बावरे मन

Submitted by Santosh zond on 21 July, 2020 - 13:51

बावरे मन
प्रत्येक प्रश्न दिवसेंदिवस मोठा होतोय
हेच तर काळीज माझ तोडून नेतोय
दिवस तर रोजच वेगळा येतोय खरा
पण रोज तेच क्षण देऊन जातोय जरा
वेळ चालली आहे निघुन
एवढ तुझ्या विचारात हरलो मी .....
आजवर स्वप्न देतात मला साथ तुझी
अन आसवांनी भरलो मी.....
तु माझी नसली याच दुःख आता
तुला कधीच सांगणार नाही......
हा खेळ मात्र या वेड्याचा
आयुष्यभर संपणार नाही.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users