खरं प्रेम....

Submitted by माझी लेखणी.... on 22 September, 2020 - 16:08

“मी जास्त कमावतो तुझ्यापेक्षा मग घरातील कामे खरंतर तूच करायला हवी सर्व तरीही मी भांडी घासायला मदत करतो तुला“ संचितच्या या वाक्याने वृंदाला खूप वाईट वाटलं.टचकन डोळ्यांत पाणी आलं तिच्या.मनात विचारांचं वादळ फेर धरू लागलं.”घर दोघांचे आहे मग घरातील कामेही दोघांची आहेत इथे कोणी कोणाला मदत करण्याचा प्रश्न येतोचं कुठे.पण कधी कळेल ह्याला.मी जास्त कमावतो म्हणे,परी अजून लहान आहे म्हणून मला पार्टटाईम नोकरी करावी लागतेय ना तिच्याकडेही लक्ष देता येतं.हे असं हल्ली नेहमी बोलतो हा म्हणुन फुलटाईम नोकरी शोधायची ठरवलं मी पण मधेच हा लॉकडाऊन आला आणि सगळं प्लानिंग,बोंबललं.पण संचित इतका कसा बदलला?लग्न ठरताना मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हाच सांगितलं होतं की मला माहेरी आर्थिक मदत करावी लागेल दरमहा जोपर्यत तिसर्या बहिणीचं शिक्षण पुर्ण,होत नाही तेव्हा किती समजून घेतलं त्याने सगळं.मी स्वतःला खूप नशिबवान समजत होते की इतका समजूतदार नवरा मिळाला मला.अजूनही मी आर्थिक मदत करते माहेरी,त्याबद्दल तो मला रोखत नाही पण मग हे अचानक असं मनाला लागेल,असं कसं बोलू शकतो?लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आॕफिसवर्क आणि घरातली कामं,तेही परीला सा़ंभाळून करता करता जीव मेटाकुटीला येतो नुसता.त्यात आॕफिसवर्क इतकं वाढलंय कि माझा पार्टटाईम जॉब असला तरी फुलटाईम काम कराव लागतयं पण पगार माञ कमी.लाॉकडाऊनचा फायदा घेऊन जास्तीचं काम करून घेतात.ह्या सगळ्यात परीकडे दुर्लक्ष होतं.त्यापेक्षा आधी होतं तेच बरं होत अॉफिसचं काम अॉफिसमधे आणि घरचं काम घरी.कधी सर्व पूर्ववत होईल देव जाणे.संचितचं सतत टोचून बोलण नकोसं वाटतं.कामाचं काही नाही पण निदान थोडं समजून तर घेऊ शकतो ना तो.माझी रोजची होत असलेली तारेवरची कसरत बघुनही कुरकुर चालूच असते ह्याची” खरतर वृंदा आजपर्यंत नेहमी स्वाभीमानाने जगली.शिक्षण पुर्ण झाल्यापासून कामाला जुंपली.उसंत अशी कधी नाहिच.वडिल मिळेल ते काम करून घर चालवायचे.वृंदा सर्व भावंडात घरात मोठी.तिच्यामागच्या तीन बहिणी.जबाबदारीचं ओझं सतत खांद्यावर.अभ्यासात खूप हूशार ती आणि तिच्या बहिणीही.घरची गरीबी बघुन तिने लहानपणीच ठरवलेल की खूप शिकायचं.आणि परीस्थिती बदलवून दाखवायची.मी मुलगी असले म्हणुन काय झालं.आकाशात भरारी मीही मारू शकते.आईवडीलांना लोक बोलायचे ’अरे मुलगा नाही तुम्हाला? सर्व मुलीचं?’सनक जायची डोक्यात तिच्या हे ऐकून.पण मोठ्यांचा आदर ठेवावा ही शिकवण लहानपणापासून त्यामुळे कधी कोणाला उलटून बोललीच नाही.खरतर तिचा स्वभावच तो सहन करण्याचा.आईवडीलांच्या वागण्याचं आश्चर्य वाटायचं कि तेही बोलायचे नशिबात नाही मुलगा आमच्या सर्व मुलीचं.खूप राग यायचा तिला.दिवसांगणिक तिची जिद्द वाढत चाललेली.तिने ईंजिनीयर व्हायचं ठरवलं होतं.दहावीत चांगले मार्क्स मिळाले आणि तिने ईंजिनिअरींग डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं.घरची परिस्थिती हालाखीची असली तरी तिच्या आईवडीलांनी तिला काहिहि करून शिकवायचं ठरवलं होतं.तसही त्यांना खूप अभिमान वाटायचा आपल्या मुली हूशार असल्याचा.वृंदाला शिकताना खूप अडचणी आल्या.पुस्तके विकत घ्यायला महाग पडतं म्हणून ती मित्र मैत्रीणींकडून पुस्तके घेऊन नोट्स काढून वाचत असे.पण ह्यात खूप वेळ जात असे.नंतरनंतर तिला अभ्यासाचा कंटाळा येत असे.इतरांसारखं आपणही धम्माल करावी असं वाटू लागलं.नाही म्हणायला तिचाही एक ग्रुप तयार झालाच होता.हळूहळू ती नकळत अभ्यास कमी आणि मैत्रीणिंसोबत टाईमपास जास्त करू लागली.त्यांच्यासोबत वृंदाला मनमोकळं जगता येत होतं.थोडावेळ का होईना घरच्या परिस्थितीचं मनावरचं ओझं बाजूला व्हायचं.पण नकळत तिचं मन सतत तुलना करायचं इतरांशी.सर्वांसारखं आपण पैसे हौसमौंज करण्यासाठी का वापरू शकत नाही असं वाटायचं.कॉलेज संपल्यावर संध्याकाळी सपाटून भूक लागायची.पण पैसे कमी असल्याने काहीही न खाता २ तासांचा प्रवास करून ती धावतपळत घरी यायची.अशी ही वृंदा कळत नकळत परिस्थितीला दोष देऊ लागली होती.तिच्या,दोन्ही मैत्रीणींची प्रेमप्रकरणं एव्हाना सुरू झालेली पण वृंदाला नेहमी असं वाटायचं की तिला तिचं खरं प्रेम मिळेल नक्कीच घाई काय आहे.तिला समजून घेणारा,तिची काळजी घेणारा,खरं प्रेम करणारा कोणीतरी असेलच.ती दिसायला खुप सुंदर नसली तरी नाकीडोळी नीटस.काही मुले तिच्या मागे होती पण हिला त्यापैकी कोणी कधी आवडलाचं नाही.तिच्या वर्गात एक मुलगा होता.वेडयासारखा प्रेम करायचा वृंदावर पण वृंदाला तो कधी आवडलाचं नाही.एकदा तर वृंदा त्याला खुप रागाने वाटेल तसं बोलली.त्यालाही राग आला त्याने काचेच्या खिडकीवर स्वतःचा हात जोरात मारला.काचा फुटून हातात घुसल्या.पण तोपर्यंत वृंदा कॉलेजमधून निघाली होती.आज कधी नव्हे ती कोणालातरी इतकं बोलली होती.तिचं त्या मुलावर प्रेम जरी नसलं तरी तिला वाईट वाटत होतं.रागाच्या भरात मी जरा जास्तच बोलले असं तिला वाटू लागलं.त्याला भेटून माफी मागावी असं तिला वाटलं.पण ह्याचा त्याने वेगळाच अर्थ घेऊन माझ्या होकारासाठी अजुन प्रयत्न करू लागला तर.वृंदाला काय करावं काहिचं सूचत नव्हतं.खुप विचार करून तिचं राञभर डोकं दुखत होतं.म्हणून तिने उदया कॉलेजला दांडी मारायचं ठरवलं आणि विचार करता करता तिला खुप उशिरा झोप लागली.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults