तिची डायरी

Submitted by Mamatta'S on 21 September, 2020 - 03:45

तिची डायरी

किराणा ची यादी
मुलांच्या फी च्या नोंदी
कामवालीचा हिशोब
भाजीच्या रेसिपी
असं बरंच काही बाही,
आली संपत डायरी
आणि ती शोधतेय
सैरभैर होऊन
स्वतःच प्रतिबिंब
स्वतः च्याच डायरीत,
अन शोध चालू आहे .......

ममता मुनगीलवार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःसाठी २ क्षण आपले आपल्यालाच काढायचे असतात. अन्य कोणाला त्याची पडलेली नसते ना पडायचे काही कारण.