तु पण समजून घे ना!

Submitted by paras_KB on 5 August, 2020 - 06:50

आयुष्यात पुढे जाता जाता,
मागे बरंच काही सुटून जातं,
हे मी समजून घेतलय,
तु पण समजून घे ना!

मागे बरंच काही सुटलं तरी,
त्याच नात्यांनी ,मीत्र , मैत्रिणींनी,
दिलेलं बळ मात्र सोबत असते,
हे मी समजून घेतलय,
तु पण समजून घे ना!

नाही होता येत प्रत्येकाला व्यक्त,
नाही मिळत प्रत्येकाला ती योग्य वेळ,
आणि कधी तर शब्दच करतात परके...
हे मी समजून घेतलय,
तु पण समजून घे ना!

कशाला उगाच कुढत जगायचं ?
आनंदाने सगळ्याच क्षणांचं स्वागत करायचं...
ध्येय साध्य करतांना, जीद् द महत्वाची,
कशाला दुःख , वेदना कुरवाळत बसायची?
आनंदी जीवन जगणं हे महत्त्वाचे,
हे मी समजून घेतलय,
तु पण समजून घे ना!

Group content visibility: 
Use group defaults