भूक

Submitted by विशाल कुलकर्णी on 5 May, 2009 - 01:37

भडकलेल्या..
चितेने ... हळूच पुसलं
लवलवणार्‍या ज्वालेला..
स्वार्थाच्या ...
लालसेच्या...
सखे...
तुझी भूक
नेहेमीच,
का गं भडकलेली ....?
उभा माणुस पचवूनही
क्षुधा तूझी
निरंतर पेटलेली
माणसाबरोबर
माणुसकीलाही स्वाहा केलेस
आणि तरिही
तुझी नजर आता
त्याच्या स्वप्नांवर रोखलेली !

विशाल

गुलमोहर: 

छान Happy

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

आवडली.

हम्म्म.....
तुझी नजर आता
त्याच्या स्वप्नांवर रोखलेली !
सत्य... विदारक सत्य.

छान आहे कविता विशाल ..

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

सुंदर
................................................................................................................
तुझमे रब्ब दिखता है यारा मै क्या करु, सजदे सर झुकता है यारा मै क्या करु

क्षुधा तूझी
निरंतर पेटलेली
तुझी नजर आता
त्याच्या स्वप्नांवर रोखलेली !
यमक मस्त जुळवलास
छान आहे कविता फार भिडली मनाला ....

भडकलेल्या..
चितेने ... हळूच पुसलं
लवलवणार्‍या ज्वालेला..
जरा जास्तच भडक झाल्यासारखं नाही वाटत का विशालदा...?
-------------------------------------------------------
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
माझ्या कविता...इथे बघा..
http://www.destiny-kavyanjali.blogspot.com
----------------------------------->>

तुझी नजर आता
त्याच्या स्वप्नांवर रोखलेली !
जबरदस्त. विशालछाप!
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

भडक सत्य...
चांगलीच जमलेय कविता....

त्याशिवाय वास्तवाची दाहकता कशी येणार त्यात सतिषभाऊ ? Happy
____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

विशालजी,
कविता खूप आवडली. किंचित अपूर्ण वाटली.
का समजले नाही.. कदाचित माझेच समजून घ्यायला चुकले असेल.
प्राजु
http://praaju.blogspot.com/

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" आणि तरिही
तुझी नजर आता
त्याच्या स्वप्नांवर रोखलेली !---
जिंकलस रे! "