तुला भेटण्याची ओढ लागे जिवाला

Submitted by वैशाली अ वर्तक on 11 September, 2020 - 02:47

तुला भेटण्याची ओढ लागे जीवाला
कधी येशील जवळी सांग माझिया मनाला

वाट तुझी बघण्याची मनाची ही रीत
बघ सांजवेळ झाली धुंद आज प्रीत
हात घेऊनी हाती आळवू प्रेम गीताला
कधी येशील जवळी सांग माझ्या मनाला

मोहमयी तव हात फिरु देना हळुवार
पहा कशी बहरली रातराणी अलवार
शहारते काया स्पर्श होता तनुला
कधी येशील जवळी सांग माझ्या मनाला

तव प्रेमाची सखया वाट पाहती लोचने
धुंद मंद या समयी ऐक माझे तू सांगणे
नको आता बहाणे अधीर या जीवाला
कधी येशील जवळी सांग माझिया मनाला

तुला भेटण्याची ओढ लागे जीवाला
कधी येशील जवळी सांग माझिया मनाला

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults

मस्त

छान.

नवीन प्रतिसाद लिहा