मी?

Submitted by आसावरी. on 16 September, 2020 - 13:14

बिन मांज्याचा पतंग मी,
दिशाहीन तरंग मी,
कोणाशीही न जुळणारा
वेगळाच रंग मी

आतली व्यथा लपवणारा
खोटा हसरा चेहरा मी,
समुद्र देखील हरवलेला
एक एकटा किनारा मी

सगळ्याच प्रश्नांत असणाऱ्या
प्रश्नचिन्हाचं टिंब मी,
आरशातले खोटे, आभासी,
अनोळखी प्रतिबिंब मी

मृगजाळहूनही भ्रामक जगात
शोधते आहे सत्य मी,
माणुसकीचा चेहरा शोधत
हिंडते आहे नित्य मी!

- आसावरी

Group content visibility: 
Use group defaults