काल आणि आज!

Submitted by mrsbarve on 30 August, 2020 - 04:25

रात्रीची सव्वा आकाराची वेळ ,अचानक बाहेर कुणीतरी वाचवा वाचवा म्हणून ओरडलं ... खूप जोरात अगदी पैनीक आवाजात ... खिडकीतुन बाहेर बघितलं तर चक्क एक माणूस धावतोय आणि त्याच्या पाठी दुसरा माणूस हातात मोठा चाकू घेऊन! हे सगळं घराच्या पुढेच,पुढच्या अंगणाला लागून असलेल्या रस्त्यात ! धक्काच बसला .ताबडतोब ९११ ला फोन केला ,दोन मिनिटात पोलीस गाड्या ,ऍम्ब्युलन्स ,फायर ट्रक घराच्या समोर .दहा बारा पोलीस ,त्यांनी लगेच संशयित माणसाला पकडलं ,ज्याच्यावर वार झाला त्याला ऍम्ब्युलन्स मधून हलवलं. हे सगळं इतकं पटापट घडत गेलं कि त्या शॉक मधून बाहेर यायला साडे बारा झाले.
पोरे घाबरून माझ्या कुशीत झोपली . हे असलं कधी आमच्या कम्युनिटीत घडेल यावर विश्वासच बसत नव्हता. आणि तेही दारात !

डोकं भणभणायला लागलं ,हळू हळू शेजारयांचे टेक्स्ट येत होते ,एक मेकांना फोन येत होते आणि बरीच माहिती कळत होती . ते ऐकून पोरे आणखीच अस्वस्थ ,घाबरून गेलेली आणि डिस्टर्ब झाली होती.

बर्याच उशिरा झोपलो सगळे ,सकाळीही त्याच चर्चा चालू होत्या .... मग हळू हळू दिवसाचे रुटीन चालू झाले ,ब्रेकफास्ट ,स्वयंपाक ,जेवणे अन टीव्ही ,वाचन,अभ्यास इत्यादी ... गप्पा हसणं खेळणं ,भू भुशी खेळणं ,मग माया लेकींनी मिळून नवीन रेसिपी केली . दोघी गप्पा मारता मारता लेक अचानक म्हणाली ,"बाप रे काल रात्री ,आपण केव्हढ्या स्ट्रेस मध्ये होतो ,आता मी ते विसरले पण ! "

पटकन देवाचे आभार मानले ... कि हुश्श्श त्या वाईट आठवणीतून सगळेच बाहेर आलो आहोत आणि आला क्षण एन्जॉय करत आहोत ...
मग वाटलं ,बाप रे काय माहिती यालाच निबर होणं तर म्हणत नसतील? आणि शहराच आला अंगावर .....!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults