कोरोना झाल्यावर काय करावे या अ‍ॅक्शन प्लानचा कधी विचारच केला नाही..

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 July, 2020 - 12:16

आमच्या समोरच्या घरात राहणार्‍या कुटुंबातील चारपैकी तीन जणांना कोरोना झाला.
नुकतीच बातमी कानावर आदळली. आणि जाणवले कोरोना चार फूटांवर आला.

अगदी चार दिवसांपूर्वीच मी स्वत:ला आणि स्वतःच्या कुटुंबाला फार सुरक्षित समजत होतो.
अर्थात कारणही तसेच होते. या कोरोनाकाळात आमच्या कॉलनीत वा शेजारच्या पाजारच्या कॉलनीत जिथवर मी जीवनावशयक वस्तू घ्यायला जात आहे, तिथवर कोणालाही कोरोना झाल्याची बातमी आजवर आली नव्हती. याच कारणासाठी फुकटचे घरभाडे जात असूनही घर बदलायचीही घाई करत नव्हतो.

पण कोरोना अचानक अगदी दारात उभा राहिला. ते ही ईतक्या जवळ आणि ईतक्या लवकर की दारात उभा असलेला कोरोना आता कधीही घरात येईल अशी स्थिती बघता बघता कधी झाली समजलेही नाही.

आजवर ईतरांसाठीच प्रार्थना करत होतो आता ती वेळ आपल्यावरही येऊ शकते हे जाणवले,
आणि सोबत आणखी एक गोष्ट जाणवली की उद्या शिरलाच घरात कोरोना तर काय करावे याबाबत आपल्याला जुजबीच माहिती आहे. कुटुंबातील एक वा अनेक व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह झाल्यास नेमके काय करावे, हे स्टेप बाय स्टेप माहीतच नाही.

सरकारी ईस्पितळात भरती व्हायचे की प्रायव्हेट शोधायचे, तिथे खर्च किती येतो, मला झाला तर मी सरकरीत जाईन, पोरांना झाला तर त्यांना चांगले हॉस्पिटल बघू, पण पोरांची काळजी कोण घेते तिथे, जवळचे सरकारी वा प्रायव्हेट चांगले कोरोना हॉस्पिटल कुठले, त्यांना अ‍ॅप्रोच कसा करायचा... एक ना दहा शंका आणि चिंता, कित्येकाची उत्तरे नाहीत. कदाचित आसपासच शोधली तर मिळतीलही पण आजवर फक्त कोरोनापासून वाचावे कसे याचीच माहीती घेत होतो. पण वाचू शकलो नाही आणि झालाच कोरोना तर कुठे धावपळ करायचे याचा स्वत:कडे प्लानच नाही. जणू सरकारच आपल्याला मार्गदर्शन करणार या हिशोबातच होतो. किंवा कोरोनासंदर्भात जास्त बातम्या वा माहिती गोळा केले तर उगाच टेंशन येईल या विचाराने ते टाळत होतो.

पण आता हळूहळू नव्हे लगेचच कोरोना झाल्यावर पुढे काय याची शक्य तितकी माहिती घ्यायला सुरू करत आहे. त्याचसोबत समोरच्या घरात आलेला कोरोना चार पावले चालून आपल्या घरात येऊ नये यासाठीही काय करता येईल याचा विचार चालू आहे. एक घरातल्या घरात तात्काळ मिटींगही झाली. आणि दुसरा आता हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईतील परिस्थिती खरच भयंकर आहे, मी स्वतः सध्या गोरेगाव येथील सरकारी qurantine केंद्रात उपचार घेत आहे.. माझा वयक्तिक अनुभव असा की मला BMC प्रशासनाने वेळीच योग्य ती मदत केली आणि अजूनही करत आहेत ...
https://togethervcan.in/article/ward-wise-disaster-management-control-ro...
ह्या लिंक मध्ये मुंबईतील वॉर्डवाईज Disaster Room चे क्रमांक दिले आहेत, त्या क्रमांकावरून आपल्याला आपल्या वॉर्ड चा Covid War Room क्रमांक मिळेल ...
मी ही तसाच मिळवला ... Covid War room ला संपर्क केल्या नंतर त्यांनी माझी माझ्या कुटुंबाची चाचणी, होम सॅनिटायझेशन, हॉस्पिटलायझेशन ही सर्व जबाबदारी तत्परतेने आणि विनामूल्य पार पाडली. गंभीर रुग्णांना महानगरपालिकेच्या अखत्यारीतील हॉस्पिटल्स मध्ये ठेवण्यात येते, यावेळी महापालिकेकडून ICU बेडस ची सद्यपरिस्थिती रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात येते, ICU बेड ची उपलब्धता नसेल तर खाजगी हॉस्पिटल्स मध्ये उपलब्धता तपासून त्वरित कळवण्यात येते.
सो कोरोना झालाच तर मुळात आधी पॅनिक होऊ नका, व्हाट्सअप्प किंवा अन्य सोशल मीडिया वर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.. सरकारी यंत्रणेबाबत असलेल्या उदासीनतेने आणि मुळात जीवाची भीती असल्यामुळे बरेच जण हे खाजगी हॉस्पिटलकडे धाव घेतात. मी व माझा कार्यालयीन सहकारी दोघेही एकामागोमाग एक असे पोसिटीव्ह आलो... मला सुरुवातीचे दोन दिवस प्रचंड ताप होता आणि माझ्या सहकार्याला सुख्या खोकलया खेरीज काहीच लक्षण नव्हते.. निव्वळ वर उल्लेख केलेल्या उदासीनतेने तो खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती झाला आहे जिथे दर दिवशी 25000 इतके शुल्क आकारले जात आहे.. हे सांगायचं कारण हेच की ह्या कठीण परिस्थितीत स्वताच डोकं शांत ठेवून आपल्या फॅमिली फिझिशियन च्या सल्ल्याने योग्य निर्णय घ्या... तुम्हाला कितपत त्रास होतोय, तुम्हाला आधीच काही जुनाट व्याधी आहेत का ह्या गोष्टी व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या असू शकतात ... त्यामुळे कोण्या एका कोरोना रुग्णाच्या लक्षणांशी तुलना करू नका... टेक केअर अँड स्टे सेफ

द्वैत लवकर बरे व्हायला शुभेच्छा.
करोना रिकव्हरी साठी वेगळे धागे काढून तुमचे अनुभव त्यात लिहा.

मी_ परी काळजी घ्या. द्वैत लवकर बरे व्हायला शुभेच्छा.
प्लीज, वेगळे धागे काढून तुमचे अनुभव त्यात लिहाल का?

इतकी काळजी करू नका..
मला तर वाटत आहे की माणूस कोरोना नाही तर काळजी आणि कोरोना च्या news ने मारेल..

आणि माझ्या सहकार्याला सुख्या खोकलया खेरीज काहीच लक्षण नव्हते.. निव्वळ वर उल्लेख केलेल्या उदासीनतेने तो खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती झाला आहे जिथे दर दिवशी 25000 इतके शुल्क आकारले जात आहे.
>>>>

फार ट्रिकी सिच्युएशन आहे ही. स्पेशली मध्यमवर्गीयांसाठी. काही विशेष न होता दोन तीन लाखांचा फटका झेलणे सोपे नाहीये. यानंतर मानसिक स्थैर्य सांभाळणेही अवघड जावे एखाद्याला. त्यामुळे खाजगीत जातानाच याचीही मनाची तयारी करूनच जावे की असेही होऊ शकते.

मी_ परी काळजी घ्या. द्वैत लवकर बरे व्हायला शुभेच्छा.
प्लीज, वेगळे धागे काढून तुमचे अनुभव त्यात लिहाल का?.....+1

यु ट्युबवर दीनानाथ मधल्या डॉ. धनंजय केळकर यांचे तीन भागातील कोविद १९ च्या माहितीचे व्हीडीओ आणि त्यांचाच "सूक्ष्म योग आणि प्राणायाम" या नावाचा , व्यायाम प्रकाराचा व्हीडीओ जरुर पहा. हे व्यायाम करोना झाला नाही तरी, झाला असताना आणि बरं झाल्यानंतर देखील करा असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

मी सगळे प्रतिसाद वाचले नाहीत. त्यामुळे ही माहिती डबल झाली तर क्षमस्व!

आमच्याकडे सरकारची माणसे अखेरपर्यंत आलीच नाहीत.
कुठे कोरोना झाला तर बिल्डींग सील करणे वा सॅनिटाईज करणे वगैरे प्रकार बंद केलेत का?
आमच्या सोसाय्टीनेच बिल्डींग आणि टेरेस वगैरे सॅनिटाईज करून घेतले.

<<< बिल्डिंग सिल करणं प्रकार बंद झाला बहुतेक आता>>> नाही मोहिनी, आमच्या विंगचा गेट सील केलाय बांबू बांधून. काल आंगणवाडीवाले येऊन पूर्ण सोसायटीच्या बाकीच्या लोकांचे ऑक्सिजन चेक करून गेले

मी ठाणे मध्ये राहतो
फक्त लक्षण असतील तरच covid19 ची टेस्ट करा असे डॉक्टर सांगतात.
घरात एका व्यक्तीला कविद19 positive निघाला तरी बाकी कुटुंबातील व्यक्ती ला लक्षण नसतील तर त्यांची टेस्ट केली जात नाही.
माझ्या बाजूला positive vyakti होता त्याला लक्षण जास्त नव्हती घरी राहून च उपचार दिले गेले.

घरात एकच व्यक्ती पॉझिटीव्ह असेल तरी पुर्ण कुटुंबाने home quarantine करणे गरजेचं असते. मग घरातल्या कुत्र्याची सोय काय? वॉक बंद केले तर 2 आठवड्यात कुत्र्याची वाईट अवस्था होईल.

आमच्या समोरचे सात दिवसात घरी परतही आले.
हे सुद्धा आम्हाला तेव्हा समजले जेव्हा बायकोने कसे आहात आता हे चौकशी करायला फोन की मेसेज केला.
एकूणच कसा काम करतोय करोना काही कळेना झालेय.

सात दिवसात ते परत आल्याने आता ते पुर्णपणे कोरोनामुक्त होऊन आलेत की फक्त लक्षणे कमी झाल्याने आलेत आणि अजूनही त्यांच्यात वायरस शिल्लक आहे जो ते ईतरांत संक्रमित करू शकतात. हे असे असेल तर आम्ही डेंजर झोनमध्ये आलो त्यांच्या परत येण्याने...

ऋन्मेष, काळजी घे. सद्ध्या तरी, हायजिन, सोशल डिस्टंसिंग, मास्क्स आणी सॅनिटायझेशन शिवाय कुठलाच मार्ग नाहीये.

फेरफटका धन्यवाद
काळजी पहिल्यापासूनच घेतोय. घरात येणारी एकूण एक वस्तू सॅनिटाईज करतोय. जीवनावश्यक वस्तू आणायलाच चार दिवसातून एकदा बाहेर पडतोय. आल्यावर आंघोळ करतोय. बाहेर घालून गेलेले कपडे वेगळे ठेऊन धुतोय.

गेले काही दिवस. हे पाळताना थोडे निष्काळजीपणा होऊ लागलेला. तेवढ्यात समोरच्या घराची न्यूज आली आणि पुन्हा पहिल्यासारखी काळजी घेणे सुरू केले.

सात दिवसानंतर पुन्हा टेस्ट करतात

ती टेस्ट निगेटिव्ह येते

काही लोकांना लक्षणे नसतात , पण दुसरी टेस्ट पॉझिटिव्हच येते , कारण टेस्ट पीसीआर पद्धतीने करतात , ह्यात मेलेला व्हायरस असला तरी टेस्ट पॉझिटिव्हच येते
ही टेस्ट व्हायरस , बेक्टेरिया जिवंत आहे की मेलेला आहे हे सांगू शकत नाही, कारण टेस्ट फक्त त्या जन्तु चे जेनेटिक मटेरियल शोधून रिपोर्ट देते , ते आहे किंवा नाही,

सुरुवातीला लक्षणे असल्याने व अद्याप उपचार घेतले नसल्याने पहिली टेस्ट पॉझिटिव्ह असली तर तो आजार त्या जन्तुमुळेच आहे असे ठामपणे म्हणता येते व जन्तु जिवंत आहे असे गृहीत धरता येते

पण उपचारानंतर मात्र ही टेस्ट मेलेला जंतुही पॉझिटिव्ह रिपोर्ट करते, तेंव्हा लक्षण नसेल तर पेशनटला सोडून देतात

( टीबी ला सीबी नेट टेस्ट वापरतानाही हाच प्रॉब्लेम असतो , म्हणून उपचारानंतर दुसरी टेस्ट वापराबी लागते , तेंव्हा सीबीनेट कुचकामी ठरते , तेंव्हा कफ मायक्रोस्कोपीतून बघून जन्तु आहे किंवा नाही हे बघतात )

ह्या नव्या टेस्ट जेनेटिक मटेरियल शोधतात , त्यांचे रिपोर्ट त्वरित मिळतात , अगदी सूक्ष्म सॅम्पल असेल तरीही ते शोधून काढतात, त्यांचे निदान करण्याचे पोटेन्शन अगदी उत्तम आहे,

पण , जन्तु सध्या जिवंत आहे की काल मेलेला आहे , हे ते सांगू शकत नाहीत , तिथे परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे लागतात,

थोडक्यात , चोर शोधायच्या दोन पद्धती आहेत , एक तर सीसी टी व्ही बघा व प्रत्यक्ष चोर बघा ( म्हणजे मायक्रोस्कोपी) , नैतर फिंगर प्रिंट रिपोर्ट घ्या ( म्हणजे पीसीआर टेस्ट , जी सध्या कोविडला आपण वापरत आहोत) , व्हायरससाठी मायक्रोस्कोपी , कल्चर वगैरे होऊ शकते , पण ते अति भयानक खर्चिक व किचकट आहे , त्यामुळे त्याचे महत्व फक्त प्रायोगिक व अभ्यासापूरते आहे , ते रोजच्या सामान्य उपचारास उपलब्ध नाही.
फिंगर प्रिंट नेही चोराचे निदान 100 % होते , पण सध्या चोर जिवन्त आहे का , हे त्यावरून समजू शकत नाही

ब्लॅककॅट,कोणता चोर चोरी करु शकतो हे आधीच कळू शकते का? म्हणजे झूनॉटीक ओरीजनचा कोणता व्हायरस माणसाला इन्फेक्ट करु शक्तो हे समजेल का?

मलेरिया च्या डोस मधील एक गोळी जरी घेतली तरी मलेरिया चा व्हायरस रक्तात detect hot nahi ase mi ऐकलं आहे.
त्या मुळे पूर्ण 14 दिवसाचा कोर्स पूर्ण करावा लागतो.

ब्लॅककॅट माहितीबद्दल धन्यवाद.
थोडक्यात लक्षणे थांबली तरी शरीरातील व्हायरस मेलाच वा संपलाच आहे असे ठामपणे बोलू शकत नाही. त्यांनीही होम क्वारण्टाईन होणे गरजेचे. जे ते करत आहेत. आणि आम्हीही शेजारी या नात्याने आमच्या परीने काळजी घेणे उत्तम. त्यांना जे काही हवे नको ते अजून काही दिवस प्रत्यक्ष संपर्कात न येताच बघणे.
बायकोच्या मनातही हाच संभ्रम होता की बरे होऊन आलेत तर आता त्यांच्याकडे काय आहात कसे आहात विचारायला, भेटायला न जाणे बरोबर वाटत नाही. पण मीच तिला रोखले. होते. पहिल्या दिवसापासून काऊंट करता बारा चौदा दिवस होऊ देणे गरजेचे म्हटले.

@ फिल्मी, रोग से लढो रोगी से नहीं!
>>>>
या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला तर ते कोरोनाचा प्रसार वाढवण्यासच मदत करेल. एखाद्याला कोरोना झाला असल्यास त्यापासून शारीरीक अंतर दूर ठेवणे गरजेचे आहेच. याला रोगीशी लढणे नाही म्हणत. त्यामुळे प्लीज असे डायलॉग मारून कोणाला फिजिकल डिस्टन्सिग मेनटेन करण्यापासून रोखू नका.

People who have been confirmed with mild to moderate COVID-19 can leave their isolation without receiving a negative test, according to recently revised guidance from the Centers for Disease Control and Prevention.

Increasing evidence shows that most people are no longer infectious 10 days after they begin having symptoms of COVID-19. As a result, the CDC is discouraging people from getting tested a second time after they recover.

“For most persons with COVID-19 illness, isolation and precautions can generally be discontinued 10 days after symptom onset and resolution of fever for at least 24 hours, without the use of fever-reducing medications, and with improvement of other symptoms,” the CDC says.

The CDC also notes that virus fragments have been found in patients up to three months after the onset of the illness, although those pieces of virus have not been shown to be capable of transmitting the disease.

Pages