अदलाबदल

Submitted by सामो on 18 September, 2020 - 11:25

वीणा, आनंद दोघांनीही घाईघाईनी नाश्ता उरकला अन पायात कसेबसे बूट्/सँडल्स चढवून दोघेही आपापल्या वाटांनी कचेरीकडे पळाले.
वीणा बसमध्ये चढली तरी डोक्यात विचारांच चक्र अव्याहत चालूच होते. - हं पांघ्रुणांच्या घड्या तर केल्यात पण रचून ठेवायला विसरले.- जाऊ देत संध्याकाळी पाहीन. - बरं आज भाजीही भेंडीची, आनंदच्या नावडीची आहे : ( - प्रयत्न तर केला आहे मसालेदार बनवायचा पण त्याला नेहमीप्रमाणे नाहीच आवडणार. - हे अस्सं आहे - कुठे कुठे मी एकटी पुरी पडणार? - उन्नीस्-बीस होणारच पण आपण जरा कमी पडलो की मन कुरतडत रहातं. मनाला कोण समजावणार? : ( - हं एकदा ऑफीसात पोचलं की स्नेहाशी बोलून मन हलकं करता येईल - पण सगळच नाही ना सांगता येत स्नेहाला - म्हणजे तसं दोघी खूप व्यक्तीगत पातळीवर बोलतो पण आर्थिक अडचणी सांगायला संकोच वाटतो. अन कुठेशी ते सुभाषितही वाचलं आहे - कामविषयक, अर्थ विषयक अन अजून काहीतरी अगदी निकटच्या मित्रासही बोलू नये का काहीसं - जाऊ देत. प्रत्येक नात्याला सीमा ही असणारच.
________
तो दिवस नेहमीच्या घाई-गडबडीत गेला.संध्याकाळी दोघेही थकून घरी आले. वीणाला आनंदचा हेवा-असूया वाटत राहीली. - हं आला की तंगड्या पसरुन, टीव्ही लावून बसेल.- बातम्या होई-होईपर्यंत गरमागरम जेवण हजर आहीच आयतोबांसमोर : ( - जरा विचार दिवस कसा गेला.- पण नाही.
आनंदच्याही मनात याच प्रकारचे विचार चालू असत - हीला कुठे फ्लॅटचे हप्ते भरावे लागतायत? - बाहेरची कामं मीच पहायची. - ऑफीसात बॉसवर इम्प्रेशन मारताना जीव मेटाकुटीला येतो. - प्रत्येक जागी कट-थ्रोट कॉम्पिटीशन : ( -जरा ढीलं पडलं तर नोकरीचे वांधे.
ते जाऊ दे आज सान्यानी काहीतरी नवीन पदार्थ दिलाय - २ लाडू आहेत म्हणाला - डोळा मारत म्हणे "रात्री झोपायच्या आधी खा." - येडपटच आहे, मी ठरवेन ना कधी खायचं ते. अरे बापरे व्हायाग्रा सारखं तर काही :ऑ - नाही नाही साने डिसेंट आहे - सांगीतल्याशिवाय तो उगाच काही देणार नाही.
___________________
दोघांनी रात्री ती वडी खाल्लीए. स्ट्रॉबेरीसारखी पण गोड चवीची ती वडी चविष्ट होती. पण सकाळी उठले तेव्हा अजबच घटले होते. वीणा अन आनंदच्या आत्म्यांची अदलाबदल झाली होती. अरे बापरे!! भल्या पहाटे, फुल पंख्याखाली दोघांनाही घम फुटला. पण सांगणार कोणाला. कॅज्युअल घ्यावी का न घ्यावी या विचारांती शेवटी दोघांनीही तो दिवस रेटायचे ठरविले.
______________
आनंदचा (वीणाच्या शरीरातील) दिवस :- वीणाच्या शरीरात शिरलेल्या आनंदला विचीत्र वाटत राहीलं. पण खरी डोकेदुखीला सुरुवात झाली ती बसप्रवासात्.अर्धे धक्के खात अन अर्धे चुकवत वीणा कशीबशी ऑफीसात पोचली. आनंदला पहील्यांदा सामान्य साध्या गोष्टीतल्या आनंदाचे अन आत्मविश्वासाचे मोल कळले. ताठ मानेनी, छातीवर हाताची घडी अथवा पिशवी न दाबता , मोकळेपणाने वावरण्यातला आनंद. पण असोच.
ऑफीसमध्ये गेल्यागेल्या स्नेहानी वीणाला रेस्टरुम मध्ये खेचले अन गप्पांना सुरुवात केली. मग काल काय विशेष झालं, आज डब्यात काय आणलय ते फेसबुकच्या स्टेटसपर्यंत सगले विषय त्यात आले. आनंदला मात्र हा "स्मॉल टॉक" डोकेदुखी वाटू लागला म्हणजे पाल्हाळ कशाला लावायचं थेट मुद्द्यावर यायचं की. अन त्याच्या पुरषी स्वभावाला अनुसरुन प्रत्येक लहान सहान गोष्ट शेअर करण्यात त्याला अजीबात गम्य वाटेना. स्नेहाला कळेचना की आज वीणाला झालय तरी का. : (
दिवसभरात तिने मेसेंजरवर कानोसा घ्यायचा प्रयत्न केला पण वीणाच्या शरीरातील आनंदने दाद दिली नाही. मीटींगमध्येही आनंदला त्याचा व्हॅलीड मुद्दा दुप्पट आवएशाने मांडावा लागला.म्हणजे त्याला तरी तेवढा आवेश दुप्पट वाटला. अन तरीही आज कंठ फुटल्याबद्दल त्याची टिंगल झाली ती झालीच. : (
एकंदर दिवस व्यस्त/तक्रारखोर अन उगाचच डिफेन्सीव्ह्/आवेशपूर्ण गेला.
___________________
वीणाचा (आनंदच्या शरीरातील) दिवस -
वीणा वेळेवर ऑफीसात पोचली.काम खूप होतं. पण मुख्य तिला हा अनुभव आला की केलेल्या कामाचं अ‍ॅप्रिसिएशन नव्हतं. आनंद काम करणारच नव्हे केलच पाहीजे हे गृहीतच धरलं होतं. काम संपल्यावर अजून ढीगभर मिळालं तेही थॅकलेसली.दिवसभरात तिला ३-४ प्रॉस्पेक्टीव्ह एंप्लॉयर्स चे कॉल आले व ३-४ फायनॅन्शिअल अ‍ॅड्व्हायझर्स चे. तिला हे नीट कळलं की आनंदने स्वतःला किती अपमार्केट अन अप-टू-डेट विथ टेक्नॉलॉजी ठेवलं आहे. बचतीचा तसेच इन्व्हेस्ट्मेंटचा किती विविध अंगांनी तो विचार करतो आहे. हे सारं तिच्यासाठीच नव्हतं का? तिला बेनेफिशिअरी करुन तो थांबला नव्हता तर त्याच्या अकस्मात मृत्यूपश्चात नीट आर्थिक कुशनची तजवीज त्याने तिच्यासाठी केली होती.
खरं तर वीणाला उगाचच गुन्हेगार वाटू लागलं. इतका विचारी, सूज्ञ अन धोरणी नवरा मिळायला भाग्य लागतं असे विचार तिच्या मनात डोकावू लागले : )
__________________
संध्याकाळी दोघे घरी आली ते एकमेकांची नजर चुकवतच्.चहा घेऊन वीणा आंघोळीला गेली अन अचानक दोघांना अंधेरी आली अन डोळे उघडतात तो परत सर्व पूर्ववत झालेले आढळले.
पण या एका दिवसाने उलथापालथ केली होती. एकमेकांचे विश्व अनुभवायला मिळाले होते अन त्या एका दिवसाने दोघांचे भावविश्व पार बदलून टाकले होते. दोघेही मनाने अतिशय जवळ आलीली होती. अन हेही कळून चुकली होती -
"जेणो काम तेणो भाय
दुजा करे सो गोता खाय" : )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Too stereotypical. आ णि वर फोडणीला हे?
जेणो काम तेणो भाय
दुजा करे सो गोता खाय

आरे देवा.

होय हा फार पूर्वी लिहीलेला लेख आहे. करेक्ट अगदी प्रचंड जेंडर बायस असलेला आहे. जस्ट रिमाईंडस मी, आय हॅव्ह कम अ लाँग वे.

चांगली कल्पना आहे.

>> जस्ट रिमाईंडस मी, आय हॅव्ह कम अ लाँग वे

हे आवडेश Happy पण आता ह्या नव्या भूमिकेतून सुद्धा लिहिता येईल. अजून फुलवता येईल असे वाटते.

छान आहे.
अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर चा एक मराठी पिक्चर पण आहे ना या विषयावर.ती शिक्षिका असते.

सिरियसली...आता कुठे असतात अशा बायका?
आमच्या मित्र परिवार मध्ये एकही असा नाही जो जेवण, भांडी, लॉंद्री करत नाही...हे कोरोना आधीपासून बरे का...

मस्त

छान आहे कल्पना,( हो, वरती म्हटल्याप्रमाणे पिक्चर पण आलाय ह्यावर, ) सामो जरा भरभर आटोपल्यासारखी वाटली. अजून फुलवता आली असती. आपण ब-याच गोष्टींमध्ये एकमेकांना गृहीत धरतो. ज्याचा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो.