सांगड

Submitted by अविनाश राजे on 6 August, 2020 - 12:22

भूताच्या पारड्यात वर्तमान तोलू नये
तसेच
वर्तमानाच्या फुटपट्टीने भूताला मोजू नये

वेगळेच असू द्यावे दोघांना

अगदीच कधी भासलीच गरज
भूत वर्तमानाची सांगड घालण्याची तर

डोळे बंद करून नाक मागे फिरवून
घ्यावा एक सखोल श्वास

येऊ द्यावा सुवास

मग हात धरून वर्तमानाचा
न्यावे त्याला
एखाद्या सुगंधी कप्प्यात भूतकाळाच्या

Group content visibility: 
Use group defaults