चित्रकला स्पर्धा- - - -swati_patel - Group A - Ojal

Submitted by swati_patel on 31 August, 2020 - 15:36

अ गट प्रवेशिका.. ओजल पटेल ९ वर्ष
मार्कर , पेन्सिल, पेन्सिल कलर, पेपर , खोडरबर,मेटलिक पेन्सिल कलर, इन्क पेन, क्रेओन वापरले.

This is Ojal's description of her picture.
Picture is a split between our world and Kailash. A pink magic line shows the split worlds.

In our world,me and my family are doing arti of Ganpati. we have flowers, water, and sweets.

In kailash, ganpati bappa is dancing with mushak and other mouses.
On a table with his name, it has sweet and water, beside him are a couple of flowers.
On one side of him are shankar bhagwan and parvati mata and on other side is his home

-Ojal Patel

IMG_2651 (1).jpgIMG_2645 (1).jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान काढलंय आणि स्प्लिटची कल्पनाही भारीच! रंगवलय ही छान, कुठेही रंग बाहेर आला नाही.
शाब्बास ओजल!

फारच गोड आणि अदभुत चित्र आहे हे.

गणपतीचा बड्डे साजरा होतोय जणु. डिटेल्स अतिशय सुंदर - बर्फाच्छादित डोंगर, उंदिरमामाचं जॅकेट, लाडवाशेजारी कबुतर, उंदीर घेऊन येत असलेलं काहीतरी आहे, गणपतीसमोर पिकनिक मांडलीये, त्यातल्या जगवरही सुंदर नक्षी, एक कॅसल आहे, शंकर पार्वती बसले आहेत, पार्वतीचा ड्रेसही भारीये, काही उंदिर कसरतीचे खेळ करून दाखवतायत, बाप्पाची केशरचना, त्यातला टिआरा, भक्त मुलीबरोबरचा तो क्युट कुत्रा, गणपतीच्या पायाशी एक मांजर आहे बहुतेक, त्या भक्त बाईच्या ड्रेसवर नक्षी काढलीये, त्यात टॉपवर एक कोळी काढलाय बहुतेक, फुलं देखिल वेगवेगळ्या आकाराची आहेत, प्रत्येक कॅरेक्टरचे केस वेगळे आहेत. ..... ९ वर्षाच्या मानानं फारच उच्च आहे हे.

ओजलला एक भली मोठ्ठी शाब्बासकी आणि निरीक्षण शक्ती आणि डिटेलिंगबद्दल एक मोठी कॅडबरी.

किती सुरेख, गोडुलं चित्र काढलंय . डिटेलिंग भारी आहे (मै चित्रांची आठवण झाली Happy ) मामीला +१११११११११
गणपतीच्या चेहे-यावरचे भाव पण किती गोड. ओजलची चित्रामागची विचारसरणी प्रचंड आवडली.
तिची अजून चित्र बघायला आवडतील

खूपच सुंदर. वयाच्या मानाने रेषेवरचे नियंत्रण खरोखर
वाखाणण्याजोगे आहे. बारीक बारीक तपशील दांडग्या कल्पनाशक्ती ने छान भरले आहेत. तिचे विचार वाचणे आणि ते प्रत्यक्षात उतरलेले पाहाणे (त्यांची संगती लावणे एखादे कोडे सोडवत असल्यासारखे वाटले)हा एक गोड अनुभव आहे. मुलांची कल्पनाशक्ती किती दूरवर जाऊ शकते! कौतुक.

एक नंबर झालेय चित्र.. किती कल्पक आणि बारीकसारीक डिटेलिंग आणि किती छान रंगवलेय. गणपती बघून गणेशगल्लीचा राजा आठवतोय. कलाकार आहे पोरगी

खरंच अफाट कल्पनाशक्ती! उंदरांनी मानवी (?) मनोरे केलेत, पक्ष्याच्या चोचीत एक उंदीर आणि त्याच्या हातात एक जग ज्यातून काहीतरी ओतलं जातंय, दूरवर असल्याने छोटे दिसणारे शंकर पार्वती, प्रस्तुत चित्राचा मुख्य विषय असलेला गणपती मोठ्या आकाराचा, डावीकडच्या डोंगरावर किल्ला आणि त्याच्या दाराशी पायऱ्या, सगळंच कमाल!

कौतुकबद्दल धन्यवाद Happy I read all comments to her....
Mami - Now I need to give Ojal a cadbury on your behalf Happy LOL
She loves drawing and painting. I'll post some of her pics some other time... Now a days with WFH and 2 small kids it's difficult to login and spend time here. Happy