पावसाचा मूड

Submitted by मिरिंडा on 25 July, 2020 - 05:48

आता श्रावणात
आषाढ असतो
आषाढात श्रावण
श्रावणातला मानसीचा हर्ष
आता आषाढातच फुलतो

सगळंच कसं उलटं
त्यामुळे कविता पण
अवेळी होतात
अपेक्षा नसताना
होणाऱ्या गर्भधारणेसारख्या

आमच्या वेळी पावसाची
बर्थडेट चार जून होती
दणकून पाऊस पडायचा
लोकल बंद, बस बंद
जणू जॉर्ज फर्नांडिसचाच
" बं द "

आता पावसाची
बर्थडेट होते मागेपुढे
पण पाऊस मात्र
मारतो दडी
महिना पंधरा दिवस साठी

कशी होणार कविता
बालकवीं सारखी
हल्ली बारकवी जास्ती
बालकवी एखादाच

म्हणून म्हणतो भाऊ
विचारु नको कविता म्हणजे काय?
उत्तरादाखल दिसेल तुला
ओंजळ रिकामी
उन्हाळलेली बिनपावसाची
बिनपावसाची

Group content visibility: 
Use group defaults