सोप्पा मावा केक - एगलेस

Submitted by अमृता अमित on 18 September, 2020 - 09:31
mawa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सध्या वर्क फ्रॉम होम चालु आहे त्यामुळे स्वयपाक घरात बरेच प्रयोग करयला वेळ मिळतोय... मग यावेळेस ठरवलं होतं की बाप्पांसाठी घरीच पेढे, बर्फी वगैरे घरीच कराव... मग काय सांगितलं नवर्‍याला की आण बाबा खवा.. तर त्यानी १ किलो आणुन ठेवला..पेढे, बर्फी, मोदक सगळं करुन झालं.. पण खवा काही संपला नाही.. विचार पडला काय करावं आता या खव्याचं ?? शेवटी मावा केक करुन बघायचं ठरवलं.. झालं केली सगळी जमवा जमव आणि बनवला मावा केक. बरा जमला म्हणुन मग म्हणलं इथेही रेसिपी शेयर करावी... जाणकारांनी काही चुकलं असलं / काही वेगळी कृती असेल तर जरुर सांगावी. बाकी रेसिपी वगैरे टाकण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे काही चुका असतील तर सांभाळुन घ्या. Happy

साहित्य :
१. १/२ कप बटर किंवा तूप
२. १ कप पिठी साखर
३. १ १/२ कप मैदा
४. १ चमचा बेकिंग पावडर
५. १/४ चमचा खायचा सोडा
६. १/४ कप दही
७. ३/४ कप दुध
८. १ कप खवा

क्रमवार पाककृती: 

कृती :
सगळ्यात पहिल्यांदा बटर/ तूप घेऊन त्यात पिठी साखर घाला आणि खुप छान फेटुन घ्या..
मस्त क्रिमी झालं की त्यात दही घालुन परत फेटुन घ्या.
मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र चाळुन घ्या यामूळे केक हलका व्हायला मदत होते. आता हे सगळं साहित्य तूप साखरेच्या मिश्रणात घालुन कट फोल्ड प्रकारे मिक्स करुन घ्या. लागेल तसं थोडं थोडं दुध घालुन मिश्रण तयार करा.. मग त्यात खवा घालुन परत एकदा निट मिक्स करा. साधारण ईडली पिठासारखी कंसिस्टंसी यायला हवी.
आता ओवन १८० डिग्री वर १० मिनिटं प्रि-हिट करुन घ्या.
तयार बॅटर केक मोल्ड मधे घालुन साधारण ५० मिनिटे बेक करुन घ्या.

वाढणी/प्रमाण: 
३-४
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults