अमेरिका: उच्च-शिक्षित भारतीयांसाठी; स्वप्नपूर्तीचा देश की वेठबिगारीचा (आधुनिक गुलामगिरीचा) सापळा?

Submitted by गुंड्या on 25 August, 2020 - 19:15

नमस्कार,

सर्वप्रथम एवढे मोठे शीर्षक वाचून देखील तुम्हाला पुढे वाचावेसे वाटले ह्या करता सर्वांचे मन:पुर्वक आभार.
अमेरिकेविषयी मराठी तसेच भारतीय वाङ्मय विश्वातील सर्व लेखन प्रकारात, जसे लेख, ललीत, कादंबऱ्या, लघुकथा, क्रिया-प्रतिक्रिया, उखाळ्या पाखाळ्या, वगैरे वगैरे तसेच अमेरिकेतील चांगल्या - वाईट आणि इतर सर्व गोष्टींचा खिस पाडून झाला आहे. तरी मी ह्या लेखमालेतून असे वेगळे काय सांगणार आहे?

आयुष्यातील काही प्रश्न उघड उघड दिसणारे असतात. हातच्या कंकणाला आरसा कशाला? जसे गरिबी, अत्याचार, सामाजिक जीवनातील विषमता वगैरे वगैरे.
काही प्रश्न माहित असतात पण थोडेसे प्रयत्न करून समजून घ्यावे लागतात उदाहरणार्थ दारूचे व्यसन कसे सोडावे? हे प्रश्न दृष्टीस पडतात परंतु किती दारु पिणे म्हणजे व्यसन हे व्यक्तिगणिक प्रमाण बदलू शकते, मते बदलू शकतात.
पण काही प्रश्न खोलात गेल्याशिवाय समजत नाहीत, मुळात त्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. उदाहरणार्थ मानसिक समस्या. डोळ्यासमोर तर सगळं आलबेल दिसत असतं, परंतु खोलवर समजून घ्यावं लागतं, तेंव्हा कुठे लक्षात येतं की हि समस्या आहे खरी..? हे असे दडलेले, आड- निबिड जागी रुतून बसलेले प्रश्न समजून घेणे म्हणजे ज्ञानेश्वरांनी हरिपाठात म्हटल्याप्रमाणे पारियाचा रवा घेता परोपरी सारखेच आहे. परंतु एकदा त्या समस्येची नस (नाडी) तुम्हाला अचूक कळली की त्याचे दूरगामी आणि भीषण परिणाम समजून घेणं सोपे जाईल. समस्या निर्माण होण्याचे मूळ कारणही लक्षात घेणे मग फार कठीण नाही आणि त्यावर सांगितलेला उपाय समजणे ही तितकेच सोपे होईल.

ह्या लेखमालेतील भाव आणि मुळ समस्या समजून घेण्यासाठी, किंवा उमजण्यासाठी वाचकांना त्यांची अमेरिकेबद्दलची सामान्यपणे असणारी भूमिका आणि मानसिकता थोडीशी बदलणे किंवा त्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे. कदाचित हि लेखमाला वाचताना ती बदलेल किंवा वेगळ्या दृष्टीकोनातून वाचताना समस्येच्या भावाशी एकरूप होता येईल अशी आशा करतो. अन्यथा, फसगत होऊन मुळाशी न पोचता, त्यातून निर्माण झालेल्या परिणामांशीच झोंबत बसण्याची शक्यता अधिक आहे.

तर अश्याच काही दडलेल्या, अनवट जागी लपलेल्या परंतु सूर्य-प्रकाशाइतक्या स्वच्छ सर्वांच्या डोळ्यासमोर लखलखणाऱ्या अमेरिकेतील एका "फर्स्ट वर्ल्ड" खुपऱ्या समस्येबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहे.

हि लेखमाला, हा भारत विरुद्ध अमेरिका सामना नाही, ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. असलाच तर हा अमेरिका विरुद्ध अमेरिका असा अगदी कलगी तुर्याचा सामना नसून एक तुलनात्मक विरोधाभास असू शकतो.

अमेरिकेमध्ये स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये ग्रीन कार्ड हा महत्वाचा टप्पा आहे, ग्रीन कार्ड शिवाय व्हिसा-वरच्या वास्तव्यात अनेक निर्बंध आहेत. ग्रीन कार्ड मिळाले तरी त्या व्यक्तीचे नागरिकत्व भारतीयच राहते ह्याची भारतातील वाचकांनी नोंद घ्यावी. ग्रीन कार्ड मिळाल्यावर ती व्यक्ती व्हिसाच्या निर्बंधातून मुक्त होते. लेखमालेत ह्या विषयावर सखोल निरीक्षणे आणि चर्चा होईलच. आज भारतीयांना ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी १५० वर्षे आहे, जो भारतेतर; म्हणजेच जर्मनी, जपान अगदी जगातल्या कुठल्याही देशातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तीसाठी काही महिने ते एखाद - दोन वर्ष इतका कमी आहे. हे असे का? ह्याचे काय परिणाम आहेत वगैरे वगैरे प्रश्नावर ह्या लेखमालेतून उहापोह करणार आहे. आज दिनांक २८ जुलै २०२० मध्ये किमान १० लाख उच्च-शिक्षित भारतीय; त्यात सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनिअर, कॉम्पुटरवाले सगळे, सगळे ह्या सापळ्यात अडकलेले आहेत. गेली पंधरा वर्ष ह्यातून सुटण्यासाठी शासकीय पातळीवर त्यांची एक चळवळ, धडपड सुरु आहे. आणि बदलत्या परिस्थितीनुसार आता तर ह्या आंदोलनाला अमेरिकेतील त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

समस्येच्या स्वरूपाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने निरनिराळ्या विषयांना; जसे अमेरिकेचा इतिहास, राजकारण, समाज-कारण वगैरे स्पर्श होणे स्वाभाविक आहे, परंतु मूळ विषयापासून दूर न जाता इतर विषय गरजेपुरतेच संदर्भासाठी संक्षिप्त रूपात घेतले आहेत.

ह्या लेखमालेचे उद्दिष्ट काय असेल? तर पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.. ! कुणी अमेरिकेची स्वप्न बघावी की न बघावी, इथे येण्यासाठी धडपड करावी की न करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू अमेरिकेत आल्यावर पुढे कुठल्या परिस्थितीमधून आपल्याला जायला लागू शकते ह्या शक्या-शक्यतांची जाणीव करवून देणे. त्यामुळे अमेरिकेची स्वप्ने बघताना आपल्यालाही त्याच रांगेत उभे राहायचे आहे, ह्याची माहिती व्हावी ह्याच जात्यातून आपल्यालाही दळून निघायचे आहे ह्याची जाणीव पुढील पिढीला व्हावी ह्या उद्देशाने करवून आणलेला हा लेखन प्रपंच..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ईण्टरेस्टींग वाटतेय.
गणपतीच्या धामधुमीनंतर लेखमाला प्रकाशित केले तर चांगले होईल. मागे पडणार नाही.

डिस्कलोजर दिलत तर लेखमाला चष्मा काढून वाचणे शक्य होईल. म्हणजे तुम्ही या रेस मध्ये नागरिकत्व मिळाल्यावर हे लिहिताय का कसं? त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला? थोडक्यात तुमची पर्सनल investment किती आणि कशी आहे ते. ती अर्थात पर्सनल माहिती आहे सो द्यायची का नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल हे जाणतोच.

अमेरिकेत टुरिस्ट म्हणून जायचा प्रसंग कदाचित येईल पण तेथे स्थायिक व्हायची वेळ कधीही येणार नाही. त्यामुळे हे लेख केवळ उत्सुकता म्हणून वाचले जातील. आज 150 वर्षे लागतील तर आज जे अमेरिकन माबोकर तिथे आहेत ते हा इतका मोठा लोंढा त्या दिशेने फुटायच्या आधीच तिकडे गेले का? लेखात प्रातिनिधिक उत्तरे मिळतीलच म्हणा.

पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

सर्व प्रतिक्रियांना धन्यवाद..
सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील लेखांमधून मिळतील.
१. मी या प्रश्नाशी संबंधित आहे.
२. हा प्रश्न गेल्या २० वर्षात आणि प्रामुख्याने १० वर्षात तीव्रतेने वाढलाय, त्याआधी आलेल्यांना ह्या समस्येची झळ पोचली नाही.

ह्या लेखमालेचा उद्देश पुढील पिढ्यांना; जे अमेरिकेची स्वप्ने बघत आहेत त्यांना जाणीव करवून देणे. आता जे ह्या समस्येतून जात आहेत, त्यांना जागे करणे.. आणि भारतीय - अमेरिकन लोकांना ह्या प्रकल्पात सामावून घेण्यासाठी आवाहन करणे ज्या-योगे अमेरिकेत येण्याची स्वप्ने बघणाऱ्या पुढील पिढ्यांचा मार्ग सुकर करता येण्यास मदत होईल.

प्रचंड मोठा भूभाग, सर्व तर्‍हेच्या नैसर्गिक साधनांची रेलचेल (वीज, पाणी, खनिजे, पेट्रोल इ.), त्यातुलनेत कमी लोकसंख्या आणि सर्वसामान्यतः दिसणारे/जाणवणारे कायद्याचे राज्य (law and order) व लोकशाही. ह्या सगळ्या घटकांचा विचार केला तर, भारतात रहाणार्‍या किमान २-३ पिढ्या तरी अमेरिकेत येण्याची स्वप्ने बघतच मोठ्या होतील असे मला वाटते. ह्यातले पहिले ३ factors (जमीन, नैसर्गिक साधनानची रेलचेल आणि त्यातुलनेत कमी लोकसंख्या) अमेरिकेला अजून पुढची ५० वर्षे तरी लागू पडतील असे वाटते. लोकशाही आणि law and order चा कदाचित र्‍हास व्हायला लागेल. पण सर्वसामन्य माणसाचे जगणे असह्य व्हावे इतका र्‍हास नजीकच्या भविष्यात होईल असे वाटत नाही.
Immigration मधे येणारे अडथळे, अमेरिकेत जाऊन तिथल्या समाजात मिसळताना करावा लागणारा संघर्ष हे सर्व सोसूनही भारतीय लोक अमेरिकेत जाण्यासाठी धडपडत रहातील. कारण भारतात प्रचंड लोकसंख्या असल्याने इथे असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आत्ताच प्रचंड ताण आहे आणि भविष्यात तो कैकपट वाढणार आहे.
आखाती देशात तर ग्रीन कार्ड्/सिटीझनशिप असे काही मिळणे खूपच कठिण असते. तिथला समाजही अमेरिकन समाजापेक्षा जास्त संकुचित विचारांचा आहे. तरीही भारतीय लोक तिथे वर्षांनुवर्ष जातच आहेत.

भारतीयांना ग्रीन कार्ड मिळण्याच्या कालावधीबाबत अनेक तर्क आहेत. मुळात ग्रीन कार्ड वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अ‍ॅप्लाय होतात. भारतीय इन्जिनीअर/नॉलेज वर्कर जनतेला इबी१, इबी२, इबी३ हे विशेषकरून लागू होतात.
इबी१ ३ ते ४ वर्षात सध्या मिळते. पण इबी१ साठी काही विशेष अटी आहेत. पीएचडी मिळवलेले अभ्यासक/व्यावसायिक ज्यांचे अनेक शोधनिबंध वगैरे प्रकाशित होतात ते या कॅटेगरीत येतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक (इन्टरनॅशनल मॅनेजर) हे देखील या कॅटेगरीत अ‍ॅप्लाय करू शकतात. या इंटरनॅशनल मॅनेजर कॅटेगरीचा गैरवापर होतो'च'.
ईबी२ / ३ ला १५ ते १५० वर्षे काळ लागेल असा अंदाज आहे. याचे कारण दरवर्षी किती जणांना ग्रीन कार्ड द्यायचे याचा आकडा ठरलेला आहे. त्यात ७% पेक्षा जास्त ग्रीन कार्ड ही एकाच देशाच्या नागरिकांना देता येत नाहीत. समजा एम्प्लोयमेंट बेस्ड ग्रीन कार्डचा दरवर्षीचा कोटा १लाख आहे. तर जास्तीत जास्त ७००० भारतीयांना त्या अंतर्गत ग्रीन कार्ड मिळेल.
समजा तुम्ही युक्रेनिअन नागरीक आहात. युक्रेनमधून फक्त ५० लोकांनी ग्रीन कार्डला अ‍ॅप्लाय केले आहे. तर त्या सर्व ५० लोकांना ग्रीन कार्ड मिळेल (कागदपत्रे वगैरे बरोबर आहेत असे समजू). पाकिस्तानातून १००० लोकांनी अ‍ॅप्लाय केले तर त्याही सर्वांना मिळेल.

वॉशिन्ग्टन पोस्टच्या या लेखानुसार EB-2 अंतर्गत ४०,०४० ग्रीन कार्ड दरवर्षी दिली जातात. म्हणजे प्रत्येक देशाला जास्तीत जास्त २८२८ मिळतात. डिसेंबर २०१९च्या या लेखानुसार साडेपाच लाख अ‍ॅप्लिकेशन EB-2अंतर्गत दाखल आहेत त्यापैकी ५,१२,००० म्हणजे ९३% भारतीय आहेत. करा गणित.

अजून एक गंमत म्हणजे तुम्ही दुसर्‍या देशाचे नागरिक झालात तरी तुम्ही ज्या देशात जन्मला त्याच देशाच्या कोट्यात तुमचा नंबर राहतो. उदा तुम्ही भारतात जन्मलेले भारतीय नागरिक होता, मग पुढे नेदरलँडचे नागरिकत्व घेतले व अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अ‍ॅप्लाय केले तरी तुम्ही ग्रीन कार्डच्या रांगेत भारतीयच गणले जाता.

गेल्या दोन वर्षात युएसमध्ये शिकायला येणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या आकड्यात किती घट झाली आहे याचा काही विदा उपलब्ध आहे का?

प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था
https://www.maayboli.com/node/76269

प्रकरण २: अमेरिका स्थलांतरितांचा/स्थल-आंतरितांचा देश?
https://www.maayboli.com/node/76288

प्रकरण ३: भारतीयांचें अमेरिकेतील स्थलांतरण: एक दृष्टिक्षेप
https://www.maayboli.com/node/76299

याचे कारण दरवर्षी किती जणांना ग्रीन कार्ड द्यायचे याचा आकडा ठरलेला आहे. त्यात ७% पेक्षा जास्त ग्रीन कार्ड ही एकाच देशाच्या नागरिकांना देता येत नाहीत. >> मी अमेरिकेत एका कंपनीत internship करत असताना माझ्या बरोबर एक रशियन मुलगा काम करत होता. अमेरिकेतून MS ची डिग्री घेतल्यावर एका वर्षाच्या आत त्याला employment based ग्रीन कार्ड मिळू शकले. त्याउलट कित्येक भारतीय विद्यार्थी MS झाल्यानंतर वर्षानुवर्ष ग्रीन कार्ड च्या प्रतिक्षेत घालवतात.
गेली अनेक वर्ष रशिया हा अमेरिकेचा नंबर १ चा शत्रू आहे. भारताने कधीही अमेरिकेशी उघडपणे शत्रुत्व पत्करलेले नाही. तरीही रशियन लोकांचे ग्रीन कार्ड १ वर्षात होऊ शकते पण भारतीयांचे नाही. Happy
मेक्सिकन लोकांनाही employment based ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी फारशी प्रतिक्षा करावी लागत नाही. तरीही ते अमेरिकेत illegally घुसण्याचा प्रयत्न का करतात? Legally Green card मिळवून अमेरिकेत का येत नाहीत याचे मला नेहमीच कोडे पडते.

मेक्सिकन लोकांनाही employment based ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी फारशी प्रतिक्षा करावी लागत नाही. तरीही ते अमेरिकेत illegally घुसण्याचा प्रयत्न का करतात? >> अनेक कारणे. जे लोक गैरमार्गाने येण्याचा प्रयत्न करतात त्यातील अनेकांना H1B/H2A वर रोजगार मिळण्याची शक्यता नसते. कंपन्या/शेतकरी या कामगारांवर पैसे खर्च करायला तयार नसतात. बरेच वेळा मिळाला व्हिसा तर मध्येच तो संपणे मग काम तसंच चालू ठेवायचे हे घडते. म्हणजे येताना कायदेशीर मार्गाने येतात पण पुढे बेकायदेशीर पणे रहातात. तिथली गरीबी, गुन्हेगारी इ लक्षात घेता F1 वर येऊन शिक्षण घेणारे तसे अल्प प्रमाणात आहेत.
थोडक्यात ग्रीन कार्डसाठी एंप्लॉयमेंट बेस्ड/इमिग्रंट इंटेट व्हिसा मिळणे मूळात अवघड असल्याने हे घडते.

बरीच आर्थिक सुस्थितीत असणारी मेक्सिकन कुटुंबातील लोक इथे येऊन बाळंतपण करतात इन्शुरन्सशिवाय हजारो डॉलर कुठून आणतात माहिती नाही. आणि परत जातात आणि पुन्हा येऊन सेटल होतात . गरीब मेक्सिकन मात्र मुकाट्याने डिपोट होतात . सर्व पैशाचा खेळ आहे. ही दोन्ही उदाहरणे जवळून पाहिली आहेत. Texas and Arizona इथे त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे . आम्ही रहातो तिथे तर अजिबात diversity नाही. अगदी गोरे 50% Hispanic 45% and legal and illegal immigrants 5% . थोडे कमी जास्त असेल पण साधारण असेच आहे.

थोडक्यात ग्रीन कार्डसाठी एंप्लॉयमेंट बेस्ड/इमिग्रंट इंटेट व्हिसा मिळणे मूळात अवघड असल्याने हे घडते.>> +१
अनेक नॉन इमिग्रंट व्हिसा हे ड्युएल इंटेंट नसतात. म्हणजे नॉन इमिग्रंट व्हिसावर असताना ग्रीन कार्डला (इमिग्रंट इंटेंट) अप्लाय करता येत नाही. त्यासाठी एचवन वर जावे लागते. अर्थात त्यात पळवाटा आहेत.(ज्या भारतीय जन्म असलेल्या व्यक्तीला उपयोगी नाहीत).
>> रशिया हा अमेरिकेचा नंबर १ चा शत्रू >> काय ??? कधी??? रशियाच्या अध्यक्षाचा कॉल मिस झाला की कशी जाहिर नाचक्की होते माहित नाही का? Wink

Happy इंश्युरंस इ साठी बाळंतपण हॉस्पिटलमध्येच झाले पाहिजे असे थोडीच आहे. मिडवाईफ/सुईण येते आणि करते. नैसर्गिक प्रक्रिया आहे ती. घडते....टेक्सस व न्यू मेक्सिको भागात अनेक काऊंटी/ जिल्हे 'मॅटर्निटी केयर डेसर्ट' म्हणून ओळखले जातात. इस्पितळच नाही तिथे विमा काय कामाचा!!

अहो पण ते फक्त नागरिकत्वासाठी करतात , तोच शब्द नेमका विसरले मी !! तुम्ही म्हणता तसेही मार्ग असतील पण माझ्या डोक्यात इन्शुरन्स विषयच येतो सारखं doctor / hospital ऐकले की काय करणार स्वानुभव आहे !!

पण greencard नियमांचे असे labyrinth बनवले की ते फक्त आर्थिक सुस्थित असलेल्या 1st 2nd world देशाच्या नागरिकांनाच पार करता येते, शिवाय कुटुंबातील एखादी dependent व्यक्ती अपंग असेल तर तुमचे अप्रुव्ह होण्यास खूप अडचणी येतात किंवा they just don't qualify. ( स्वानुभव ) कारण त्यांच्या सिस्टिमवर संभाव्य ताण येतो न कमाऊ शकणाऱ्या लोकांचा Sad .
पुरे करते नाही तर नवी लेखमाला व्हायची Happy .

बरेचदा मेक्सिकोमधून बेकायदेशीर इमिग्रेशन होते असे म्हटले जाते त्यात थोडी गल्लत आहे. गेल्या काही वर्षात/दशकात बहुतेक इमिग्रन्ट्स हे मध्य अमेरिकेतून होंडुरास, ग्वाटेमाला, एल साल्वादोर वगैरे देशातून जास्त येत आहेत. ते येतात मेक्सिको मार्गे.
मी मागल्या वर्षी मेक्सिकोमध्ये प्रोजेक्ट करत होतो. मेक्सिकॅली नावाच्या अगदी सीमेवरच्या शहरात माझे प्रोजेक्ट होते. तिथून १००-१२५ किमीवर तिहुआना हे सॅन डिएगोच्या दक्षिणेचे शहर आहे. तिथेही येणे जाणे होत असे. मेक्सिकॅली तसेच तिहुआनाच्या हायवेवर बरेचदा इमिग्रन्ट्सचे कळप दिसत. पायपिटीने दमलेले, लिफ्ट मागत आशेने कोणीतरी बॉर्डर पर्यंत सोडेल या आशेने ट्रॅफिक आयलँडवर बसलेले लोक दिसत. हे सर्व मेक्सिकोच्या दक्षिणेच्या देशातून आलेले असत.
मेक्सिकन लोक यांना अजून एक पायरी कमी लेखतात. यातले अनेक युएसमध्ये कधीच जाऊ शकत नाहीत, मग ते मेक्सिकोतच रोजंदारी/रेस्तराँ/मजुरी कामे करू लागतात त्यामुळे मेक्सिकन लोकांचा त्यांच्यावर अजून खार.

हे बरेचदा जुजबी शिकलेले (हायस्कूल किंवा तेव्हडेही नाही), इन्ग्लिश न बोलता येणारे लोक असतात. एच१ वगैरेच्या कसोटीवर हे कधीच बसू शकणार नाहीत. त्यांच्या मायदेशात बरेचदा जिवाचा धोका असतो किंवा टोकाची गरिबी असते. म्हणून जीवावर उदार होउन ते अमेरिकेत येण्याचा प्रयत्न करतात.

ऑन अ साइड नोटः मी मेक्सिकॅलीत ज्या क्लायंट साठी काम करत होतो तिथे ऑफिस स्टाफ मध्ये जवळपास ८०% बायकाच. त्यातल्या बर्‍याच जणींनी डिलिवरीच्या काही दिवस आधी अमेरिकेत जाऊन डिलिवरी करवून घेतली होती. खूप खर्च येतो म्हणे. पण हा मार्ग सर्वमान्य दिसत होता.

>>अगदी गोरे 50% Hispanic 45% and legal and illegal immigrants 5% . थोडे कमी जास्त असेल पण साधारण असेच आहे. >> म्हणजे बर्‍यापैकी रिप्रेझेंटेटिव्ह आहे ना? ब्लॅक अजिबात नाहियेत का?
आम्ही रहायचो त्याच्या थोडं उत्तर - पश्चिमेला साऊथ एशिअन आणि एशियन बाजुला काढले तर कोणी उरेल का नाही अशी परिस्थिती होती.

>>फक्त आर्थिक सुस्थित असलेल्या 1st 2nd world देशाच्या नागरिकांनाच पार करता येते >> हे तितकंस खरं नाही. असायलम, डायव्हर्सिटी लॉटरी, संकटात सापडलेल्या देशांतील लोकांना व्हिसा इ. अनेक प्रकारे येता येते. स्किल्ड लेबर आणि पालकांचा भारतात जन्म असेल तर लांब रांग आहे यात काही वाद नाही. पण म्हणून थर्ड वर्ल्ड कंट्रींना येताच येत नाही हे खरं नाही.

बाळंतपण करुन जाण्यात लीगल लूप होल असेल तर ते कसं बुजवायचं ते काँग्रेसने ठरवावं. तो पर्यंत ते एक्सप्लॉईट करण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. (जसं टॅक्स लूप होल कोणी वापरण्यात गैर वाटत नाही)

लेख वाचतोय. अमेरिकेत येनकेन प्रकारे राहायला मिळावे म्हणून लोक कोणत्याही थराला जातात. कागदोपत्री खोटे लग्न कर आणि $५०,००० मिळतील, अशी मला ऑफर आली होती.

नेफ्लिवर immigration nation ही डॉक्युमेंटरी आहे त्यात टवणे सरांनी लिहिलं आहे ते दाखवलं आहे. बरेच लोक ह्या पायी प्रवासात मरतात असे दाखवले आहे.

बरीच आर्थिक सुस्थितीत असणारी मेक्सिकन कुटुंबातील लोक इथे येऊन बाळंतपण करतात इन्शुरन्सशिवाय हजारो डॉलर कुठून>>>
एखादी बाई लेबर मध्ये असेल तर हॉस्पिटल्स ना हे मॅडेटरी आहे कि त्यांनी पेशंटला अ‍ॅडमिट करून घेतलेच पाहिजे. अशीवेळी चाईल्डबर्थ हा इमर्जन्सी म्हणुन गणला जातो.
EMLTA law नुसार प्रायव्हेट/पब्लिक हॉस्पिटल्सना त्यामुळ त्या बाईला कुठलाही प्रश्न पैशाविषयी न विचारता अगदी नॉर्मल इंश्युअर्ड पेशंट प्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते. एकदा बाळ जन्मले आणि कॉम्प्लिकेशन्स नसतील म्हणजेच इमर्जन्सी नसेल तर प्रायव्हेट हॉस्पिटल्सना पुढची ट्रीटमेंट नाकारता येवू शकते. परंतु पब्लिक हॉस्पिटल्स टॅक्स पेअर्स च्या पैशातून आणि गव्हरमेंट च्या aid मधून चालतात. त्यांना पुढची ऑप्शनल ट्रीटमेंट नाकारता येत नाही.
नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर या केस मध्ये नॉन इंशुअर्ड पेशंट ला २४ तासात डिस्चार्ज देण्याचा ह्या हॉस्पिटलचा प्रयत्न असतो.
बरीच अनैंशुअर्ड लोक चॅरिटीला वगैरेतून बिल भरू शकतात. पण पेशंट काहीच काळजी करत नाहीत या गोष्टींची. हॉस्पिटल्स/कलेक्शन एजन्सी मागे लागतात पेशंट लोकांच्या कि चॅरिटीला अप्लाय करा. सेल्फ पे किंवा अनैंश्युअर्ड ही लोक अत्यंट मोठी डोके दुखी आहे आणि बरेचवेळा ही लोक bankruptcy जाहीर करून मोकळे होतात.
परंतु पेशंट स्यु करण्याची (जराही सेवेत कसुर झाली तर) किंवा दंड होण्याची शक्यता प्रचंड मोठी असते. EMLTA लॉ आणि जन्मानुसार अमेरिकन सिटिझनशीप मिळण्याचा लॉ खरोखरच रीवाईज करण्याची वेळ आली आहे.
आपण जे एवढे मोठे इंशुरन्सचे हप्ते भरतोय त्याला फार मोठे रिझन नॉन इंशुअर्ड लोक आहेत.(आपले भारतीय लोक पण इन्क्लुडेड आहेत. )

यूपी ,बिहारी जसे काही ही करून मुंबई मध्ये येतात च कारण त्यांच्या राज्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे.
तसे विकसनशील,आणि अविकसित देशातील नागरिक काही ही करून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत असतात.
कारण त्यांच्या देशात ते अमेरिका सारखे उत्तम जीवन जगूच शकत नाहीत.

उपमा समजली तरी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते: उत्तर प्रदेश, बिहार भारताचाच भाग असल्याने मुंबईत येण्याचा प्रयत्न करणे बेकायदेशीर नाही आणि त्याला कुणी अडवू शकत नाही. नायजेरिया, बांगलादेश इ अविकसित देशातून भारतात येणारे लोक आहेत.

>>आपण जे एवढे मोठे इंशुरन्सचे हप्ते भरतोय त्याला फार मोठे रिझन नॉन इंशुअर्ड लोक आहेत>> फार मोठे म्हणजे नक्की किती? काही डेटा आहे का जनरल विधान आहे?
नॉन इन्शुअर्ड म्हणजे लीगल आणि इल्लीगल दोन्ही आलेत. त्याचा दोन वेगळ्या बकेटचा डेटा ही द्या. इल्लीगल लोकांतले किती हप्ते भरतात आणि किती नाही? त्यांना हप्ते भरयची सोय किती ठिकाणी आहे (एलए, एसएफ वगळता).

इल्लीगल लोक बंद झाले तर विम्याचे हप्ते कमी होतील का? याची खात्री आहे?

बँकरप्सी जाहित करुन मोकळे झाले की यावेळची कटकट मिटली. ती हिस्ट्री रेकॉर्डवर असली की काय त्रास होतो? अर्थात सामान्य माणसाला. असामान्यांची बँकरप्सीची शिडी अमृतासमान असतेच.
विकीवर बघितलं तर Health care usage of undocumented immigrants is mostly not understood, little research has been done since the implementation of the Affordable Care Act. असं दिसलं.

>>जन्मानुसार अमेरिकन सिटिझनशीप मिळण्याचा लॉ खरोखरच रीवाईज करण्याची वेळ आली आहे.<< +१
इल्लिगल किंवा अन्डाक्युमेंटेड पेरेंट्सनी जन्माला घातलेली असा छोटा बदल करा. पण हे धाडसी विधान करुन तुम्ही इथल्या लिबरल्सचा रोष ओढुन घेतलेला आहे याची क्ल्पना तुम्हाला आली आहे का... Proud

>>आपण जे एवढे मोठे इंशुरन्सचे हप्ते भरतोय त्याला फार मोठे रिझन नॉन इंशुअर्ड लोक आहेत.(आपले भारतीय लोक पण इन्क्लुडेड आहेत. )<< परत +१
अनिंश्योर्ड मुळे टोटल हेल्थकेर वॅल्युच्या प्रमाणात कॉस्ट रिकुप होत नाहि. ती कॉस्ट कुठेतरी पासऑन करावीच लागते. त्यातला काहि पोर्शन फेडरल, स्टेट, लोकल गवर्न्मेंटकडे जातो, बाकिचा फिलँथ्रपिस्ट उचलतात. शेवटि उरलेला त्या वर्षात राइट ऑफ केला जातो, पण पुढच्या वर्षापासुन कॉस्ट झालेल्या लॉसच्या प्रमाणात वाढवावी लागते. या कॉस्टवर गवर्नमेंटचं नियंत्रण नसल्याने पुढे इंश्योर्ड्/अनिंश्योर्ड सगळ्यांना सरसकट त्याचा फटका बसतो. असं हे चक्र आहे...

ओबामाच्या अ‍ॅफॉर्डेबल केर अ‍ॅक्टने मूळात या कॉस्टवर निर्बंध आणायचे सोडुन सब्स्क्रायबर वाढवुन कॉस्ट खाली आणण्याचा तुघलकी कायदा अंमलांत आणला. म्हणजे रक्त भळाभळा वाहतंय पण हे जखमेवर डायरेक्ट प्रेशर देण्याऐवजी त्यावर बँडेड लावुन लोकांची दिशाभूल करतांयत. तर ते असो. हेल्थकेर लॉबी, सुपर पॅक इ. बराच मोठा झमेला आहे तो...

इल्लिगल किंवा अन्डाक्युमेंटेड पेरेंट्सनी जन्माला घातलेली असा छोटा बदल करा.
>>

का? बहुसंख्य देशात त्या देशात जन्माला आले म्हणून आपोआप नागरिकत्व मिळत नाही. आई वडिलांना जर नागरिकत्व मिळाले तरच मुलांना मिळते.

Pages