मांत्रिक

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 October, 2020 - 03:31

पारदर्शी बाटलीत
बूच घट्ट लावून
कोंबलेल्या
मांत्रिकाच्या भुतांप्रमाणे
अवस्था झालीय मनातल्या विचारांची !

धडका मारूनही
बाहेर पडू शकत नाहीत
आतमधे स्वस्थपणे नांदूही शकत नाहीत !

अस्तित्व दाखवता येत नाही
स्वतःपासून पळताही येत नाही

विचारांचा ताबा घेणारा
पश्चात्तापाचा दुष्ट मांत्रिक
फार फार क्रूर असतो हेच खरं !!

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users