बंदिस्त 'मी '

Submitted by Mamatta'S on 18 September, 2020 - 06:27

बंदिस्त 'मी '
खिडकीतून पाहिलं मी----
आकाशात मुक्तपणे विहरतात पक्षी
करण्यास मनोरंजन
टाकलं न पिंजऱ्यात
--------------अन आता मी बंदिस्त ,
खिडकीतून पाहिलं मी ------
जंगलात सहजपणे वावरताय प्राणी
करण्यास शक्ती प्रदर्शन
टाकलं न पिंजऱ्यात
------------अन आता मी बंदिस्त ,
खिडकीतून पाहिलं मी---
,बेफाम, मुक्त वाहतेय नदी
करण्यास प्रगती
टाकलं न धरणात
-------------आन आता मी बंदिस्त,
खिडकीतून पाहिलं मी-----
बेधुंद, स्वतंत्र डोंगर अन दऱ्या
करण्या लढाई
वाटल न रेघात ,
----------अन आता मी बंदीस्त ,
चुकलंच आमचं ----
विसरलो आम्ही विश्वाचं अंगण,
तुकोबाची शिकवण,
ओंजळीत मागायचं पसायदान,
संस्काराची ही शिकवण,
विसरलो आम्ही
मुक्त कर,
बंदिस्त "मी' ना
मुक्त कर
मुक्त कर------///
- ममता मुनगीलवार

Group content visibility: 
Use group defaults