त्याचीच ती :५

Submitted by रिना वाढई on 31 July, 2020 - 10:16

मागील भागात आयशा आणि अर्जुन बस-स्टॉप वर भेटतात ,अर्जुन तिच्या जोडव्यांकडे एकटक बघत असतो . याचाच अर्थ कि आयशा च लग्न झालेलं आहे पण कुणाशी ? केव्हा? मग अर्जुन च काय . तर या भागात आपण बघू या .

अर्जुन आधीच तुला यायला उशीर झालेला आहे ,मला लवकर पोहचायचं होत घरी . अर्जुन आयशाच्या बोलण्याने भानावर आला . हो आयशा खूप उशीर केला मी . त्या दिवशी तुला समजून घेण्यासाठी खूप वेळ लावला होता मी . इतका उशीर का होऊ दिलीस तू आयशा . अ गं माझा स्वभाव तर

तुला चांगलंच माहिती आहे , तरी का अशी सोडून गेलीस तू . अर्जुन , मी तुला सोडून गेली ???? आताही तुला हे च वाटतं कि त्यादिवशी मी तुला सोडून गेली . आयशा च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . अर्जुन मध्येच तिला तोडत होता ,पण आयशा ला आता सविस्तर बोलायचं होत त्याच्याशी

. पण ती जागा बोलण्यासारखी नव्हती . एवढ्या दुरचा प्रवास करून आल्याने ती जरा थकलेलीच होती . म्हणून अर्जुन ने जवळच्या एका हॉटेल मध्ये कॉफी साठी तिला विचारलं . ती स्वतःला सावरत हो म्हणाली . कॅफे मध्ये बरीच गर्दी होती . शेवटचं एक टेबलं खाली होता . दोघेही तिथे जाऊन

बसले . अर्जुन ने वेटरला बोलावून दोन कॉफी ची ऑर्डर दिली . थोड्या वेळातच कॉफी आली . आयशा ने तोंडाला लावतच पुन्हा बोलण्यास सुरुवात केली .

अर्जुन, त्या दिवशी साहिल ने आपल्या दोघांना गच्चीवर सोबत पाहिलं . तुला तो आदर्श मानत होता त्यामुळे तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्याला . ताईच्या लग्नामध्ये तो कुणाला काही सांगू शकला नाही . पण कुठेतरी मनात बोचत होती त्याला मी . आपल्या दोघांचं नातं त्या निर्मळ

झऱ्यांच्या पाण्यासारखं स्वच्छ होत . पण गावातल्या लोकांना हे पटवून देणे म्हणजे बैलांसमोर पुंगी वाजवण्यासारखंच होत . लग्न होऊन दोन-तीन दिवस झाले , तरी साहिलने कुणाला काहीच सांगितलं नव्हतं . तू म्हणत होतास कि भाऊ आहे तो माझा , समजून घेईल मला तो . पण तरीही

माझ्या मनात मात्र एक भीती होतीच . आणि ती भीती खरी ठरली होती . वादळासारखं त्या दिवशी निघून गेलास तू माझ्या आयुष्यातून अर्जुन . मी तुला समजावत राहिले , तुला न केलेल्या गुन्ह्याची माफीही मागितली पण तू .... तू काही ऐकायला तयार नव्हतास त्या दिवशी .

साहिल तुला एकट्यात भेटला होता . तुला खरीखोटी सुनावला होता त्यादिवशीसाठी आणि जर तू मला सोडला नाहीस तर मी हि तुझ्याच मार्गावर चालणार याची धमकी देत तो बोलला कि , दादा तू आमच्यापेक्षा मोठा आहेस . आई-बाबा,ताई सगळ्यांच्या नजरेत तू प्रामाणिक आहेस . पण ह्या

मुलीने फसवलं तुला . जर तू हि ला सोडला नाहीस तर मी हि अशीच एखादी गर्लफ्रेंड बनवणार . कारण यात तुला काही वाईट नाही वाटत तर आम्ही पण आमच्या लाईफ मध्ये एन्जॉय करून बघणार . आणि हि आयशा किती लोकांना सांगत फिरत आहे कि तू आणि ती रिलेशनशिप मध्ये आहे

म्हणून . आज ना उद्या हे सगळं प्रकरण घरी माहिती पडेल . तूच ठरव घरच्यांना काय ऊत्तर द्यायचं . अर्जुन तू पूर्णपणे गोंधळून गेला होतास साहिल च्या बोलण्याने . तुझ्या तोंडातून एक शब्द हि बाहेर पडू शकलं नव्हतं तेव्हा . तो तुझ्यावर शब्दांनी सपासप वार करत होता आणि तू फक्त

रक्तबंबाळ झालास . त्याला थांबवणे जमले नव्हते तुला . आणि मग तुला वाटलं कि मी , मी लोकांना सांगत फिरत आहे तुझ्या आणि माझ्याबद्दल . जर का लोकांना आधीच आपल्या नात्याबद्दल कळलं तर मला समोर तुझ्याशी लग्न करणे सोपे होईल . हो ना अर्जुन असंच विचार केलास ना तू

त्यादिवशी . आयशा नकळत आपल्या मनातले शब्द ओठावर आणून बोलत होती . अर्जुन तिच्या बोलण्याने दुखावत होता , पण त्यादिवशीची चुकी त्याला हि आता कळली होती . पण हे लोकांना आपल्या नात्याबद्दल कळणार आयशाच वाक्य याच्याशी तो सहमत नव्हता . ती अजूनही त्या

आठवणीतून बाहेर पडली नव्हतीच , पण अर्जुन तिला थांबवत स्वतः बोलू लागला , नाही आयशा मी तुझ्याबद्दल असा विचार नव्हता केला त्यादिवशी . पण साहिलने जे म्हटलं होत त्यातलं एक एक शब्द मनावर माझ्या घाव करीत होता ग. खरतर मला प्रेमात पडायचं नव्हतंच पण नाही आवरू

शकलो मी स्वतःच्या मनाला . आणि म्हणूनच मला स्वतःचा राग येत होता . साहिलला जे बोलायचं होत ते बोलून तो निघून गेला , मी हि घरी गेलो . रात्र बरीच झाली होती पण त्यादिवशी डोळा लागत नव्हता . त्याचे ते शब्द राहून राहून मला आठवत होते . मन अक्षरशः घायाळ झालं होत ग

. खूप विचार केला , तू एक स्वतंत्र मनाची मुलगी होतीस , हवं तस वागणारी . पण माझ्या घरच वातावरण वेगळं होत . माझे आई-बाबा खूप कष्ट करून मला शिकवले होते , तेव्हा मी नुकताच नोकरीला लागलो आणि त्यांच्या कष्टाचं चीज झाल होत . पण तेव्हाच जर आपल्या नात्याबद्दल

घरच्यांना कळलं असत तर ते खूप दुखावले असते . मला त्यांना कोणताही त्रास द्यायचा नव्हता . आणि म्हणून मी विचार केला कि आता समोर जायचं नाही . आपली वाट कधीच एक होऊ शकणार नाही असं मला वाटायला लागलं . विचार करता करताच झोपी गेलो . सकाळी उठल्यावर तुझे

दोन-चार मॅसेज आलेले होते . काहीतरी कविता तू लिहून पाठवली होतीस . पण नंतर कळलं कि सीमाने ते मॅसेज आधीच वाचले होते . मला राग आला होता तुझा . तू केव्हापण कशी-काय मला मॅसेज करू शकतेस असं वाटलं , आणि क्षणातच साहिलचे शब्द आठवले . त्याक्षणी मन स्थिर

नव्हताच माझा . तुला माझी काही काळजी नाही , तू हवं तसंच वागते असं वाटू लागलं होत . याच विचारात असताना सीमा माझ्या जवळ आली . दादा , मला बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणत ती हि तुझ्याबद्दलच विचारू लागली . तुझा आणि आयशा च खरंच काही आहे का दादा, कॉलेज

मधल्या सगळ्या मुली मला आयशा ला वाहिनी म्हण आता म्हणून चिडवत असतात . मला माहिती आहे माझा दादा तशातला मुलगा नाही , म्हणून मी त्यांना सांगते पण आज हा मॅसेज वाचून नाही राहवलं मला . ती का तुला मॅसेज करते , तू का तिची मदत करत असतोस नेहमी अशे

कित्येक प्रश्न ती विचारू लागली होती मला. कळत नव्हतं काय सांगावं तिला पण तोंडातून निघालं , असं काही नाही आहे सीमा , आयशा आणि माझ्यात . लोकांचा काहीतरी गैरसमज होत आहे . तू लक्ष देऊ नकोस . तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे म्हणत मी बाहेर गेलो . अजून मॅसेज ची टोन

वाजली आणि पाहतो तर काय तुझाच मॅसेज होता . पण तेव्हा मला एकटेपणा हवा होता . आपण कुठेतरी चुकलो हि सतत जाणीव होत होती . तू या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होतीस . त्यात तुझी काहीच चुकी नव्हती ग . पण मी माझ्या मनातल्या भावना सगळ्यांसमोर जाहीर करू शकत

नव्हतो .अशातच दोन-चार दिवसांनी माझी ट्रान्सफर ऑर्डर आली होती . तुला भेटावसं वाटत होत पण ते प्रेम अजून तुझ्या मनात फुलेल याची भीती वाटत होती . न सांगताच तुला मी निघून गेलो .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults