युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

अशी कशी आवडत नाही? बिर्याणी खाल्ली नाही तर जीवन व्यर्थ" असे पण झाले होते तिथे. त्या विरुद्ध तिथे मी खिंड लढवत होतो तिथे दोन दिवस>>> आठवलं आठवलं..सगळं आठवलं Proud
https://www.maayboli.com/node/77591

फोडणीच्या भाताचा महिमा पण गायला होता तिथं....मी फोभा पार्टीतच. आता बिरीराणी शाकाहारी नसतेच म्हटल्यावर करावीच कशाला शाकाहारी बिरीराणी? आणि तसंही फोभा भारी लागतोच.

शाकाहारी बिर्याणी उत्तम होते. बिर्याणी म्हणजे पुलाव मसालेभात म्हणण्यारांनी ह्या तीनही गोष्टी चाखल्या नसण्याची किंवा उडप्याकडे चाखल्या असण्याची दाट शंका आहे.

व्हेज बिर्याणी / शाकाहारी बिर्याणी अस कळणारं स्पष्ट नाव दिले असताना आक्षेप घेण्याचं कारण कळत नाही.
नावातून कुणाचीही फसवणुक होत नाही.

तरीही आक्षेप घ्यायचाच असेल तर फक्त मटण घालून केली ती वगळता इतर काहीही घालून केली (चिकन, अंडा, फिश, भाज्या) तरी आक्षेप घ्या. तो चूक/बरोबर बाजुला ठेवु पण निदान पक्षपाती आक्षेप नसेल आणि त्यावर चर्चा करता येईल, वेगळा धागा काढुन.

पनीर सॅलडमध्ये वापरताना कसे वापरावे? नेटवर पाण्यात उकळून ते रोस्ट करूनअश्या रेंजमध्ये मत वाचायला मिळालित.
पनीर हा प्रोटीनचा सोर्स म्हणून वापरावा लागणारे पण त्याच बरोबर फॅट जास्त खाऊ नये म्हणूनही काळजी घ्यायची आहे. तर काय करता येईल?

बिगबास्केट मध्ये Dream Oven लो फॅट पनीर आहे.
पण ते आमच्याकडे मिळत नाही, तिकडे मिळते का बघा.
किंवा स्किम्ड मिल्क पाकीट आणुन घरी पनीर बनवणे. कसे करावे युट्यूबवर आहेत व्हिडीओ पण मी नाही बनवले अद्याप कधी.
मी स्किम्ड मिल्क चे दही बनवून खातो.

एक कात्रज लो फॅट पनीर सुद्धा आहे. ते पुणे मुंबईत मिळत असेल.

टोफू चव आवडत असेल तर तो सुद्धा चांगला पर्याय आहे. फक्त नियमित सोया खाणे काही प्रॉब्लेम तर नाही ना यावर अजूनही उलट सुलट वाचायला मिळते. याबद्दल कुणी खात्रीशीर माहिती देऊ शकेल का?

१०० ग्रॅम टोफू मध्ये प्रोटीन्स १० ग्रॅम, फॅट ५ ग्रॅम
लो फॅट पनीर मध्ये प्रोटीन २५ ग्रॅम, फॅट ५ग्रॅम
म्हणजे तेवढेच प्रोटीन मिळवायला टोफू मधून २.५ पट जास्त फॅट मिळेल, पण तरीही ते नेहमीच्या पनीरमधील फॅट पेक्षा निम्मे असेल. शिवाय टोफु मध्ये सॅच्युरेटेड फॅट खूप कमी आहे, पनीर मधले बहुतेक सॅच्युरेटेड आहे. अनसॅच्युरेटेड फॅट चालेल म्हटले तर टोफु +.
डिस्क्लेमर: गुगलाधारीत ज्ञान, आकडे-एक्सपर्ट ओपिनियन घ्यावे.

गायीच्या दुधाचे पनीर बनवून वापरता येईल, म्हशीच्या दुधापेक्षा कमी फॅट असतात
पाककृतीची वाट लागणार नसेल तर, कमी फॅटच्या दह्याचे पाणी काढून चक्का वापरता येईल; दुधाची प्रथिने मिळतीलच
पनीर असेच कुस्करून घालायचे, कुस्कर्‍यात चवीसाठी सॉस / मसाले घालता येतील सॅलडच्या प्रकारानुसार

>>नवीन Submitted by जाई. on 26 February, 2022 - 03:16>>
पूर्वी माहेरी गवळ्याकडचे म्हशीचे दूध येत असे. तेव्हा आई पनीर करायला जे दूध वापरत असे ते साय काढलेले असे. २४ तसात ४ वेळा दूध तापवून दुसर्‍या दिवशी सकाळी सगळी जाड साय विरजण लावायला बाजूला काढायची आणि बिन सायीच्या दुधाचे पनीर करायची. शहरात रहायला आल्यावर पाकीटातून येणार्‍या गायीच्या दुधाचेही आई तसेच पनीर करत असे. ८ औस/१ कप दुधावर प्रयोग करुन बघा.

इथे दूध होमोजिनाइज्ड असल्याने साय वेगळी करता येत नाही. त्यावर उपाय म्हणून २ कप स्किम मिल्क + १/४ कप स्किम मिल्क पावडर असे एकत्र उकळवणे आणि विनेगर वापरुन पनीर अशी एक पाकृ मिळाली होती. ते पनीर चांगले होत असे. पण नंतर गावच्या दुकानातून स्किम मिल्क पावडरच गायब झाली , तेवढ्यासाठी कुठे शहरात जा म्हणून मग ते थांबलेच. तो पर्यंत लेकही भाज्या नीट खायला होता, पनीरचा एकंदरीत वापर कमी झाला त्यामुळे कधीतरी खायचे तर फुल फॅट वाले पनीर खाणे सुरु केले. हे सगळे १५-१६ वर्षांपूर्वीचे.

सॅलड मधे प्रोटिन सोर्स म्हणून पनीर वापरणार असल्यास जोडीला मोड आणून उकडलेले कढधान्य वापरल्यास गुणवत्ता वाढेल. अजून एक म्हणजे बिन सायीच्या दह्याचे रांच ड्रेसिंग वापरायचे. रांच डीप आणि जोडीला भाज्या असेही करता येइल.

थोडं मॅरीनेट (दही इ. घालून चिकन करतो तसच) करून ग्रिल केलेलं पनीर सालेड मध्ये छान लागते. त्यात कलिगडाच्या बारीक फोडी, किंचित जास्त भाजलेले मक्याचे दाणे, पुदिन्याची पाने छान लागतात. वसंता कुठे तडमडलाय? ये म्हणावं सालेड खायला!

सर्वांना धन्यवाद.
टोफू मी कधी खाल्ले नाहीये. सोयाबीनचा पर्याय चांगला आहे
माझ्याकडे अमूलच पनीर मिळत ते वापरते . त्यात काय काय घटक असतात ते बघितलं नव्हतं कधीच . आता प्रोटीनची गरज आहे म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिलाय पनीरचा वापर करा म्हणून. पण अस स्पेसिफिक पनीर कधीच खाल्लं गेलं नव्हतं. कधीतरी चव बदल म्हणून खायचा पदार्थ म्हणून पनीर खायचो एवढंच

सॅलड मधे प्रोटिन सोर्स म्हणून पनीर वापरणार असल्यास जोडीला मोड आणून उकडलेले कढधान्य वापरल्यास गुणवत्ता वाढेल. अजून एक म्हणजे बिन सायीच्या दह्याचे रांच ड्रेसिंग वापरायचे. रांच डीप आणि जोडीला भाज्या असेही करता येइल.
हा एक चांगला पर्याय आहे . थँक्स

थोडं मॅरीनेट (दही इ. घालून चिकन करतो तसच) करून ग्रिल केलेलं पनीर सालेड मध्ये छान लागते.
हा ! हे एक करून पाहीन

दुधाचे पदार्थ हे विनाकारण ओव्हर रेटेड पदार्थ आहेत , असे वाटते

त्यातले कितीतरी घटक इतर पदार्थात स्वस्तात मिळतात

खुद्द गाय फक्त चाराच खाते , ना पनीर ना चिकन खाते

Proud

खुद्द गाय फक्त चाराच खाते , ना पनीर…>>> ते तिचे जेवण आहे आणि कधी-किती खायचे तिला माहिती आहे.
मनुष्यप्राण्याची कथाच वेगळी! Happy

>> इथे दूध होमोजिनाइज्ड असल्याने साय वेगळी करता येत नाही. त्यावर उपाय म्हणून २ कप स्किम मिल्क + १/४ कप स्किम मिल्क पावडर असे एकत्र उकळवणे आणि विनेगर वापरुन पनीर अशी एक पाकृ मिळाली होती. ते पनीर चांगले होत असे. पण नंतर गावच्या दुकानातून स्किम मिल्क पावडरच गायब झाली , तेवढ्यासाठी कुठे शहरात जा म्हणून मग ते थांबलेच>> बापरे!!! किती एकेक प्रॉब्लेम्स ना तुमच्या गावात!! पण नेहमीचं दूध नीट उकळून त्यात लिंबू पिळूनही मस्त पनीर होतं. व्हिनेगर सांगितलं नाही कारण उद्या ते ही मिळायचं बंद झाल्यास काय घ्या..

सायो,
अगं तसे फार प्रॉब्लेम्स नाहीत. अमेरीकन पद्धतीचे नेहमी वापरायचे घटक मिळतात. त्यामुळे पांढरे विनेगर मिळते. मी पनीर करायला तेच वापरते. तो मिल्क पावडरवाला प्रयोग मी पूर्वी लो फॅट पनीरसाठी करायचे. नंतर होल मिल्कचेच पनीर करायला लागले. मिल्क पावडर, होल मिल्कची सहज मिळते, स्किम मिल्कची कधी मिळते कधी नाही. कारण खप नसेल तर ते स्टॉक करत नाहीत. आता शहरातून काय आणून ठेवायचे, गावातले काय स्टॉक करुन ठेवायचे याचे गणित बसलेय. आम्ही आणि आमचे अमेरीकन ,जपानी मित्र सगळेच सवयीने एकमेकांसाठी खरेदी करतो. पँडेमिक काळात तर आमच्या मित्रांनी त्यांच्या मोठ्या फ्रिजरमधे आमच्यासाठीही स्टॉक अप करुन ठेवले होते.

BLACKCAT , प्राजक्ता धन्यवाद. आणि तळताना काही काळजी घ्यायची का. मी तेलाचे मोहन आणि थोडा रवा घात्ला होता पण मऊ पडल्या होत्या . कणिक मात्र सैल भिजली म्हणून नंतर परत थोडी वाढवून मळली होती.

कणिक मात्र सैल भिजली म्हणून नंतर परत थोडी वाढवून मळली होती.>> एकदा सैल झालेली कणीक नतर सैलसर राहते तेव्हा कणीक सुरवातिलाच घट्ट मळावी लागते, तरी कणकेच्या मउच पडतात त्यामुळे रव्या-मैदाच्याच कराव्या . गोड पदार्थाला मोहन तुपाचच घालाव आणि तुपातच तळावे चवित खुप फरक पडतो, हव तर पोर्शन कन्ट्रोल करावा कारण एकदरित मेहनत तेवढिच लागते,कॅलरीतही फार फरक पडत नाही ( सारणात असतेच गोड)

भरत, प्राजक्ता , देवकी धन्यवाद. पुढच्या वेळी करताना लक्षात ठेवेन. तुपात तळणे जमेल कि नाही सांगता येत नाही पण मोहन नक्की वापरेन.

Pages