दुकाटाआ

Submitted by सामो on 18 September, 2020 - 12:31

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"Robert Hass" यांची "Privilege of Being" (http://articles.latimes.com/1999/feb/14/books/bk-7893) ही देखील एक अप्रतिम, अप्रतिम, अतिशय देखणी कविता आहे.
कवितेमधील प्रसंग असा आहे की, दोन प्रेमिक, एक उत्कट मीलनक्षण अनुभवत आहेत, खरं तर धडपडून, प्रयत्नपूर्वक, एकतानता अन पूर्णत्व साधायचा यत्न करत आहेत. अन त्या दोघांच्या वरती "ether" मध्ये काही देवदूत, एकमेकांच्या स्ट्रॉबेरी ब्लाँड केसाच्या वेण्या घालत मधेमधे, त्या प्रेमिकांचा हा सर्व प्रयास पहात आहेत.

Many are making love. Up above, the angels
in the unshaken ether and crystal
of human longing
are braiding one another's hair, which is
strawberry blond
and the texture of cold rivers.

अन या देवदूतांना कळत नाहीये की एवढी नाट्यमयता, इतकं "ado about nothing" कशासाठी. कशाकरता एवढी awkward धडपड?

They glance
down from time to time at the awkward ecstasy--
it must look to them like featherless birds
splashing in the spring puddle of a bed--

स्वतः देवदूत हे मृत्यूच्या पलीकडील जगात, अमर्त्य लोकात रहात असल्याने त्यांना हे कळू शकत नाही की, या एकरुपतेच्या क्षणात माणसाला तात्पुरता का होईना, अमृतक्षण, स्वर्गीय सुख लाभते, मृत्यूचा खरं तर विसर पडतो. माणसाचे मीलनाकरता असणारे उत्कट longing त्यांना ना कळू शकते, ना लक्षात येते.

मीलनाच्या त्या ecstasy नंतर दुप्पट वेगाने येणारे, कोसळणारे "एकटेपण" "Hass" यांनी शेवटच्या कडव्यात, या कवितेते साध्या प्रसंगातून, समर्थपणे रंगविले आहे, हा एकटेपणाही, या देवदूतांना कळू शकत नाही.

I woke up feeling so sad this morning
because I realized
that you could not, as much as I love you,
dear heart, cure my loneliness,

निरक्षर असल्याने या देवदूतांना ना वाचता येते ना त्यातून येणारी उत्क्रांती आहे, याउलट माणसे वाचू शकतात, उत्तरोत्तर प्रगतीची आस बाळगतात.
या उत्क्रांतीच्या शक्यतेकरता, कुठेतरी Hass हे माणसाला उपलब्ध असणारा कितीही का तात्पुरते पूर्णत्व असो, नंतर अचूक येणारे कितीही एकाकीपण असो, पण अज्ञानी, निरक्षर, अगदी आदर्श सुंदरता ल्यालेल्या देवदूतांच्या जगापेक्षा, मर्त्य जग अधिक prefer करतात.

छान. It keeps eroticism on a different level altogether where a union between man and a woman becomes something sublime and nothing to be ashamed of. होनाजी बाळा यांच्या कविता मात्र बऱ्याच एरोटिक आहेत. कविता म्हणता येणार नाही पण लावण्या.