||गणपती बाप्पा मोरया||

Submitted by Happyanand on 22 August, 2020 - 02:03

श्रावणाची गेली सरून सर ही तांडवी
मेघांनी ही घेतली उसंत जराशी
नितळ झाले आभाळ सारे
धरतीस भेटण्या सुर्य क्षितिजा वर
घेऊन तांबूस उन कोवळे
लगबग लगबग साऱ्यांची
येणार कोणी पाहुणा जणू
आरास झाली नी विद्युत रोषणाई
सजावटी ची किती ती घाई
पात मांडला केवडा आणला
आणली प्रिय त्याची दुर्व्याची जुडी
प्रिय त्याच्या मोदकांनी घेतली
उकडीपात्रात उडी
सण हा प्रिय फार नेहमी
ग्रहण कोरोना चे लागले
दिमाखात वाजत गाजत येणारे
बाप्पा आज शांत च आले
येऊन बसले पाटावरी
आई मोदकाचा प्रसाद करी
प्रसाद चढवून पाय धरले
पदर लावून डोळ्यांना आई ने विचारले
जाईल कधी हा रोग सारा
फुंकून नेला ज्यांना कित्येंकांचा प्राणवारा
आशीर्वाद देऊन बाप्पा गोड हसले
पुरातन काळी कित्येक मारले मी दैत्य असले
जाता जाता झोपवून जावू या कोरोना ली ही गाढ
भूक लागली तू मोदक वाढ...

||गणपती बाप्पा मोरया||

–Anand

Group content visibility: 
Public - accessible to all site users