पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 05:43

नमस्कार मायबोलीकर,

यावर्षीचा आपला मायबोलीचा बाप्पा २१ वा! आणि २१ म्हंटले की बाप्पाचे आवडते २१ मोदक आलेच. म्हणूनच यावर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मोदक बनवण्याची स्पर्धा. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सर्वच घरात मोदक बनवले जातात. त्या बनवलेल्या मोदकांचाच छान सजवून आणि फोटो काढून तुम्ही पाठवायचा आहे.

kujbuj_modak.jpg

यात फक्त उकडीचेच नाही तर सर्व प्रकारच्या मोदकांचा समावेश होईल.. खवा, सुका मेवा, fusion, पारंपारिक उकडीचे मोदक, तळणीचे मोदक इ. तसेच मोदकांशी साम्य असलेले व्हेज मोमोज ही चालतील.

नियम-
१) मोदक स्वतः बनवायचे आहेत. बाहेरून विकत आणलेल्या मोदकांची प्रवेशिका आढळून आल्यास बाद ठरवण्यात येईल.
२) पाककृती स्वतः तयार केलेली असावी.
३) पाककृती मध्ये वापरण्यात येणारे पदार्थ शाकाहारी असावेत.
४) मिठाई, खवा इ. मोदक बनवताना अत्यंत आवश्यकता असेल तरच साचा वापरावा. उकडीचे मोदक बनवताना साच्याचा वापर करू नये.
५) स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट २०२० पासून तुम्ही पाठवू शकता. (IST)
६) एक id प्रत्येकी २ प्रवेशिका देऊ शकेल.
७) स्पर्धा महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी खुली आहे.
८) पाककृतींचे step by step किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
९) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - {तुमचा आयडी}"
१०) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

विजेते मोदकांचा सुबकपणा, त्यांच्या कळ्या इ. निकषांवरून पोल घेऊन ठरवण्यात येतील.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच शंका मामी
Biggrin Biggrin Biggrin कारण आमच्या इथे असेच कलात्मक पद्धतीने मोदक करत असतो. त्याला अनायासे जनमानसात (घरातल्या) स्थान निर्माण होईल. Wink

छान आहे स्पर्धा संयोजक .

मला फक्त उकडीचे मोदक बनवताना साचा का वापरायचा नाही ते कारण कळलं नाही .

<७) स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट २०२० पासून तुम्ही पाठवू शकता. (PST) >

नेहमी स्पर्धेची सुरुवात IST प्रमाणे होते (लवकरची वेळ ). आणि अंतिम मुदत PST प्रमाणे असते. असो.

प्रवेशिका पाठवायची अंतिम मुदत ?

प्रवेशिका पाठवायचं म्हणजे काय करायचं?

संयोजकांना ईमेल करायची? / या धाग्यावर फोटो टाकायचे? / स्वतंत्र धागा उघडून तिथे फोटो टाकायचे?

<५) ऑनलाइन स्पर्धा असल्याने विजेती प्रवेशिका ठरवताना पाककृतींचे सादरीकरण हा मुद्दा ही विचारात घेतला जाईल.>

घाबरत घाबरत विचारतो. विजेती प्रवेशिका कोण ठरवणार आहे?

<<<तिखट मोदक मोमोज पेक्शा जरा वेगळे असतात Happy रस्स्यात टाकून बनवले जातात. > म्हाळसा तुमची प्रवेशपत्रिका येऊ देच Happy

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 21:09
>>> हा प्रतिसाद वाचूनही शंका वाटते का विजेत्याबद्दल . Wink

मला तरी संयोजकांचा उतावळेपणा खटकला. म्हाळसा यांच्याव्यतिरिक्त अजून कोणालाच हे माहीत नसेल काय Uhoh
असो,

शुभेच्छा

मला नाहि वाटत, आधीच दिलेली कृती चालेल.
आणि, पारंपारीक मोदक कुठल्या निकषावर बक्षिसपात्र ठरव्णार? कळ्या की आकार की कशावर?

आणि, नुसत्या फोटोवरून, मोदक हाताने वळले की कशाने ते कसे कळणार?
आणि लाईव मध्ये नुसता लोचा असु शकतो....

बरोबर रुल्स नाही दिलेत.

प्रवेशिका पाठवायची अंतिम मुदत ?

प्रवेशिका पाठवायचं म्हणजे काय करायचं?>>>>>>>>
स्पर्धा लवकर जाहीर करण्याचा हेतू हा होता की स्पर्धकांना स्पर्धेसाठी लवकर तयारी करता येईल. भाग घेण्यासाठी आवश्यक तेवढे नियम देण्यात आले आहेत. प्रवेशिका कुठे द्यायची इ. आम्ही लवकरच अपडेट करू. बनवलेल्या मोदकांवरून ते साच्याने बनवले आहेत की हाताने हे सहज कोणालाही समजते. विजेते मोदकांचा सुबकपणा, त्यांच्या कळ्या इ. निकषांवरून पोल घेऊन ठरवण्यात येतील. यावर्षीच्या संयोजन मंडळात बरेचसे सदस्य नवीन आहेत. मायबोलीकरांनी कृपया सहकार्य करावे.

झंपी , अगं लोक अपलोड करताना सांगतील कि साचा वापरलाय कि हाताने केलेत ते. कोण एवढ खोट बोलायला जाणार आहे. सगळं हे हौसेखातर भाग घेणारी लोक. आणि त्यातूनही कुणी खोट बोललं तरी मायबोलीकर इतके चाणाक्ष आहेत कि हाणुन पाडतील तो बेत. Happy

सगळ्यात प्रथम मोदक/मोमो बायकोने बनवलेले चालतील की आपणच बनवले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त व्हेज मोमोज हवेत की नॉनव्हेज मोमोज पण चालतील. आमच्याकडे कोकणात गौरी बसतात त्यावेळी मटणाचा बेत असतो म्हणून विचारलं.

छान आहे स्पर्धा... वैविध्यपूर्ण मोदक कळतील.
@ संयोजक ---- मूळ पोस्टमधील ---
** यात फक्त उकडीचेच नाही तर सर्व प्रकारच्या मोदकांचा समावेश होईल.. खवा, सुका मेवा, fusion, पारंपारिक उकडीचे मोदक, तळणीचे मोदक इ. तसेच मोदकांशी साम्य असलेले व्हेज मोमोज ही चालतील.
** ३) पाककृती मध्ये वापरण्यात येणारे पदार्थ शाकाहारी असावेत.
** ४) पाककृती स्वतः तयार केलेली असावी.

हा मजकूर ठळक केला तर चटकन लक्षात येईल आणि
मोदक करणे हे कौशल्याचे असल्याने स्वतःच करायचे की घरातल्या बायका / इतर पाककुशल सदस्यांनी ( पण कुटुंबातीलच) केलेले चालतील हे स्पष्ट करा म्हणजे संभ्रम रहाणार नाही.

मोदकाच्या सुबकता आणि कळ्या याबरोबरच त्याची कृती / साहित्यातील नावीन्य हेही विजेता ठरवताना पाहिले जाईल बहुतेक? की नाही? हाही मुद्दा नियमात लिहीता येईल.

शुभेच्छा.

सीमा,
बरोबर आहे तुझे की, कोणी खोटं बोलणार नाही पण लाईव विडिओ बघायला मजा ज्यास्त येइल. एक निकष ठरवता येइल की,
कोणी पटकन बनवले( किती वेळात किती केले? कोणाचा मोदक सुबक होता?
फोटोत ती मजा नाही. हे पारंपारीक मोदकांना परीक्षण करताना सोपे जाईल.
बाकी, जिन्नसात नाविन्य असेल तर तो एक निकष ( जिन्नस काय वेगळे होते वगैरे) असेल.
बघु, काय ठरवतात संयोजक.

संयोजक, नवीन आहात म्हणून समजून घ्यायलाच बसलोय इथे म्हणून सुचवतोय. राग नसावा. Happy

साहित्य आणि कृतीतील नाविन्य यामध्ये काही सुचलं आहे. देऊ/सुचवू का आता? म्हणजे की यावर प्रयोग करतील नव मायबोलीकर.

बोकलत, नियम क्र 3 वाचा. पहिल्या दिवसापासून तो नियम आहे यादीत. लोकसुद्धा ना!! Uhoh

रस्श्यातील मोदक किंवा मोदकाची आमटी यालाच काही ठिकाणी बहुतेक उंबराची आमटी किंवा कालवण म्हणतात. पण हा प्रकार टिपीकल 'मोदक' या प्रकारात येईल का?

किती सुंदर सुंदर.. रंगीबेरंगी.. मोदक बघायला मिळतील. सोनेरी.चंदेरी..चॉकलेट..अंजीर..मँगो..गाजर..बीटरूट ..उकडीचे ..तळणीचे...तिखट..नवीन इन्व्हेंशन..
Zampi तो मोदकाचा फोटो skymetweather साईट वर आहे..

मोमोज चालतील म्हटलं असलं तरी तिखट/नॉन गोड मोदक चालतील असं अटींमध्ये स्पष्ट लिहावं असं वाटतं
सध्या ते 'गृहीत' आहे.शिवाय कांदा लसूण चालतील चालणार नाहीत याबद्दल काही स्पष्ट विचार असल्यास तेही लिहावे.

नॉन गोड मोदक चालतील >> + १०० नॉन-गोड उर्फ कडू/तुरट्/आंबट इ मोदक वेगळा प्रकार होईल. (कडू- तुरट-आंबट तर च्यवनप्राश शिवाय काही आठवेना ह्या घटकेला. मायबोलीकर भन्नाट आयडीयेच्या कल्पना करून नवे प्रकार करतील असे वाटते.)

फोटो बघून काय कळणार तिखट का गोड...>> पाकृ सुद्धा द्यायची आहे ना... (?) पाकृ स्वतः केलेली असावी असा नियम आहे.

खरंच
मायबोली वर जबरदस्त उकडीचे मोदक करणारे मायेस्रो मेंबर आहेतच, त्याशिवाय वेगवेगळे इतर मोदक करणारे नवे कलाकार आणि नव्या कलाकृती जन्माला याव्यात(मी फक्त स्वतःसाठी फिल्डिंग नाही लावतंय हां)

नियमांमध्ये कोणत्याही प्रकारचे मोदक चालतील असा उल्लेख आहे. त्यामुळे पाककृतीत वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर कोणत्याही मर्यादा नाहीत. फक्त पाककृती शाकाहारी असावी ही अट आहे. पाककृती स्पर्धा असल्याने सोबत सविस्तर कृती देणे आवश्यक आहे.

किती शोधून शोधून शंका विचारतायत लोक्स!

:इथे इतक्या शंका विचारणाऱ्यांतले किती जण प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेतायत हे बघायला उत्सुक असणारा इमोजी:

Pages