देवचं वस्तीला

Submitted by Mamatta'S on 15 October, 2020 - 07:56

शेतकरी,
हा शब्द नव्हे साधासा
तो फक्त, करत नसतो शेती
त्याच्या 'करी' च वसतसे 'ती'
रागावून तिच्यावर एक दिवस त्यानं
झुंझुरकाच उठून केलं खूप ध्यान
वाचले मंत्र, पढल्या ऋचा
अन मागितलं मागण?
देवाने तथास्तु म्हणून
परत शेतीचं दिली
त्याला आंदण!!
वेदातल्या ऋचा त्याच रुजून
आल्या मग ओळीत उगवून
त्याच्या पायाच्या भेगा
आणि जमिनीच्या भेगा
एकरूप होताना दिसल्या
अन त्यानं आता-------
देवाला मागणं
दिलंय सोडून
आता देवच,
त्याच्या वस्तीला आलाय.......

Group content visibility: 
Use group defaults