Lockdown मधले जर तर

Submitted by दिव्या१७ on 3 September, 2020 - 08:25

***Don't copy without permission, all rights reserved** (for maayboli copycat Marathi Katta and other similar peoples who like to steal others work and earn without doing anything in Marathi - फुकट्या कॉपी बाज )

Lockdown मुळे सगळ टाइम टेबलं विस्कटलंय, कामवाली फुल्ल पगारी सुट्टी एन्जॉय करतेय आणि सगळ्या जणी ज्या कामवाली वर काम सोपवून निवांत असायच्या त्या सगळी काम करताय, भांडी, धुनी, स्वयंपाक, साफसफाई, मुलांचा ऑनलाईन स्कूल वर्क मध्ये हेल्प , न संपणारी लिस्ट आहे हि कोरोना कधी जाईल सांगता येत नाही, तोपर्यंत सुटका हि नाहीच. मला ह्या सगळ्याचा वैताग आलाय खूप. तर हा वैताग घालवण्यासाठी आज मी विचार करत होते जर ह्या lockdown मध्ये नवरा, मुलगा जर गावाला गेले असते आणि मी एकटीच घरात असते तर..

आठवतंय शाळेत जर तर प्रश्न असायचे त्यातलाच हा तर Happy मी इतकी सुखी नाही माझा नवरा गावी काय कुठे बाहेर हि जाईल तर शप्पथ आणि मुलगा जरा जास्तच लाडावलाय तो जिथे तिथे सर्वकाळ सोबत, तर एक फन म्हणून हे जर तर पुराण, सत्यात नाही पण स्वप्नात तरी थोडे सुख....

तर जर नशिबाने मी एकटी lockdown मध्ये असते तर मी काय काय केले असते ते सगळे पुराण खाली लिहिले आहे... पहिला लिहायचा प्रयत्न तर थोडं समजून घ्या ... आणि हो तुम्ही हि आप आपले अनुभव येऊ द्यात.. तेवढाच टाइम पास...

जर मी एकटी असते तर सगळ्यात आधी माझे सगळे आवडते स्नॅक्स ऑर्डर केले असते... जसे कि चिप्स बिग पॅक, चकली, बनाना चिप्स, मका चिवडा, खूप सारे डेअरी मिल्क चोकोलेट्स, fryums, मॅग्गी नूडल्स, सगळे MTR रेडी मिक्स. आणि सरळ ऑफिस ला ४ दिवस सुट्टी टाकून छान चहा चा thurmus भरून स्नॅक्स खात सगळे favourite movies बघितले असते कोणत्याही व्यत्यया विना, हे माझे खूप दिवसा पासून चे पेंडिंग विश आहे पण अजून तरी योग आला नाही, नेहमी काहीतरी होते आणि मला अर्धवट मूवी सोडून उठायला लागते, आणी सोबत स्नॅक्स असतील तर नवरा सुरु बस आता दरवाजे वाढवायला लागतील Sad त्याला मी सुखाने काही करताना बघितले की असे टोमणे सुचतात, काय फरक पडतोय थोडे वजन वाढले तर मला कुठे दुसरे लग्न करायचेय. पन नाही बायकोला सुखाने जगू देईल तर तो नवरा कसला.

आणि दुसरे स्वप्न सेमच फक्त मूवी ऐवजी आवडती कादंबरी पूर्ण वाचणे एका बैठकीत विना व्यत्यय. आणी तिसरे स्वप्न म्हणजे झोप, ब्रेकफास्ट, मुलाचे स्कूल, ह्यातले कुठले हि टेन्शन विना छान मन भरे पर्यंत झोपणे अगदी रात्री १० पासून दूपारी दोन तीन पर्यंत. हि सगळी स्वप्न मी LOCKDOWN मध्ये पूर्ण केली असती. आता तुम्ही म्हणाल यात काय विषेश पन माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या हे वाचत असतील त्या सगळ्यांचं हि थोडं फार सारख स्वप्न असेल.

तर मंडळी हा मराठी लिहायचा आणी कुठेतरी काही लिहायचा पहिलाच प्रयत्न गोड मानून घ्या Happy आणी येऊ द्या कि तुमचे जर तर....

***Dont copy without permission, ऑल rights reserved**

Group content visibility: 
Use group defaults

सुरवातीची तंबी एकदम भारी आहे! Proud

आवडती कादंबरी पूर्ण वाचणे एका बैठकीत विना व्यत्यय>> हे मी प्रवासात करायचो. शक्य तेव्हा मुद्दाम ट्रेनने जायचो विमानप्रवासाची परवानगी असतानाही.

भारी लिहिलंय. फुकट्या कॉपी बाज ला दिलेली वॉर्निंग पण भारी.
हे दिवास्वप्नच आहे माझ्यासाठी पण रंगवायला काय हरकत आहे. मी पण अगदी डोळे दुःखेपर्यंत वाचत राहणार. मध्येमध्ये डिस्टरबन्स नाही. किचनमध्ये फक्त थालीपीठ नाहीतर खिचडी, चकूल्या करणार. वॉशिंग मशीन 4/5 दिवसातून एकदा च. नो भांडी नो कपडे. सलग मुव्ही बघायचं सुख उपभोगणार. झोप काही हवी तेव्हा आणि हवी तेवढी माझ्या नशिबी नाही. पण हे करायचंय, ते करायचंय यापेक्षा रिलॅक्स ,अगदी आळसात दिवस घालवणार.

नेहमी काहीतरी होते आणि मला अर्धवट मूवी सोडून उठायला लागते,

अगदी अगदी, मलाही एका बैठकीत मूव्ही बघायला मिळतच नाही.

पन नाही बायकोला सुखाने जगू देईल तर तो नवरा कसला.

Lol
एकदम खरं.

छान लिहीले आहे.

मी मैत्रिणीला/ मैत्रिणींना घरी बोलवुन, मुव्ही मॅरॅथॉन केली असती. Happy परत हादडायला बाहेरुन, पिझ्झा, स्नॅक्स - प्लँन्टेन चिप्स, बनाना,चिप्स ,घरी केलेली भेळ, पाणीपुरी, आईसस्क्रीम.

मला असा निवांत वेळ मिळाला तर......
खुप सारे सिनेमे पेन्डीग आहेत ते बघेन.
डायरी लिहायला वेळच मिळत नाही ...तर निवांतपणे डायरी लिहिन.
आधी महिन्यात एक चक्कर असायची पार्लरमध्ये, मुले झाल्यावर 2-3 महिन्यात एकदा आणि आता कोरोनामुळे 7 महिन्यांनंतर एकदा... मग पार्लरवाल्या मैत्रिणीला घरीच बोलवून (फेशियल, मैनिक्युर,पैडिक्युर,हेड मसाज) सगळं करून घेईन. विचार करून पण रिलैक्स वाटलं. Happy
स्वंयपाक तर नकोच, मग ते भांडी घासणे येईल सोबत.
डोश्याचे पीठ असतेच फ्रिजमध्ये, मग डोसे, झोमाटो वगैरे.
घराजवळच पार्क आहे, जी मागच्या 7 महिन्यापासून बंद आहे. उघडली तर संध्याकाळी जाऊन बसेन थोडा वेळ. इथे नवीन असताना माझ्या तिथेच ओळखी आणि मैत्रिणी झाल्या आहेत.
झोप इतकी प्रिय नाहिए, मग दुपारी जरा वाचत बसेन.

मस्त निबंध लिहायचा फिल आला. Happy

हे सगळं थोडया फार फरकाने माझंही स्वप्न आहे.
आवडत्या ठिकाणी शॉपिंग,
मग मुव्ही,आवडत्या हाटलात डिनर
कधी होणार हे सगळं पूर्ण..

मुलगा मोठा झालाय आता, त्यामुळे एकदा विचार केला, गेले कित्तीक वर्ष मी फक्त दुसर्‍यांचा विचार करुन, कामे अंगावर घेवून रखडतच राहीले. ह्यात मलाच बदल करायला हवा. त्यामुळे कामाचे प्रेशर घेणे बंद केले. गेले काही वर्ष मी छान एंजॉय करतेय आयुष्य Happy

स्वयंपाक मनाला येईल तसा, भरपूर झोप, वाचन, गेम, मूव्ही...मज्जानू लाईफ Wink