टि.बी मधून बाहेर पडताना भाग 3

Submitted by Rohini Sable on 15 August, 2020 - 08:06

माफ करा.भाग तिसरा पोस्ट करायला खुप उशीर झाला. आणि मला फुफ्फुसांचा टि.बी झाला होता.
भाग तिसरा.
सोमवारी आम्ही कुपर होस्पिटल ला गेलो. तिथे सर्व टेस्ट केल्या. या मध्ये 3 दिवस गेले. आणि रिपोर्ट पोसिटीव्ह आला.मला फुफ्फुसांचा टि.बी झाला होता. रिपोर्ट हातात आल्यावर मी गच्च डोळे मिटुन घेतले. आणि मनाची तयारी केली. मग डॉक्टरांनी सांगितले घरी च उपचार होऊ शकतात.मला 6 महिने लागतील यातून पूर्ण बरी होण्यासाठी. फक्त काळजी घ्यावी लागेल खुप. सर्वापासून अंतर ठेवावे लागेल. बाळाला दुध पाजता येणार नाही. भरपूर जेवण करावे लागेल. व्यायाम करावा लागेल. आणि महत्त्वाचे म्हणजे जरी बरे वाटले तरी औषध घ्यायचे बंद करायचे नाही.6 महिने औषधे पूर्ण घ्यायचे. मग झाला माझा टि.बी ला हरवण्याचा कार्यक्रम सुरु.........
मला रोज 9 गोळ्या खायच्या होत्या.3गोळ्या टि.बी च्या होत्या. आणि बाकीच्या अशक्तपणा कमी होण्यासाठी. गोळ्या शक्यतो सकाळी उपाशीपोटी च घ्यायच्या असतात.3 तासानंतर त्यांचा असर चालू होतो. खूप जेवण करावे लागते. नाहीतर तुमच्या शरीराला या गोळ्या पचवायला खूप जड जाते. इथे मी तुम्हाला माझा आहार सांगते.
सकाळी नाष्टा--------- 2सफरचंद,1संत्री 2 केळी. 1 ग्लास दूध, 2 उकळलेली अंडी.
11 वाजता------------ चपाती पालेभाजी ,भात ,डाळ
2 वाजता ------------- भाकरी ,चिकन आणि भात
4 वाजता ------------ चहा आणि पारले बिस्कीट
6 वाजता---------- 2 सफरचंद ,संत्री, केळी आणि द्राक्षे.
9 वाजता ---------- 2 उकळलेली अंडी, भाकरी, फिश/मटण/चिकन
11 वाजता परत 1 सफरचंद.
( टि.बी पेशंट ला भरपूर मांसाहारी जेवण खावे लागते. स्पेशली उकळलेली अंडी.)
जास्त तिखट नाही, तळलेले नाही, बेकरीचे पदार्थ नाही, थंड पदार्थ नाही ,बाहेरचे पदार्थ नाही खायचे. पाणी पण उकळून प्यायचे.
व्यायाम...........
रोज सकाळी 1 तास कोवळ्या उन्हात बसणे खूप गरजेचे आहे.( कारण औषधांमुळे हाडे कमजोर होतात.)
तसेच रोज सकाळी चालणे.( कारण औषधांमुळे सांधेदुखीचा त्रास होतो.)
जड अजिबात उचलायचे नाही.जमेल तेवढेच काम करायचे. कारण या आजारामध्ये शरीराची खूप झीज होते.
खोकताना, बोलताना, शिंकताना तोंडावर रूमाल धरावा. मास्क सहसा वापरु नये,कारण त्याने खोकला वाढतो.( निदान माझा तरी अनुभव असाच आहे.)
जास्त बोलू नये.कारण बोलण्यामुळे आपली एनर्जी कमी होते.जेवढे शांत राहता तेवढे चांगले.
ताण तणाव अजिबात घ्यायचा नाही. कारण डिप्रेशन मधे जाऊ शकता.( मी डिप्रेशन मध्ये गेले होते.) सारखे मन कशात तरी रमवावे.संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरायला जा.
औषधांचा दुष्परिणाम
उपचार मधे च बंद केले तर टि.बी पुन्हा होऊ शकतो.
उपाशी राहून जर गोळ्या खाल्ल्या तर लिव्हर खराब होऊ शकतो.
उपचार जास्त दिवस चालले तर किडनी खराब होऊ शकते.
दिसायला कमी येते
ऐकायला कमी येते.
कोवळ्या उन्हात न बसल्या मुळे हाडे कमजोर होतात.
सांधेदुखी वाढते.
मी 6 महिने योग्य ती काळजी घेतली आणि औषधे वेळच्यावेळी खाल्ली म्हणून मी पूर्ण बरी झाले.
म्हणून मी सर्वांना सांगत आहे कि भरपूर जेवण करा. व्यायाम करा आणि आनंदी राहा. टि.बी फक्त ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना च होतो. त्यामुळे नेहमी हसत राहा. तंदुरुस्त राहा.
मी फक्त माझा अनुभव सांगितला आहे.टि.बी खूप प्रकारचे असतात. मी त्या बद्दल पन लेख लिहून पोस्ट करेन .मला वेळ मिळेल तसा.
टि.बी च्या उपचारासाठी सरकारने डॉट्स हि उपचार पद्धत अवलंबली आहे. या मधे मोफत उपचार होतात. आणि सरकार टि.बी पेशंट ला दर महिन्याला 700 रुपये देते. आणि मोफत राशन देते.
चला मग काळजी घ्या. आणि कोणाला टि.बी झाला तरी अजिबात घाबरून जावू नका. मनाची तयारी करा आणि लढा ..
टि.बी हारेगा ..देश जीतेगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलेल्या परिस्थितीवर मात करण्यात तुम्ही यशस्वी झालात अभिनंदन!
आता सगळं डोक्यातून काढून टाका नाहीतर नेहमीच घाबरुन राहाल. छान आनंदी रहा आणि बाळाला भेटल्यावरच्या भावना कशा होत्या ते जरुर लिहा... Good luck

Pages