स्वप्नपरी 2

Submitted by अरविंद डोंगरे on 5 September, 2020 - 13:45

नाजूक मनाचे हे विचार
त्याची वेगळीच परिभाषा।
जीवनात अशी कोणी भेटेल
मनाला नव्हती आशा ।

पाहुनि स्वप्नपरी च लावण्य
मन माझं फुलपाखरू झालं।
नेहमी भिरभिरणार मन
तिच्या भोवती फिरायला लागलं।

साध्याश्या अशा शृंगारात
तिची कळी न कळी खुलली।
जणू अवणी वर ह्या
स्वर्गातली कामिनी अवतरली।

किती सुंदर हा पेहरावा
त्यात तुझ्या रूपाचा गोडवा।
पाहुनि कमनीय रुपमाती
वाटे सर्वानाच हेवा।

नाजूक तो कमनीय बांधा
त्याने मी आकर्षित गेलो ।
वाटे मला असेल हे आकर्षण
पण मी तर प्रेमात पडलो।

स्वप्नपरी च्या रुपाला पाहताच
मन माझं दुसरीकडे वळे ना ।
करायला तिच्या रुपाचं वर्णन
एकही शब्द मिळे ना ।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users