स्पर्ष

Submitted by गुरूदीप on 13 August, 2020 - 12:50

मनावरचे स्पर्श..
जसं काही मोरपीस,
तनावरचे स्पर्श..
जसं काही धुलीकण,
एक विसरता विसरत नाहीत, अन्
एक झटकता झटकत नाहीत.

हळूवार आठवणींचे स्पर्श..
जसं काही अत्तराची कुपी,
नेहमी हवेसे स्पर्श..
जसं काही जगण्याची शिदोरी,
एक सापडता सापडत नाहीत, अन्
एक टिकवता टिकत नाहीत.

स्पर्शांच्या दुनियेत हरवून पहा..
जमलं तर पुन्हा, स्वत:ला शोधून पहा..
गवसले तर, पाकळी वरील प्रकाशकणाचे स्पर्श.. अन्
हरवले तर, वहीतील मोरपीसाचे शब्दांना स्पर्श..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults