आनंद

Submitted by nikhil_jv on 4 May, 2009 - 02:57

किती आगळ्या, किती वेगळ्या
आनंदाच्या तर्‍हा निराळ्या

क्षणात येतो, क्षणात जातो
नवचैतन्य फुलवुनी जातो

सुंदर सारे वाटु लागते
आकाश ठेंगणे भासु लागते

अलगद स्मित ओठी फुलते
मन वेडे वार्‍यावर झुलते

काळ ही त्याला सलाम करतो
जेव्हा मनी आनंद स्मरतो

गुलमोहर: 

आशय छान आहे. यमक थोडे सुसंगत हवेतसे वाटते.
-सविनय.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

छान आहे कविता निखिल
*******************************************
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते,व्याकुळ होते,तीळ तीळ तुटते,खोल कुठे गलबलते

निखिल कविता चांगली आहे.

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" छान. "