दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

येस
बिंगो.
अमानवी बाईने फास्ट क्लू दिला असावा.

अनु आणि श्रद्धा बरोबर दोघी<<<< बरोबर न्हवं. अनुबाई चार मिनटं आधी पोचल्या ना! Proud

रच्याकने, संध्या काय डेंजर नाचते! या वरच्या फोटोतही नाचतेय का दोन्ही हात उंचावून अमानवी शक्तीला आवाहन करतेय काही कळेना!

हायला मी वेळ बघितलीच नाही. बक्षीस एकट्या अनुला.

बाकी संध्या ती संध्या. तिच्या सारखी तीच.

वाटून घेऊ काल्पनीक बक्षीस Happy ५०० रुपये तुला ५०० मला.
संध्या साँग्स म्हटल्यावर लगेच तमाशा गाण्यांचे ३-४ रिझल्ट आले. त्यात एकाला पळवल्यावर ही हिरवी साडी मिळाली. शिवाय संध्या(बाईं) चे ब्लाऊज एरवी अंगावरच शिवल्यासारखे टाईट हाताचे असतात. या गाण्यात किंचीत सैल हातांचे आहेत.

Screenshot_20201117-183451_YouTube.jpg

हम तो तेरे आशिक है?
कारण अशाच कपड्यांचं कॉम्बिनेशन जितेंद्र आणि बबिताचं आठवतंय farz मध्ये

सिनेमा 60s मधील आहे. या हिरोची बर्फातील गाणी प्रसिद्ध आहेत. हीरोइन चे वडिल प्रसिद्ध दिग्दर्शक होते

बर्फातली प्रसिद्ध गाणी असलेला हिरो- शम्मी.
प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी - राजश्री.
या दोघांचा असा सिनेमा ज्या नावाचा सिनेमा नंतरही एक बनला. जानवर. त्यातली गाणी ऐकून सगळीच माहीत आहेत.
मला आधी तिच्या लाल ड्रेस वरून लाल छडी वाटलेले पण ते गाणे बर्फात नाही हेही आठवत होते. मग युट्युबवर पाहिले.

बाकी संध्या ती संध्या. तिच्या सारखी तीच>>खरय....मेक अप ,हावभाव थोडे जास्त असले तरी तस करण कोणालाच जमणार नाही... या गाण्यातल्या साड्या किती मस्त आहेत ..एका गाण्यात 4 साड्या.... हेयर स्टाइल पण fusion असल्या सारखी...

तुरु संध्या चा अभिनय पण वेगळा आहे. आणि काशिनाथ घाणेकर सिनेमात अमृता खानविलकर ने तिची कॉपी करायचा प्रयत्न केला पण जमला नाही.

ये तारा

क्लू द्या.

Pages