दादा येशील ना (रक्षाबंधन विशेष)

Submitted by तुषार विष्णू खांबल on 28 July, 2020 - 15:43

आजकाल नाती खुप दुरावत चालली आहेत..... अश्याच काही अपरिहार्य कारणांनी आपल्या भावापासून दुरावलेल्या एका बहिणीची मनोव्यथा म्हणजेच ही कविता.....

दादा येशील ना (रक्षाबंधन विशेष)
चाल - माझा होशील ना

शब्दांकन - तुषार खांबल

नको बंगला गाडी
नको मज साडी
नात्यात आपुल्या
असावी रे गोडी

तुझ्या हातावरती
मी बांधावी राखी
आनंदाची बेरीज
दुःखे वजाबाकी

नाते आपुले
दूर झाले जरासे
आज विनवणी
करिते तुला

दादा येशील ना
दादा येशील ना

Group content visibility: 
Use group defaults