कोरोना झाल्यावर काय करावे या अ‍ॅक्शन प्लानचा कधी विचारच केला नाही..

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 July, 2020 - 12:16

आमच्या समोरच्या घरात राहणार्‍या कुटुंबातील चारपैकी तीन जणांना कोरोना झाला.
नुकतीच बातमी कानावर आदळली. आणि जाणवले कोरोना चार फूटांवर आला.

अगदी चार दिवसांपूर्वीच मी स्वत:ला आणि स्वतःच्या कुटुंबाला फार सुरक्षित समजत होतो.
अर्थात कारणही तसेच होते. या कोरोनाकाळात आमच्या कॉलनीत वा शेजारच्या पाजारच्या कॉलनीत जिथवर मी जीवनावशयक वस्तू घ्यायला जात आहे, तिथवर कोणालाही कोरोना झाल्याची बातमी आजवर आली नव्हती. याच कारणासाठी फुकटचे घरभाडे जात असूनही घर बदलायचीही घाई करत नव्हतो.

पण कोरोना अचानक अगदी दारात उभा राहिला. ते ही ईतक्या जवळ आणि ईतक्या लवकर की दारात उभा असलेला कोरोना आता कधीही घरात येईल अशी स्थिती बघता बघता कधी झाली समजलेही नाही.

आजवर ईतरांसाठीच प्रार्थना करत होतो आता ती वेळ आपल्यावरही येऊ शकते हे जाणवले,
आणि सोबत आणखी एक गोष्ट जाणवली की उद्या शिरलाच घरात कोरोना तर काय करावे याबाबत आपल्याला जुजबीच माहिती आहे. कुटुंबातील एक वा अनेक व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह झाल्यास नेमके काय करावे, हे स्टेप बाय स्टेप माहीतच नाही.

सरकारी ईस्पितळात भरती व्हायचे की प्रायव्हेट शोधायचे, तिथे खर्च किती येतो, मला झाला तर मी सरकरीत जाईन, पोरांना झाला तर त्यांना चांगले हॉस्पिटल बघू, पण पोरांची काळजी कोण घेते तिथे, जवळचे सरकारी वा प्रायव्हेट चांगले कोरोना हॉस्पिटल कुठले, त्यांना अ‍ॅप्रोच कसा करायचा... एक ना दहा शंका आणि चिंता, कित्येकाची उत्तरे नाहीत. कदाचित आसपासच शोधली तर मिळतीलही पण आजवर फक्त कोरोनापासून वाचावे कसे याचीच माहीती घेत होतो. पण वाचू शकलो नाही आणि झालाच कोरोना तर कुठे धावपळ करायचे याचा स्वत:कडे प्लानच नाही. जणू सरकारच आपल्याला मार्गदर्शन करणार या हिशोबातच होतो. किंवा कोरोनासंदर्भात जास्त बातम्या वा माहिती गोळा केले तर उगाच टेंशन येईल या विचाराने ते टाळत होतो.

पण आता हळूहळू नव्हे लगेचच कोरोना झाल्यावर पुढे काय याची शक्य तितकी माहिती घ्यायला सुरू करत आहे. त्याचसोबत समोरच्या घरात आलेला कोरोना चार पावले चालून आपल्या घरात येऊ नये यासाठीही काय करता येईल याचा विचार चालू आहे. एक घरातल्या घरात तात्काळ मिटींगही झाली. आणि दुसरा आता हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत इमारतीमध्ये कोविड पॉझिटीव व्यक्ती मिळाल्यास आता फक्त मजला सील होतो. पण एकाच इमारतीमधे तीन पेक्षा जास्त व्यक्ती पॉझिटीव असल्यास अख्खी इमारत सील होते.

आमच्या समोरच्या घरात ४ रुग्ण सापडल्याने इमारतीच्या दोन्ही विंग सील आहेत.
तसेच इमारतीमधील सर्व व्यक्तींची जुजबी माहीती गोळा केली गेली. दोन दिवसानंतर पुन्हा इमारतीमधल्या सर्व ज्येष्ठ नागरीकांची ऑक्सिजन लेव्हल व पल्स चेक केली गेली.

बिल्डिंग सिल करणं प्रकार बंद झाला बहुतेक आता.

>> आमच्या शेजारी एक जण होत्या कोरोना पॉझिटिव्ह. त्यांनी घरीच राहून उपचार घेतले. काहीही सील झाले नाही. अगदी काहीही.
घरच्यांची सुद्धा लक्षणे नसल्याने टेस्ट केली नाही.

<<<एकाच इमारतीमधे तीन पेक्षा जास्त व्यक्ती पॉझिटीव असल्यास अख्खी इमारत सील होते.>>>
हो हे असू शकते, कारण आमच्या विंगमध्ये ८ जण पॉझिटिव्ह होते, पण बाकीच्या विंग सील नव्हत्या केल्या. फक्त आमची विंग सील केली होती. आज काढले बांबू

ऋन्मेषा ताक घुसळून झालं असेल तर लोणी कुठंय

अर्थात

धागा काढून आता जवळपास दोन आठवडे होतील तर तुझ्या व्यग्र दिनचर्येमधून वेळात वेळ काढून धाग्यामधेच सर्वांच्या सहज संदर्भाकरता म्हणून काय काय करावे / टाळावे याची यादी तयार करशील का?

धाग्याचे उपयुक्तता मुल्य वाढेल.

हो हर्पेन विकांताला हे करू शकतो.
वाचायला हवेत सारे प्रतिसाद एकदा.
आणखी कोणी चांगल्या माणसाने त्यात भर घालून हे केले तरी चालेल. ते देखील हेडरमध्ये टाकता येईल. वा काही उपयुक्त लिंक वगैरे....

पहिली स्टेप होती जेव्हा कविद बाधित हे खूप कमी होते तेव्हा त्यांना बाकी समाजापासून वेगळे करण्याचा हेतू होता.
तेव्हा गाव,विभाग सील केला जात होता .

जशी संख्या वाढली तसे ते सील करणे कठीण होत गेले .
मग बिल्डिंग सील केली जात असे .
अजुन संख्या वाढली एका building मध्येच तीनचार बाधित दिसून यायला लागले मग नियम बदलून फक्त त्याच खोली / फ्लॅट पर्यंत मर्यादित बंधन टाकली गेली.
आता एवढी संख्या वाढली आहे की फक्त बाधित व्यक्ती लाच नियम लागू आहेत .

करोनाबाधा दोन वेळा होऊ शकते का, या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ खात्रीपूर्वक देऊ शकत नसले तरी अशी शक्यता जवळपास नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील काही विद्यापीठात याबाबत संशोधन झाले आहे. एकदा करोनाची बाधा झाल्यावर त्या संसर्गासाठी काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होत असली, तरी ती किती काळ टिकेल, याबाबत साशंकता आहे. करोनामुक्त झालेले रुग्ण काही आठवड्यांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आल्याच्या काही घटना नोंदवण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या संसर्गाचे काही अवशेष या चाचण्यामध्ये आढळत असतील. त्यामुळेच त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत असावी. त्याशिवाय अनेकदा करोनाची बाधा झाली असल्याचे सांगणारी चाचणी चुकीचे असल्याचे आढळले आहे. या अशा प्रकरणांमध्येही चाचणी चुकीच्या प्रकारे आढळत असेल असे म्हटले जाते.

https://maharashtratimes.com/international/international-news/can-you-ge...

Proud

१००

माझी आई, भाऊ,बहिण, तीचा नवरा एकदमच सगळे कोरोना पोजिटीव आलेत. सगळे इनसटीटयुशनल कवारनटाईन आहेत.सुदैवाने मुलं निगेटिव्ह आहेत.

वेळ काढून प्रयत्न करेन लिहिणयाचा.
>>>>>
अनुभवाचा फायदा सर्वांना. पण आधी त्यांना जपा, स्वतःचीही काळजी घ्या, मुलांना तुमची जास्त गरज असेल या वातावरणात. तुमची पोस्ट पाहता तुम्ही या संकटाने खचलेल्या दिसत नाही आहात हे उत्तम चिन्ह आहे. शुभेच्छा सर्वांना

ओके मृणाली,
बहिण सरकारी दवाखान्यात नर्स म्हणजे कदाचित तिथूनच हा कोरोना आला असावा. तुमचे बहिण कोविड योद्धाचे काम करत होती. त्या सर्वांसाठी मनापासून प्रार्थना. लिहा तुम्ही सवड काढून.

पण त्याना इनफेकशन, त्यांच्या मेड मुळे झाले. माझे फोनवरूनच काय ते बोलणे होते. आई ला ताप जास्त होता. बाकी सगळ्याना हलका ताप बाकी काही लक्षणं नाहित. आता सगळे बरे आहेत. 11 दिवसानंतर घरी सोडणार आहेत.

कुणामुळे झाले हे आता समजत नाही

अगदी पहिल्या स्टेजला कोण विमानातून आला, तो कुणाला भेटला वगैरे ट्रेस करता येत होते

आता शक्य नाही
व्हायरस ऑलरेडी पसरला आहे

मृणाली, सगळे बरे झाले हे छानच झाले. अनुभव नक्की लिहा वेळ झाल्यावर. तुमची बहीण एक कोविड योद्धा -- त्याना प्रणाम.

आज बहिणीला discharge मिळाला, 20जुलैला तिची टेस्ट +आली होती, आज घरी गेली, मुलं खुप आनंदी झाली, तिची मुलगी 1 वर्ष आणि मुलगा 6वरषाचा आहे. बाकिचे रविवारी घरी जातील.

खूप छान, पण त्यांना मुलांपासून थोडे दिवस अंतर ठेवावे लागेल ना, कारण मी ऐकलंय की घरी आल्यावर परत चौदा दिवस विलगिकरणात काढावे लागतात

एका ओळखीच्यांचे मनोगत

*माझी corona सफर*
जुन महिन्यामध्ये मला 2-3 दिवस ताप आला.
ताप आल्यापासून admit होईपर्यंत घरात मी पूर्णतः वेगळी राहिले.
आधीच्या आठवड्यात ऑफिस मध्ये एक customer येऊन गेली होती ती नंतर covid + ve आहे हे कळले.
म्हणून मी पण टेस्ट करून घेतली. दुसऱ्या दिवशी BMC कडून एक फोन आला मला. माझी टेस्ट +ve आली आहे आणि विलागिकरण कक्षात जावे असे सांगितले.घरात वयस्क सासूबाई असल्याने मी बाहेर जाणे योग्य होते.
ठरल्यानुसार माझा प्रवास सुरू झाला.मी गरजेचे असे कपडे घेतले ,दोन पुस्तके वाचायला आणि travel kit बॅग मध्ये घालून एका हॉस्पिटलच्या विलगिकरण कक्षात दाखल झाले.
तिथे गेल्यावर कळले की आपण काही वस्तू विसरलो आहोत. हे असे का झाले माहीत आहे कारण +ve कळल्यावर गडबडीत सामान भरले.
Check list नव्हती ना माझ्याकडे…
तर मित्रांनो हा लेख लिहिण्यामागे हे एक कारण
हा आजार संसर्गाने होतो त्यामुळे कोणालाही परत जर admit व्हावे लागले तर मदत होईल.
*Check list*
1. चार जोडी comfortable सुती कपडे.
2..Under garments 4 जोड
3. एक मोठा टॉवेल व दोन छोटे नॅपकीन
4.,एक पांघरूण
5.ताटली ,चमचा , Thermos, सुरी, प्लास्टिक बॅग्स ,रद्दी पेपर
6. Soap (body and washing),shampoo comb Toothbrush paste
7. पुस्तके (शक्यतो आपला मूड हलका करणारी),पेन आणि वही
8.मोबाईल चार्जर,Earphones
9. Biscuit, fruits
10. Soframycin, Odomos
11. आधार कार्ड ची कॉपी
12. 3 मास्क
13. Admit होण्यापूर्वी घेत असाल ती औषधे

*Corona Darona*
सर्वात महत्वाचे असे की आपला मानसिक समतोल राखणे. कारण हा आजार होणे म्हणजे कुठला गुन्हा केलेला नाही. आपण बरे होणार आहोत फक्त नाईलाजाने admit होत आहोत असा विचार केला तर सोपे जाते.
जर आपल्या घरात पुरेशी जागा असेल तर घरी पण राहून treatment होते. नाहीतर admit होणे आवश्यक असते.
मन स्थिर असेल तर व्हायरस मुळे होणारे शरीरातील बदल जाणवतात. त्यामुळे डॉक्टर ना आपले उपचार करायला सहाय्य होते.

" *Angels in White"*
माझ्या corona प्रवासातील महत्वाचे आधार - स्तंभ म्हणजे हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ आणि डॉक्टर्स.
विलागाकिरण कक्षमधील आणि नंतर admit झाले त्या Somaiya Hospital मधले सर्व कर्मचारी अत्यंत प्रेमाने आणि काळजीने विचारपूस करायचे. जर नीट जेवले नाही तर आपुलकीने आग्रह करायचे.
दोन्ही ठिकाणी डॉक्टर पण एकदम योग्य ती चौकशी करायचे. काही तब्येतीत बदल जाणवला तर गरजेची चाचणी करायला लावायचे.
खरतर हे सर्व पगारी असतात. त्यांना खूप छान वागून काही वेगळा फायदा होणार नाहीये पण ह्या आजारात पेशंट एकटा आहे ,घरचे भेटणार नाहीत त्यामुळे हे खूप आधार देतात.हया सर्वांचे चेहरे आपण बघू शकत नाही पण त्यांनी लावलेल्या चष्म्यातून डोळ्यातले भाव ओळखता येतात.

सातत्याने PPE kit घालून न कंटाळता सेवा करणे खूप अवघड आहे.
ह्यांना देवदूत नाही तर काय म्हणायचे!!!

त्याच बरोबर माझे नात्यातील डॉक्टर आणि डॉक्टर मित्र परिवार हे सातत्याने माझ्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. ह्यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही.

*सख्खे शेजारी*
माझ्या ह्या आजारात घरच्यांना पण quarentine केले होते. त्यामुळे ह्या दरम्यान माझ्या नंदन सोसायटी मधील शेजाऱ्यांनी प्रचंड मदत केली.
माझ्या सासूबाई ८० वर्षाच्या आहेत. त्यामुळे माझ्या काही. मैत्रिणींनी रोज स्वयंपाक करून पाठवला.घरात कोणतेही काम करायला माणूस नसताना हे सर्व त्यांनी प्रेमाने केले. काहींनी घरचे दूध, पेपर आणि इतर गरजेचे सामान आणून दिले. वयवर्ष 75 ते 25 वयोगटातील सर्वांनी आपापल्या पद्धतीने मदत केली.
14 दिवसांनी मी बरी होऊन परतले तेव्हा सर्व जणांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून स्वागत केले. मी खूप भारावून गेले होते.
ना फोटो ना व्हिडिओ फक्त स्मरणात राहील अशा ह्या आठवणी...
आयुष्यात एवढे प्रेम आणि आशीर्वाद मिळण्याचे भाग्य आम्हाला लाभले.मी शतशः ऋणी आहे सर्वांची.

*कोरोनाची शिकवण*
1.आयुष्यात काही गोष्टी फुकटात मिळतात त्याची किंमत करायला शिकले . उदा. Oxygene
2.ह्या आजारात एकटाच सर्व प्रवास करायचा असतो. डोक्यावरून मायेचा हात फिरवायला पण कोणी नसते. अशा वेळेस आप्तेष्टांच्या फोन वरचा आवाज, सर्वांचे काळजीचे आणि प्रेम भरे संदेश हीच आपली ताकद असते.आजारातून बाहेर पडायला ह्याची खूप मदत झाली.
3.निरपेक्ष प्रेमाने सेवा करणारे covid योद्धे, चिकाटी आणि प्रेम शिकवून गेले
4.माझ्या नवऱ्याने आणि मुलाने न कंटाळता केलेली माझी सेवा. आणि वय विसरून सासूबाईंनी सांभाळलेली घरची जबाबदारी हे पाहून मी हरखून गेले आहे
आजारातून बाहेर पडताना येणारे अनुभव लोकांची नजर आणि भीतीने लांब राहण्याचा प्रवृत्ती हे सर्व नवीन आहे. बरी झाले तरी जगण्याचे नवीन युद्ध सुरू झालय.
आणि मला खात्री आहे काही लोकं ह्यात नक्कीच बरोबर आहेत. त्याच मुळे परत मिळालेले आयुष्य खूप भरभरून जगणार आहे.
मित्रांनो कृपया घाबरून जाऊ नका.आपल्या सीमेवरील सैनिकासारखे रोज थोडेच लढायला जायचे आहे. सर्वांची साथ आहेच त्यामुळे वेळ आलीच तर न घाबरता सामोरे जा.

Pages