़योतिबा सवित्रि मुक्त सवाद

Submitted by mohini hedaoo on 6 August, 2020 - 01:25

ज्योतिबा ..सावित्री..मुक्तसंवाद!

मोहिनी किंहीकर हेडावू
ज्योतिबा___ काय झाले? कसला विचार करत आहेस?

सावित्री __काही नाही. वर्तमानपत्र वाचत होते .एका नवऱ्याने आपल्या बायकोला चौदा वेळा गर्भपात करायला लावला. काय तर म्हणे मुलगा हवा होता .वंशाचा दिवा पाहिजे होता .
ज्योतिबा__ आता मेडिकल सायन्स इतके पुढे गेले आहे की; त्यामुळे गर्भलिंग ओळखून गर्भ पाडण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि मुख्य म्हणजे यात जास्त डॉक्टर ,सुशीक्षित मंडळी सामील आहेत .,याचा जास्त वाईट वाटतं. काय हे वागणं? काय त्या शिक्षणाचा उपयोग ?
काही स्त्रियांवर जबरदस्ती होत असेल तर काही नाईलाजाने करत असतील !
आपल्या पुण्यात काढलेला बालहत्या प्रतिबंधक गृहाची गरज आहेच. जागोजागी, शहरात, खेड्यात गरज आहे. त्या बिचार्‍या विधवांचे पाऊल वाकडे पडले की त्यांना घरातून हाकलून लावायचे .समाज ही त्यांना बहिष्कार घालायचा .आता मात्र एवढी वाईट स्थिती नाही. मला वाटते आता खूप झाले शिक्षण देऊन! आता शाळा उघडायच्या " मूल्य शिक्षणाच्या "त्यामुळे येथे माणसाला माणूस म्हणून वागणूक देऊ शकेल .स्त्री पुरूष समानता, स्त्री सन्मान ,सामाजिक समानता ,सचोटी, प्रामाणिकपणा ,सभ्यता याचे धडे द्यावे लागेल .तुला काय वाटतं ,सावित्री ?

सावित्री __ही की, तुमचेही बरोबरच आहे. मला वाटते की, "शेतकऱ्यांच्या असूडात "
शेतकऱ्याची दुरावस्था ,तुम्ही पाहिली ती आजही स्वातंत्र्याच्या पासष्ट सत्तर सालानंतर तशीच आहे विदर्भातील शेतकऱ्यांचा अत्म हत्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललय !स्वातंत्र्य मिळाले, पण शेतकरी अजूनही बँका, सावकारांच्या गुलामी मध्ये च आहे. त्यांच्यासाठी आपण काही करायचे का.?

ज्योतिबा__ मला वाटतेआहे रे ,नाही रे यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर मार्केट तेजीत तर शेतमालाला रास्त भाव मिळत नाही .अशी स्थिती आहे. या बजेटमध्ये सॉफ्टवेअर स्वस्तझाले. तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या. मला वाटते इस्राएल चे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून सामुदायिक शेती करावी .सर्वांना देशप्रेमाचे धडे मिळावे. जेणेकरून सर्व मालमत्तेचा वापर योग्य रीतीने होईल. उद्योगधंद्यांसाठी योजना असतात ,कर सवलती असतात, तसेच शेतीमालासाठी मिळाल्या पाहिजेत,वीज,पाणी, खते अशी साधने मोफत मिळाली पाहिजेत.
चला उठ,
सावित्री '__कुठे ?

ज्योतिबा '__अग पृथिवर परत जाऊया. तू तिथे मुल्या
शिक्षणाचे धडे दे व की शेतकऱ्यां चे मनोबल वाढविण्याचे काम करीन.

सावित्री '__चला चला लवकर चला!

Group content visibility: 
Use group defaults