हळूहळूच सरेल

Submitted by अविनाश राजे on 31 July, 2020 - 11:05

हळूहळूच सरेल
हे दुःख ओसरेल

मिळे थेंबाने सुख
कसा मनघट भरेल

काळोखाला जाळ
उजेड मगच झरेल

स्पर्श पुसटसा पण
रोमरोम स्मरेल

जो वजा मनातून
त्याचे शून्य उरेल

Group content visibility: 
Use group defaults