कर्ण लिहिणारे शिवाजी सावंत-

Submitted by Santosh zond on 31 August, 2020 - 00:33

शब्दांच्या बानाने अचुक लक्ष वेधून वाचकांच्या मनात तूफान घोळवणारे मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यां आज पण प्रत्येकाच्या मनात तशाच घर करुन आहे.त्यांचे शब्द हृदयाला खुप खोलवर जाऊन भिडतात आणि वातावरण उत्साहीप्रसन्न करुन चैतन्यमय क्षणांची साद घालतात.प्रत्येकाने समजुन घ्यावे आणी एकांत क्षणी वाचावे असे सावंत, कोल्हापुर जिल्हयातील छोटय़ाशा आजरा गावचे सावंत कोर्टातील कारकुणाच्या नोकरीपासुन ते महान मराठी कादंबरीकार बनुन आजरामर झालेले सावंत,आयुष्यभर ज्याने जगाचे कडु बोल ऐकत सगळयांना जीवन कस जगाव,जगात दानाची, मैत्रीची,आणि जिद्दीने सतत जिंकण्याची परीभाषाच बदलून टाकली असा तो कर्ण स्वतःच्याच शोधात जन्मभर सूर्यासारखा जळत राहीलेला कर्ण लिहिणारे शिवाजी सावंत.त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. जरी आज या जगात नसले तरी त्यांनी जगाला दिलेली शब्दरूपी आठवण खूप वर्षानंतर सुद्धा तशीच आपल्या सोबत आहे,त्यांना वाचतांना त्यांची विचार करण्याची पद्धत आणि आपल्या माणसाविषयी असणारी त्यांची साधी भावना तेव्हाच समजते आज त्यांच्या 80व्या जन्मदिनी त्यांना ही छोटीसी शब्दरुपी भेट!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाजी सावंत माझ्या आवडत्या लेखकांपैकी आहेत
त्यांनी लिहिलेले मृत्युंजय, छावा युगंधर तिन्ही वाचलेत.
त्यापैकी पहिले दोन आवडते.

वा! शब्दरूपी भेट छान आहे. फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते की तुमचं पहिलं वाक्य असंख्य स्वल्पविरामांच्या गदारोळात खूप मोठं झालं आहे. परिच्छेदाच्या शेवटी सहा पूर्णविराम द्यायच्या ऐवजी त्यातला एकेक पूर्णविराम मध्ये मध्ये वापरून वाक्ये छोटी केलीत तर वाचायला सोपे जाईल.