसे वापरले तर एकही काम नाही होणार असे राहणारच नाही . पण सज्जन असून सुद्धा एकही काम बरोबर हवे तसे होत नाही. शेवटच्या क्षणी कुठे माशी शिंकते देव जाणे. बरं  देवाचे सुद्धा करतात. जी लोकं  खोटी काम करीत आहे ते पुढे चालले आहे आणि आम्ही मात्र जिथे आहे तिथेच. काय करावे हे नं समजून आता शेवटचा पर्याय म्हणून लिहिते आहे. 

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाकी सांगू शकते कि आम्हाला रिलेशन मध्ये असून आता १५ वर्ष होतील. आणि तसे आम्ही लहान पण पासून एकमेकांना ओळखतो. नौकरी सुरूच आहे. फक्त बिझनेस च काहीच होत नाही. VB तुम्हाला असे वाटणे साहजिक आहे पण सत्यता सांगितली मी. 

श्रवु आणि वीरू तुमचे प्रतिसाद वाचले. वेगळा होणं शक्य नाही. हे प्रॉब्लेम संपताच नाही आहेत म्हणून समजत नाही आहे काहीच 

मी माझी समस्या सांगितली, कि काम होत नाही आहेत अगदी लहान लहान सुद्धा. त्याला पण १५ वर्षाचा कालावधी गेला. हे असे का घडत असावे हे न समजून तुम्हाला येथे विचारते आहे. मी वयाने, अधिकाराने, विचाराने तुम्हा लोकं पेक्षा कमीच असेल म्हणून जे वाटले ते लिहिले. सत्यता पटवून सांगू शकत नाही. तुम्हाला/कोणाला वाटले तरच काही उपाय सांगा. कोणी म्हणत आहे पूर्वजांचा त्रास आहे, कोणी म्हणता करानीच केली. खरे  काय करावे? कोणत्या देवाची/देवीची आराधना करू?

माझे सासरचे लोक एवढे चांगले आहेत कि स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला नसेल. त्यांना या संकटात सोडून देऊन नवीन पर्याय बघणे म्हणजे अशक्य आहेत

मै गोताखोर, मुझे गहरे जाना होगा,
तुम तट पर बैठ भंवर से बातें किया करो.

मै पहला खोजी नहीं अगम भवसागर का,
मुझसे पहले इसको कितनो ने थाहा है,
तल के मोती खोजे परखे बिखराए हैं,
डूबे हैं पर मिट्टी का कौल निबाहा है.
मैं भी खोजी हूं, मुझमे उनमे भेद यही,
मैं सबसे महंगे उस मोती का आशिक हूं,
जो मिला नहीं, वो पा लेने की धुन मेरी,
तुम मिला सहेजो घर की बातें किया करो
मै गोताखोर, मुझे…..

पथ पर तो सब चलते हैं, चलना पड़ता है,
पर मेरे चरण नया पथ चलना सीखे हैं,
तुम हंसो मगर मेरा विश्वास ना हारेगा,
जीने के अपने अपने अलग तरीके हैं.
जिस पथ पर कोई पैर निशानी छोड़ गया,
उस पथ पर चलना मेरे मन को रुचा नहीं,
कांटे रौदूंगा, अपनी राह बनाउंगा,
तुम फ़ूलों भरी डगर की बातें किया करो,
कोई बोझा अपने सिर पर मत लिया करो.
मै गोताखोर, मुझे…

नैनो के तीखे तीर, कुन्तलों की छांया,
मन बांध रही जो यह रंगो की डोरी है,
इन गीली गलियों मे भरमाया कौन नहीं,
यह भूख आदमी की सचमुच कमजोरी है.
पर अपने पे विजय नहीं जिसने पायी,
मैं उसको कायर कहता हूं पशु कहता हूं,
बस इसीलिए मैं वीरानो में रहता हूं,
तुम जादू भरे नगर की बातें किया करो,
जब जब हो जरा उतार और पी लिया करो
मै गोताखोर, मुझे…

पथ पर चलते उस रोज़ बहार मिली मुझे,
बोली गायक मैं तुमसे ब्याह रचाऊंगी,
ऐसा मनमौजी मिला नहीं दूजा कोई,
जग के सारे फ़ूल तुम्हारे घर ले आऊंगी,
मैं बोला मेरा प्यार, सदा तुम सुखी रहो,
मेरे मन को कोई बंधन स्वीकार नहीं,
तब से बहार से मेरा नाता टूट गया,
तुम फ़ूलों को अपनी झोली में सहेज रख लिया करो,
मुझसे केवल पतझड़ की बातें किया करो.
मै गोताखोर, मुझे…

कोणी म्हणत आहे पूर्वजांचा त्रास आहे, कोणी म्हणता करानीच केली. खरे काय करावे? कोणत्या देवाची/देवीची आराधना करू?>>>

यावर विश्वास ठेवू नका. फक्त घरची कुलदेवता असेल तिचे दर्शन घ्या, मनापासून प्रार्थना करा, चुकले असेल काही तर माफी मागा व नवी सुरवात करा.

प्रत्येक धंद्याची तंत्रे असतात. आणि नेटवर्किंग तर लागतेच. यात कुठे कमी पडताय हे बघा आणि बेबी स्टेप्स घेऊन सुरवात करा. चिडचिड होते, निराशा येते पण त्यामुळे बुडत्याचा पाय अजून खोलात जातो. हे टाळा आणि सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जा. सासरच्यांना घराण्याच्या नावावर पुढे जायचे नाही तर तो विषय सोडा.

कोणी म्हणत आहे पूर्वजांचा त्रास आहे, कोणी म्हणता करानीच केली. खरे काय करावे? कोणत्या देवाची/देवीची आराधना करू?>> ह्याने काही होणार नाही. म्हणजे दुष्काळी भाग असेल व पाण्यासाठीचे पंप विकायचा व्यवसाय किंवा बोअर मारायचा व्यवसाय यशस्वी होणार नाही. अश्या त्रासात अडकलेले लोक एका चक्रात विचार करत राहतात व ते चक्र बहुतांशी नकारात्मक असते. तेव्हा ते सोडा.

सध्याच्या काळात, फूड डिलिव्हरी, डिलिव्हरी ऑफ गुड्स , मास्क सॅनिटायझर बनवणे व विकणे व कापलेल्या स्वच्छ भाज्या व उसळीची धान्ये विक णे व इतर सर्विस व्यवसाय तग धरतील. पूर्ण नवा व्यवसाय हातात घ्यायच्या आधी, बिझनेस एन्वरॉन मेंट, उत्पादन असल्यास त्यास मागणी, सर्विस असल्यास त्याची गरज ओळखून
मगच पुढे जा. सर्वांची एक फॅमिली मीटिंग घ्या. व हे क्लीअर करा. मग वही पेन घेउन नवे प्लॅन लिहून काढा किती वर्केबल आहेत त्यावर दुसरी मीटिन्ग घ्या. तुमच्या कडे धंद्यासाठी कॅपिट ल लागते मनु ष्य बळ लागते ते कितपत आहे. कर्ज काढायला तारण काय ठेवता येइल अशी प्रॉप र्टी जमीन वगैरे आहे का? त्याची एक फाइल बनवा. सरकार आता स्टिमुलस पॅकेज देत आहे.

काय काय धंद्याच्या कल्पना आहेत ते जरा इथे द्या. म्हणजे चर्चा होईल. तीन बाप्यांपैकी शिक्षण कोणाचे किती आहे? त्यांचे प्लस पॉइंट काय आहेत. म्हणजे काही लोक चांगली स्ट्रॅटेजी विचार करून ठरवू शकतात. काही बलदंड असतात व न थकता प्रॉडक्षन बघू शकतात काही पीपल मॅनेजमेंट मध्ये चांगले असतात. सर्वांचे गुण शोधा. स्वाट अनालिसिस करा.

गेट बॅक टु अस हिअर. सपोर्ट इज ऑलवेज देअर पण इथल्या लोकांना उगीच अब्युज करू नका वैतागलात तरी. सध्या परिस्थिती अवघडच आहे.

अमा  even I don't prefer such things but you go through the comments. some people are -----. Any way मी आणि नवरा इंजिनिअर आहोत, आई डायटेशियन आणि दादा (भासरा )पायलट आहे environmental consultancy चे काम आहे. दादाला पायाच्या इंज्युरी मुळे परत यावे लागले इंडिया मध्ये. त्याची आता अकॅडेमि आहे ट्रैनिंग ची पण हवा तसा जम बसत नाही आहे 

environmental consultancy चे काम आहे. दादाला पायाच्या इंज्युरी मुळे परत यावे लागले इंडिया मध्ये. त्याची आता अकॅडेमि आहे ट्रैनिंग ची पण हवा तसा जम बसत नाही आहे >> आताच्य काळात खरे सांगु का मग बेस्टच आहे. की कचर्‍याचे सेपरेशन करुन गावाच्या म्युनिसिपल अथॉरिटी ला देणे हा एकदम सध्याचा हॉट बिझनेस आहे. मला वेळ असता तर मी पण केलेच असते हे. म्हणजे ओला सुका मेडिकल वेस्ट कंपोस्टेबल वेस्ट केमिकल्स असे . सध्या सगळी कडे करोना वॉरिअर गार्बेज फायटर वॉटर वॉरिअर असे लोक फिरताना दिसतात. तसे काहीतरी शोधून करा. म्हणजे काय लोकल गरज शोधून ती पूर्ण करा.

दुसरी कल्पना स्वस्तातले सॅनिटरी नॅपकिन बनवणे व विकणे. ह्या धंध्याला मरण नाही रिसेशन प्रूफ आहे. व एक्स्पोर्ट करू शकता सर्कारी मदत नक्की मिलेल.

घर्च्या घरी कम्युनिटी पुरते डिटर्जंट, साबण लिक्विड सोप हँड वॉश बनवता येतील व तिथेच विकायचे घरूनच.

साबांना आरोग्य पूर्ण दिवाळी फराळ डिझाइन करून बनवता येइल मेजर मार्केट आहे.

हायपर लोकल जीवनाचा ट्रेंड निदान पुढचे वर्श भर तरी राहील. त्या नुसार शोधा.

तेच सांगतेय ना अमा सगळंच प्लांनिंग नि आणि एक्सपेरियन्स घेऊनच करतो आहे तरी पण काम होत नाहीत हो. शेवटच्या क्षणी काही तरी होता आणि काम होत नाही 

कल्याणी , प्रथमतः मी तुला आणि तुझ्या होणाऱ्या सासरच्या कुटूंबियांना पुढील आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा देते. तु म्हणतेस तसं व्यवसायामध्ये जम बसत नाहीये, शेवटच्या क्षणी काम होत नाही आहे, त्यामुळे चिडचिड वाढली आहे. खरतरं नोकरी असो किंवा व्यवसाय असो जर यश हवं असेल तर मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य या सगळ्या सोबत जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो.

सासरचे नाव आमच्या शहरात प्रसिद्ध आहे राजकारणात आहेत सगळेजण. सासू ला पटले नाही म्हणून लहानपणिच वेगळे झाले. त्या आडनावाचा reference  सुद्धा हे लोक वापरात नाही  जेंव्हा कि तसे वापरले तर एकही काम नाही होणार असे राहणारच नाही >>>
कुठल्या कारणाने तुमच्या होणाऱ्या सासरच्या लोकांनी त्यांच्या कुटूंबांशी संबंध तोडले आहेत तर त्याबद्दल मी कुठलाही तर्क लावणार नाही पण एवढं मात्र सांगेन जर सासरच्या लोकांचे नातेवाईंक जर सासरच्यांशी संबंध सुधारण्यासाठी तयार असतील किंवा त्यांना जर व्यवसाय किंवा इतर गोष्टीसाठी मदत करायला तयार असतील तर त्यांची मदत घेण्यास, त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास काही हरकत नसावी असं माझं प्रांजळ मत आहे.

तुम्ही म्हणतायं की सगळं प्लानिंग व अनुभव घेऊन सुद्धा त्यांचे काम होत नाही आहे तर काम का होत नाही आहे, समस्या कुठे आहे याचा शोध घ्यायला हवा. आपलं व्यवसाय कौशल्य कुठे कमी पडतयं का ह्याचा अभ्यास करायला हवा. स्पर्धात्मक जग असल्याने आपल्याला मिळणारी संधी हि खूप आव्हानात्मक असणार त्यामुळे प्रथम तर आपली विपणन नीती मजबूत करायला हवी.

व्यवसाय म्हटलं की नफा आणि तोटा दोन्ही गोष्टी सहन करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. प्रत्येक वेळी यश मिळेल असं नाही. प्रथम तर जो व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्याचा आधी अभ्यास करायला हवा. जो व्यवसाय तुम्ही सुरु करणार आहात त्याला बाजारात किती मागणी आहे ? त्यासाठी भांडवल किती लागेल? तुम्ही किती भांडवल उभे करू शकता? जर तोटा झाला तर आपण तो होणारा तोटा किती सहन करू शकतो ?, आपण किती वेळ व्यवसायासाठी देऊ शकतो? ह्याचा पूर्ण अभ्यास करून पुढचं पाऊल टाकावं एवढं सगळं करूनही अपयश येत असेल तर थोडं थांबून योग्य वेळ आणि संधीची वाट पाहावी. ताण- तणाव वाढून न देता शांत डोक्याने आपण यातून मार्ग कसा काढू शकतो याचा त्या वेळेत विचार करावा.

( एखाद्याला सल्ला देणं सोपं असतं पण जो समस्येला तोंड देतो त्याची मनस्थिती काय असते ते मी समजू शकते. तुम्हांला फक्त यातून काही चांगले परिणाम जाणवावे ह्या स्वच्छ हेतूनेच मी इथे लिहिले आहे, माझ्या प्रतिसादात जर तुम्हांला काही अवांतर वाटत किंवा नकळतपणे माझ्याकडून काही तर्क लावला गेला असेल तर मनापासून क्षमस्व)

अमांनी छान सांगितले आहे.
काम होत नाही म्हणजे नक्की काय ते सांगितलंत तर उपाय सुचवता येतील. तुम्ही थोडेसे नशीब किंवा इतर कारणे (कुलदेवतेकडे दुर्लक्ष वगैरे) या दिशेने विचार करत आहात असे वाटते. मग पंधरा वर्षांत अयशस्वी झालेल्या गोष्टी एकाच बॉक्समधे जायला लागतात. 15 वर्षे खूप मोठा काळ आहे. त्यात अनेक चांगल्या जमेच्या गोष्टी देखील घडल्याच असतील ना? मग न जमलेल्या गोष्टी देखील अशा isolation मध्ये बघू नका.
It's great that you are seeking help. प्रयत्न करत आहात तर यश नक्कीच मिळेल! खूप सार्‍या शुभेच्छा तुम्हाला!

माझ्याकडूनही मनापासून शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या सर्व अडचणी दूरू होऊन सर्व मार्गी लागुदे.

Pages