फुलांचे दुःख

Submitted by द्वैत on 29 July, 2020 - 10:29

फुलांचे दुःख

त्या फुलांची वेदना गंधासवे आली घरा
अन जुनी व्याकुळता दाटून आली अंबरा

फार नाही अंबराने दोन अश्रू ढाळले
चांदणे कोमेजलेले भोवती गुंडाळले

एक उदासी साचली झाडांतल्या रुधिरातही
खिन्नता ओथंबली ह्या गर्द काळोखातही

गावच्या वेशीपुढे वारा जरा खोळंबला
जागणार्या पाखरांनाही सुगावा लागला

पायवाटेला जशी चाहूल थोडी लागली
मंदिराच्या पायथ्याशी जाऊनी ती थांबली

त्रास झाला पण कुणी कोणास नाही बोलले
का फुलांचे दुःख सार्यांनी मुक्याने सोसले??

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!!
देवास वाहीलेल्या/ तोडलेल्या फुलांचे दु:ख असा मला अर्थ लागला.
नकळत 'जोगवा' नावाचा दाहक सिनेमा आठवुन गेला.

@द्वैत प्लीज प्लीज माबोकरांचा एक मुशायर्‍या आणि गझलांंचा ऑनलाईन कार्यक्रम ठेवायचा का?
त्यात सादर्कर्ते तुम्ही बेफी जी आणि सगळे माबो वर गझल लिहीणारे गझलकार Happy
झूम/गुगल मीट पण प्लीज ठेवू ना !

प्रगल्भ कल्पना चांगली आहे, पण माझं म्हणाल तर मला कितपत शक्य होईल हे सांगता येत नाही... पण ह्या संदर्भात एक स्वतंत्र धागा काढून तुम्ही माबोकारांची ह्या विषयावर मत नक्की घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

छान लिहिलंय. प्रत्येक कल्पना आवडली. पाखरांना ही हे पाखरांनाही असे हवे ना? मात्रेत बसवण्यासाठी लिहिले असेल तर राहू द्या. मला त्यातले समजत नाही Happy