*डोंगर'माथ्या'चे गुजकाव्य*

Submitted by Mamatta'S on 5 October, 2020 - 07:48

*डोंगर'माथ्या'चे गुजकाव्य*

माथा हा असेन माझा
असो तो डोंगर माथा,
फार फरक न त्यात
दोनी ती सारखी कथा ||
असे त्याच्या जवळी
घनदाट जंगल वारा,
असशी डोक्यात माझ्या
असंख्य विचार तारा ||
हात पसरुनी त्याचे
धरतो जेव्हा ढगांना,
त्याच रे ईश शक्तीच्या
स्पर्शीते मी पायांना ||
होऊनिया निवांत रे
टेकूनिया कड्याशी,
कानी करित बसे तो
मन गुज आकाशाशी ||
जेव्हा नतमस्तकं मी
होई त्याच विधात्याशी,
करी त्याचे *गुजकाव्य*
सांगे तो मज *कानाशी*||

.......ममता मुनगीलवार

Group content visibility: 
Use group defaults

Thankyou,
प्रतिक्रिया आवडल्या.