कोण चालतो कशास?

Submitted by अरिष्टनेमि on 23 July, 2020 - 14:20

वाळवंटी तृण,
हिमाहूनी शीतल,
कैसा अवघ्यांस मिळावा
मोक्षप्राप्तीचा हा क्षण

कैसे शांतवावे मन
हे निबीड गहन
एक वाट शोधू जाता
नाही जीवन, ना मरण

कैसा गूढ काळ
कोण चालतो कशास?
आयुष्याच्या मध्यान्हीस
जीव उदास उदास

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघितली तर साधी ,नीट विचार केला तर खूप गहन विचार /मनाची संभ्रमावस्था मांडणारी एक छान कविता.उदासी ,जडावलेल्या मनाने लिहलेला अप्रतिम काव्य अविष्कार.

धन्यवाद सामो, रूपाली विशे - पाटील, केशव तुलसी, कुमार१
@मऊमाऊ -धन्यवाद. लक्षात ठेवीन.
ही खरं तर खूप आधी लिहीलेली कविता आहे. Happy

छान!