अव्यक्त!!!

Submitted by 'चंद्र'शेखर पालखे on 17 August, 2020 - 10:38

आतमधून, अगदी आतमधून
उचंबळून आल्या शिवाय....
भावनांच्या लाटेवर उंचच उंच
स्वार झाल्या शिवाय ...
शब्दांचा कोंडमारा मनात
असह्य होत असला तरीही
उतरत नाही एखादी कविता
कागदावर अलगद हळुवारपणे
मी वाट पाहतोय तिच्या जन्माची
सहन होईनाशा झाल्यात आताशा
या कळा.... किती काळ????
मी अव्यक्त राहतोय अजूनही..
तिच्यासाठी नाही निदान माझ्यासाठी तरी
प्रसवावं तिनं स्वतःला लवकरच
म्हणजे मी होईन रिकामा
एखाद्या नव्या कवितेच्या वेणांसाठी...

060420

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर ..