अदृश्य मित्रास

Submitted by 'चंद्र'शेखर पालखे on 22 August, 2020 - 03:43

अदृश्य मित्रा

हे मित्रा
आभारी आहे मी तुझा
तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
अगदी माझ्या जन्मापासून
तू आहेस माझ्या सोबत
आणि पुढेही राहशील
याची खात्री आहे मला
(अर्थात मृत्युपर्यंतच)आणि
हे ही मान्य आहे मला
पण म्हणावीशी देवाणघेवाण
झाली नाही अजून आपल्यात
पण तू तर तुझं सर्वस्व दिलयंस मला
देवाण तर पूर्ण झालीये
आता घेवाणीबद्दल बोलूया
तुला नावाजण्यासारखं, आणि
वाखाणण्यासारखं अजूनतरी
काहीच घडलं नाहीये
माझ्या या करंटया हातुन
पण मी नक्की करीन प्रयत्न
तू माझ्याशी प्रामाणिक असेतोवर
एक प्रश्न विचारू तुला?
-
हे आयुष्या--
तू किती काळ आहेस माझ्याबरोबर?
आणि असलास तरी
तशी संधी मिळणारय का मला?
आज खात्री देतो मी तुला
मीही असेन तुझाच
तुही फक्त माझाच असेपर्यंत
असो- माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
आणि अजूनही असल्याबद्दल पुन्हा एकदा
खूप खूप आभार-
थँक्स
तुझाच

शेखर
070620

Group content visibility: 
Use group defaults