फुलोरा असाही..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

Picture_001-3_0.jpg

निवडुंग वा तत्सम प्रजाती म्हटलं की सहसा काटेरी वनस्पती डो़ळ्यांपुढे येते. ह्या वर्गात मोडणार्‍या काही वनस्पती मात्र अत्यंत देखण्या दिसतात.

अश्याच एका झुडुपाचं प्रकाशचित्र टिपायचा केलेला प्रयत्न.

मंजू, नकुल धन्यवाद, आणि, हा मूळ फोटो नकुल.

Picture_0.jpg

आयटे छान आहे फोटो व तो काढण्यामागची कल्पना. Happy

आयटी, मस्तच फोटो!! Happy
आणि टिपलाय अगदी अचूक कोनातून! Happy

मला हा मूळचा फोटो छान वाटला... फक्त ती खालची कुंडी टाळता आली असती तर मजा आली असती...

कापो, कृ धन्यवाद.

अडम, मूळ फोटोमध्ये रोपट्याचा मध्यभाग जेवढा शार्प यायला हव तेवढा आलेला नाही आहे खरं तर.
आणि कुंडीचं म्हणशील तर परस्पर विरोधी रंगांची एक वेगळी मजा असते, म्हणून काढली नाही ती बाजूला.

मी आधी म्हंटलं तस एडीट केलेल्या फोटो मधे काळपटपणा जास्त आलाय आणि मधला भाग पण जास्त शार्प झालाय.. त्यामूळे नॅचरल वाटला नाही तो फोटो.. मुळच्या फोटोत मधला भाग एकदम शार्प नसला तरी मागच्या फांद्या ज्या जरा ब्लर आल्यात त्यामूळे तो उठून दिसतोय.. आणि कुंडी नसती तर तो अजून जास्त उठून दिसला असता...
आता कुंडी कडे लक्ष गेलं की नंबर नसताना चष्म्यातून पाहिल्यावर कसं वाटतं तसं दिसतय.. Happy

असो..

आयटे, मस्त गो फोटु. निवडुंगातहि देखणेपण शोधलस.. छान घेतलाहेस फोटो. Happy

क्या बात है! सुंदर!

परागकण

मला वाटतं की काळ्या पार्श्वभूमीवर कलर सॅच्यरेशन जास्त उठुन दिसतयं. ज्यामुळे एक dramatic effect येतोय चित्राला. (हव तर काळा भाग थोडा कमी-जास्त करून बघता येईल).
जर हे चित्र enlarge करून फ्रेम करून लावायच असेल, तर vivid कलर्स नक्कीच लक्ष वेधून घेतात.
आणि तो जर ह्या effects चा उद्देश असेल, तर तो ह्या effect मुळे साध्य होतोय हे नक्की.

किंवा अडम म्हणतोय त्यासाठी कॉर्नर्स अजुनच blur करता येतील. (काळ्या ऐवजी blur effect). बाजूची कुंडी एकदमच out of focus झाली, तर नंबर नसताना चष्म्यातून पाहिल्यावरच feeling येणार नाही कदाचीत.

राहुल Happy

तू सुचवलेले सगळे प्रकार करुन पाहिलेत आधीच. ब्लर एवढे खास नाही वाटले. काळा रंग कमी करुनही पाहिले, मग उठाव येत नाही. कधीतरी फोटो काढणार्‍याच्या चष्म्यातून पहावं की Happy

भावना, परागकण - धन्यवाद.

>>> आणि कुंडीचं म्हणशील तर परस्पर विरोधी रंगांची एक वेगळी मजा असते, म्हणून काढली नाही ती बाजूला.
ह्या चित्रामधे परस्पर विरोधी रंग एकमेकांना मारक आहेत. मूळ विषयामधे (फुलाचा मध्यभाग) रंगांची गर्दी असताना, पार्श्वभूमी शांत (neutral colors) असती तर चित्र जास्त उठून दिसेल. IMO. Happy

>>> ब्लर एवढे खास नाही वाटले. काळा रंग कमी करुनही पाहिले, मग उठाव येत नाही.
मला वाटलचं. मला काळा effect आवडला.

>>पार्श्वभूमी शांत (neutral colors) असती तर चित्र जास्त उठून दिसेल.

हे करुन पाहीन नक्की.

आयटी, मस्तच!
मला आवडला काळ्याचा इफेक्ट. Happy

मूळ फोटो बघितल्यावर तर काळ्या पार्श्वभूमीचा फोटो जास्तच आवडला.

चांगली निवड केली आहे. हे झुडुप आमच्याकडे खूप खूप वर्ष होतं त्याची फुल खाली सांडली की आणखी आणखी रोप उगवायची. लालसर्-मरुनसर काळोखी शेड खूप छान रंगसंगती झाली आहे. सौंदर्य कशात आहे हे तुला नक्कीच कळतं या चित्रावरून मला हे लक्षात आलं.

आयटी, भारी आहे. मला आधी शोभायंत्र बघतोय असेच वाटले. Happy

आयटी गर्ल खुपच सुरेख फोटो. काटे न बघता फुलं बघायची तुझ्यासारखी नजर देव आम्हाला पण देवो.

छान फोटो!!
--------------
नंदिनी
--------------

फोटो आजच बघितला. मस्तच आहे. आणखीनही वेगवेगळ्या अँगलने फोटो असते तर आवडले असतो.

फोटोखाली सेटिंग लिहित चला की. म्हणजे माझ्यासारखी अजाण बालकं काही ट्राय करतील नवीन. Wink

प्रकाशचित्राला दाद देणार्‍या सगळ्या मायबोलीकरांचे खूप खूप आभार! Happy

Pages