प्रिय तू- २

Submitted by मुग्धमोहिनी on 7 September, 2020 - 11:00

https://www.maayboli.com/node/76566

त्यानंतर शिक्षण झाले, नोकरी लागली आणि स्थळं बघायला सुरूवात झाली. त्यावेळी एका विवाहमंडळात तुझ्या स्थळाची महिती वाचून उगाचच आशा पल्लवित झाल्या. पण तसे काही घडले नाही. आणि यथावकाश माझे लग्न झाले. सगळं छान चालू होतं. पण भावाने लग्नानंतर मला काही त्रास नको म्हणून तुझी सगळी प्रेमपत्रं जाळून टाकली तेव्हा मनाला वेदना मात्र झाल्या.

दिवस,वर्षे सरत होती . मी माझ्या संसारात, कामात अगदी बुडाले होते.मला काही शारिरिक त्रास सुरू झाला आणि त्यातून ॲापरेशन करायचे ठरले.ॲापरेशन टेबल वर ACत मी बराच वेळ एकटी पडले होते.त्यावेळी अचानक तुझा विचार मनात चमकून गेला.यातून सुखरूप बाहेर पडले तर तुला शोधायचं असं ठरवलं.

Linkedln आणि फेसबुकवर तू लगेच दिसलास. आपल्या दोघांनाही ब्रेकअप झालेल्या पुढच्या वर्षी Best Student Award मिळालं होतं या योगायोगाची गंमत वाटली.आपल्या काही कंपन्या पण सारख्या दिसत होत्या.

मी धीर करून तुला फेसबुकवर दीर्घ मेसेज केला. बर्याच दिवसांत तुझं काही उत्तर नाही म्हणून परत एकदा तुला विसरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तुझा whatsapp ला मेसेज आला. त्यांनतर आपण अखंड ३ तास चॅट करत होतो. औपचारिक चौकशा करून झाल्यानंतर आपण खूप बोलत होतो; स्वत:बद्द्ल, जोडीदाराबद्दल,मुलाबद्दल, आई-बाबांबद्दल.
आपली विवाहाच्या जोडीदाराची निवड आपण त्यावेळी एकामेकांत पाहिलेल्या जोडीदारासारखीच होती.

आपण त्यानंतर अनेक दिवस संपर्कात होतो, सल्ले देत होतो आणि घेत होतो. तुझ्या बायकोने मुलासाठी नोकरी सोडल्यावर तिच्याप्रती कृतज्ञता दर्शव हे सजेशन तू फार छान प्रकारे अमलात आणले होतेस.

मी परत वेड्यासारखी आपण घरी सगळं सांगू आणि छान चौघांचा ग्रुप करू अशा अवास्तव कल्पनेचा आग्रह पहिल्याच चॅट पासून धरू लागले.
तू मला परत समजावलसं.

एकदा आपण फोनवरही बोललो होतो. पण अचानक एके दिवशी आपण हे नाते इथेच थांबवू असा तुझा मेसेज आला. मी त्यावेळीही तुझी साथ सोडली आणि आत्ताही सोडतोय त्याबद्दल मला माफ कर असंही तू लिहीलं होतसं.अर्थात लौकिकार्थाने तुझे काहीच चुकले नव्हते. तू एका समजंस, पोक्त माणसासारखचं वागत होतास. मीच वेडी तुझ्यावर जीव लावून बसले होते....अजूनही.

समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.
पण अजून हवं होतं काही तरी.

धन्यवाद वावे. अजून काही हवं होतं म्हणजे ?? कदाचित घालता येईल.
काय योगायोग आहे. मी आत्ता तुमचीच कुंडल ही सुंदर विज्ञानकथा वाचत होते.

अरे! तिथे मलाही दोनतीन प्रतिसाद मिळाले होते 'क्लोजर हवं होतं' या अर्थाचे! Wink धन्यवाद कथा आवडल्याचं सांगितल्याबद्दल!! Happy
इथे क्लोजर आहे, पण 'त्याच्या' साथ सोडण्याचं कारण कुठे तरी यायला हवं होतं असं वाटलं. तिला कदाचित कळलेलं असेलही. मला कळलं नाही.

Submitted by मुग्धमोहिनी on 7 September, 2020 - 22:31>> Happy म्हणूनच कदाचित मला 'काही तरी राहून गेलं' असं वाटलं असेल. तिच्या दृष्टीने ही अपूर्णतेची गोडी असेल.