कोरोना झाल्यावर काय करावे या अ‍ॅक्शन प्लानचा कधी विचारच केला नाही..

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 July, 2020 - 12:16

आमच्या समोरच्या घरात राहणार्‍या कुटुंबातील चारपैकी तीन जणांना कोरोना झाला.
नुकतीच बातमी कानावर आदळली. आणि जाणवले कोरोना चार फूटांवर आला.

अगदी चार दिवसांपूर्वीच मी स्वत:ला आणि स्वतःच्या कुटुंबाला फार सुरक्षित समजत होतो.
अर्थात कारणही तसेच होते. या कोरोनाकाळात आमच्या कॉलनीत वा शेजारच्या पाजारच्या कॉलनीत जिथवर मी जीवनावशयक वस्तू घ्यायला जात आहे, तिथवर कोणालाही कोरोना झाल्याची बातमी आजवर आली नव्हती. याच कारणासाठी फुकटचे घरभाडे जात असूनही घर बदलायचीही घाई करत नव्हतो.

पण कोरोना अचानक अगदी दारात उभा राहिला. ते ही ईतक्या जवळ आणि ईतक्या लवकर की दारात उभा असलेला कोरोना आता कधीही घरात येईल अशी स्थिती बघता बघता कधी झाली समजलेही नाही.

आजवर ईतरांसाठीच प्रार्थना करत होतो आता ती वेळ आपल्यावरही येऊ शकते हे जाणवले,
आणि सोबत आणखी एक गोष्ट जाणवली की उद्या शिरलाच घरात कोरोना तर काय करावे याबाबत आपल्याला जुजबीच माहिती आहे. कुटुंबातील एक वा अनेक व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह झाल्यास नेमके काय करावे, हे स्टेप बाय स्टेप माहीतच नाही.

सरकारी ईस्पितळात भरती व्हायचे की प्रायव्हेट शोधायचे, तिथे खर्च किती येतो, मला झाला तर मी सरकरीत जाईन, पोरांना झाला तर त्यांना चांगले हॉस्पिटल बघू, पण पोरांची काळजी कोण घेते तिथे, जवळचे सरकारी वा प्रायव्हेट चांगले कोरोना हॉस्पिटल कुठले, त्यांना अ‍ॅप्रोच कसा करायचा... एक ना दहा शंका आणि चिंता, कित्येकाची उत्तरे नाहीत. कदाचित आसपासच शोधली तर मिळतीलही पण आजवर फक्त कोरोनापासून वाचावे कसे याचीच माहीती घेत होतो. पण वाचू शकलो नाही आणि झालाच कोरोना तर कुठे धावपळ करायचे याचा स्वत:कडे प्लानच नाही. जणू सरकारच आपल्याला मार्गदर्शन करणार या हिशोबातच होतो. किंवा कोरोनासंदर्भात जास्त बातम्या वा माहिती गोळा केले तर उगाच टेंशन येईल या विचाराने ते टाळत होतो.

पण आता हळूहळू नव्हे लगेचच कोरोना झाल्यावर पुढे काय याची शक्य तितकी माहिती घ्यायला सुरू करत आहे. त्याचसोबत समोरच्या घरात आलेला कोरोना चार पावले चालून आपल्या घरात येऊ नये यासाठीही काय करता येईल याचा विचार चालू आहे. एक घरातल्या घरात तात्काळ मिटींगही झाली. आणि दुसरा आता हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही बरीच स्ट्रॉंग alopathi औषधे आहेत.सामान्य धडधाकट माणसाला नाही पण डायबिटीस बीपी हिस्टरी असलेल्याना त्रास होऊ शकेल.
शिवाय या औषधानी खात्रीशीर करोना बरा होतो असा पुरावा नाहीये.

यात antibiotics कुठे आहेत?
hcq तर आता देत नाहीत. वैद्यकीय सल्या शिवाय घेऊ नयेत औषधं.

एक मेडिकल ऍप कोणी तरी चालू करावे .
आणि ऑनलाईन लक्षण सांगितल्या वर ,स्वतः तापमान, ऑक्सिजन लेवल, बीपी,अशी सर्व प्राथमिक माहिती दिल्या वर त्या ऍप कडून औषध सुचवली जवित.
गरज असेल तर व्हिडिओ सुद्धा पाढवता आला पाहिजे.
असे मेडिकल ऍप कोणी चालू केले आणि दोन तीन डॉक्टर नोकरी करायला ठेवले तर खूप फायदा होईल लोकांचा.
डॉक्टर मंडळी कडून होणारी लूट थांबेल लोकांची.
Corona sathi ase app हवेच.
घरीच उपचार होतील आणि लाखो रुपये वाचतील लोकांचे आणि गैर सोय पण टळेल.

ओके मानव.अँटी बायोटिक शब्द काढले.
मुद्दा हा की 'हमखास यशस्वी रामबाण औषधे','हमखास वेट लॉस प्रोटीन पावडर' काहीजणांना सूट होतात.काहींच्या किडनी कचऱ्यात जाऊ शकतात.(एक रिक्षा चालवणारे गृहस्थ रत्ना मध्ये भेटले होते.दिवसभर कष्ट करून अंग दुखीची कोणतीतरी स्ट्रॉंग गोळी जास्त वेळा घेऊन किडनी निकामी.रिक्षा चालवून एक दिवस डायलिसिस ला यायचे.)

Corona आल्या नंतर मानवी शरीराची प्रतिकार शक्ती ह्या वर विविध ठिकाणी लिहून यायला लागले.
टीव्ही वाले मानवी शरीराची रोग प्रतिकार शक्ती कशी महत्वाची ह्या वर class घेवू लागले.
त्याच्या अगोदर काय चालू होत.
भरपूर जेवा काळजी करायची नाही.
हजमोला घ्या.
रोग अनेक इलाज एक झंडू बाम.
जरा डोकं दुखणं सुरू झाले बाम.
Crocin, कंभिफिन,d cold ,action 500.
अशा किती तरी गोळ्या लोकांनी घ्या म्हणून जाहिराती सांगत होत्या.
मग प्रोटीन्स,suppliment ह्यांचा मारा लोकांवर केला गेला.
तेव्हा तुमच्या शरीराची कशी वाट लागत आहे ह्या विषयी लोकांना जागरूक करणे टाळले गेले.
आता लोक स्वतः च डॉक्टर झाले आहेत.

करोना साठी आरोग्य सेतू ऐप आहे,

पण मला लक्षणे दिसल्यावर त्यांच्या कॉल सेंटरला फोन केला तर तो बोलला तुम्ही डॉकटर च आहात तर तुम्हीच ठरवा

बाकी लोकांना काय उत्तरे देतात माहीत नाही

कोरोना झाला असेल व सिंम्प्टम्स जास्त नसतील तर सरकारीमध्ये भरती व्हावे .त्रास जास्त असेल,ज्येष्ठ नागरीक असेल तर खासगी रुग्णालयाचा विचार करावा.
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच उपाय आहे सध्यातरी.

सौंम्य लक्षणे असतील, किंवा लक्षणे नसतील , इतर धोका नसेल आणि घरी आयसोलेशन शक्य असेल तर घरीच राहाणं शक्य आहे
असा सल्ला दिल्ली राज्य सरकारने दिला आहे.

What is Delhi’s home isolation policy right now?

Once an individual tests positive, a medical professional makes an assessment of the symptoms. If the patient is asymptomatic, or has mild symptoms such as fever, and if the patient is not above 50 years of age or has co-morbid conditions, they are recommended home isolation with strict instructions to not interact with others.
Such home isolation is possible only if the house had a room with an attached toilet. Patients are called every day and asked to report symptoms. If symptoms start to worsen, they are moved out to hospital
अशा रुग्णांना त्यांची ॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉ
Oxygen level नियमितपणे तपासायला उपकरणही दिलं जातं

जाहिराती च्या माऱ्यानी लोकांच्या आहाराच्या सवयी बदललेल्या.
शुद्ध भारतीय पोष्टीक आणि सर्व सत्व शरीराला मिळणारा आहार कित्तेक लोकांच्या जेवणातून हद्द पार झाला.
मॅगी आली,नुडल्स आले,पिझ्झा आला, बर्गर आले,विविध चिप्स आले,असंख्य प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ रोजच्या जीवनात आले.
त्याच पाठोपाठ, कॉल्ड ड्रिंक आले चहा ल पर्याय म्हणून कोल्ड ड्रिंक पाहुण्यांना दिले जावू लागले.
डाळी,कड धान्य,भाज्या ,ज्वारी,बाजरी खाणे म्हणजे गावंढळ पना असा समज पसरला.
मॉडर्न दाखवण्याचा नादात नको तो आहार आपण घेवू लागलो.
कशी वाढणार प्रतिकार शक्ती.
रोज व्यायाम तर कधीच बंद झाला मोबाईल,वर मैदानी खेळ खेळले जावू लागले.
आता प्रतिकार शक्ती असेल तरच corona cha kami tras होईल हे माहीत पडले पण इन्स्टंट प्रतिकार शक्ती वाढवण्ासाठी जादू ची कांडी नाही आपल्या कडे.
अशी पण लोक बघितली आहेत कसे ही वागा औषध आहेत असा विचार करतात.आणि कसे ही वागतात.

Oxygen level नियमितपणे तपासायला उपकरणही दिलं जातं.
हे उपकरण मी वापरले आहे.
त्याचे रीडिंग चुकू शकतात.
ते अनेक घटकावर अवलंबून असते असे वाचले आहे.

घटना मुंबईतील आहे.
ओळखीच्या एका घरातल्या दोन व्यक्तींना कोरोना पॉझीटिव्ह रिझल्ट आले. एक तरुण (वव. ३५ च्या पुढे) व एक वयस्कर (वव ६७ च्या पुढे).
वयस्कर व्यक्ती बरी झाली व तरुण व्यक्ती कोरोनाने गेल्याचे सांगुन मृतदेह नाकारण्यात आला. थोडी शंका आल्याने हितचिंतक असे डॉक्टर व एक पोलीसाला घेवुन सदरहु रुग्णालयात (खुप कटकट/बाचाबाची होवुन) भेट घेवुन मृतदेहाची तपासणी केली असता काही अवयव गायब असल्याचे निदर्शनास आले. खुप हंगामे झाले तेव्हापासुन ते रुग्णालय बंद आहे.
हेतु सभ्य व निर्मळ असल्यास बाकीची महिती पुरवण्यात येईल.(हेतुबद्दल ठरवणार मीच.....)

जागतिक आरोग्य संघटना सुद्धा राजकारण पासून लांब नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने इतक्या कोलांट्या udya मारल्या आहेत की अमेरिकी नी त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे .
व्हायरस ला चीन च्या वूहांग प्रांताचे नाव न देता covid 19 नाव देणे येथून suravat aahe.
प्रतेक देशांनी जागतिक संघटनेवर अवलंबून न राहता स्वतःची कायम स्वरुपी यंत्रणा बनवावी.
जागतिक बँक,जागतिक आरोग्य संघटना,जागतिक व्यापार संघटना,आणि बाकीच्या जागतिक लेवल च्या संघटना ह्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नक्की च नाहीत.

मृतदेहाची तपासणी केली असता काही अवयव गायब असल्याचे निदर्शनास आले.
>>>>
अशी एक पोस्ट व्हॉटसपवरही आलेली. पण डिटेल काहीच नाही. अर्थात मी कोणाला फॉर्वर्ड केली नाही.

जेम्स यांचा अनुभव धक्कादायक आहे. किती आणि कोणत्या बाततीत लुटालूट चालू आहे त्याचा आपण विचारही करु शकत नाही. ती व्यक्ती कोरोनानेच गेली याचेही काही ठोस पुरावे कोणी देणार नाही आणि सर्व सामान्य माणसाला त्यातले काही कळणारही नाही.
WHO च्या बाबतीतही चीड येईल अशी पलटी मारणारी विधाने केली जात आहेत. आता काय तर म्हणे तो हवेतूनही पसरतोय. कधी एकदाची लस निघतेय आणि हे सर्व संपतेय असे झालेय.

मृतदेहाची तपासणी केली असता काही अवयव गायब असल्याचे निदर्शनास आले.

अवयव गायब असल्याचे कसे समजले ? अवयव दान करताना अंतर्गत अवयव वापरतात, बाहेरचे अवयव म्हणजे हात , पाय असे कुणी तोडून दुसऱ्याला वापरत नाही.

अवयव काढणे म्हणजे पेरू तोडणे नव्हे

अवयव काढायला किमान पाच सर्जन ची टीम असते , शिवाय इतर अनुभवी स्टाफ असतो. अगदी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर लागते.
शिवाय काढलेला अवयव दुसऱ्या पेशन्ट ला लगेच बसवावा लागतो, विविध अवयव 1 ते 6 तासच जगू शकतात , म्हणजे ती सर्जरीही त्याच किंवा जवळच्या हॉस्पिटलात करावी लागते , त्यालाही तशीच दुसरी टीम लागते. दुसरी सर्जरी दुसऱ्या हॉस्पिटलात असेल तर अवयव नेणाऱ्या गाडीला स्पेशल अरेंजमेंट करावी लागते, ट्रॅफिक पोलीस वेळ प्रसंगी ट्रॅफिक डायव्हर्ट करून रोड मोकळा राहील ह्याची दक्षता घेतात. असा स्पेशल रस्ता राखून ठेवला तर त्याला ग्रीन कॉरिडॉर म्हणतात

शिवाय अवयव मॅच होतो का हे बघायला आधी ढीगभर तपासण्या करतात , रादर , या तपासण्याच आधी करतात व मग कुणाचे काय कुणाला बसवायचे याचा निर्णय घेता येतो, अचानक इथला काढुन तिकडे बसवायला तो काय विजेचा बल्ब नव्हे,

अति मोठ्या अत्याधुनिक हॉस्पिटलात असे प्रकार होऊ शकतात , पण कोविड सेंटर मिळेल त्या मोठ्या हॉल मध्ये वगैरे सुरू आहेत , बहुतेकदा तिथे ऑपरेशन थिएटरच नसते. साधे जनरल डॉकटर असतात, ते 2-4 टाके घालणे , टाके काढणे, नाकात नळी घालणे , लघवीचा केथेटर घालणे इतके करू शकतात, फारफार तर तोंडा घशात इमर्जन्सीला ट्यूब घालणे हे काही अनुभवी लोकच करू शकतात, इतकीच त्यांची केपीसीटी असते.

पेशन्टला पाणी , टॉयलेट हेही स्वछ मिळेल का ह्याची शाशवती नसते.

तिथे इतकी किचकट सर्जरी कोण , कुठे , कशी करणार ?

एक व्हॅटसपवर व्हिडीओ फिरत आहे, पण तो बोगस आहे

A video showing a heated debate between residents of a village in Manori- a hamlet off the Mumbai mainland- is being shared on WhatsApp with a false claim that the video shows residents confronting civic officials after an organ harvesting racket was busted.

https://www.boomlive.in/fake-news/video-of-crowd-protesting-institutiona...

फार मोठे रॅकेट असेल तरच शक्य आहे, उदा . हिरानंदानी प्रकरण

https://www.asianage.com/mumbai/green-corridor-organ-donation-922

आता काय तर म्हणे तो हवेतूनही पसरतोय. कधी एकदाची लस निघतेय आणि हे सर्व संपतेय असे झालेय.
आताच जे औषध वापरतात उपचार करताना त्या औषधाच्या एका dosachi किंमत 30 हजार रुपये आहे.
लस निर्माण झाली तरी त्या लसी ची किंमत किती प्रचंड असेल ह्याचा विचार येतो.
सामान्य लोकांना ती परवडेल का की मरण स्वस्त वाटेल लसी च्या किमती समोर.
ते दिवस गेले ज्यांनी फक्त समाज हित लक्षात घेवून प्लेग, देवी सारख्या अनेक लसी निर्माण केल्या.
आता तसे घडणार नाही आता समाज हितापेक्षा स्वहित सर्वच घटक बघणार.

मला अणि माझ्या नवऱ्याची covid टेस्ट पॉजिटिव आली होती. जास्त लक्षणे नाही आली. आता उदया होम कारण्टीन संपेल. आज उदया मधे सविस्तर लिहण्याचा विचार आहे माझा. पण एकच सांगेन की घाबरू नका. आणि जेष्ठ नागरिक अणि छोट्या मुलांची काळजी घ्या

मी_परी, नक्की लिहा. असे अनुभव लिहीणे गरजेचे आहे. अन्यथा what's app / other social media इथल्या अतिरंजित गोष्टीच सर्वत्र पसरत जातात.
तुम्हाला शुभेच्छा. .

मी_परी,
हो नक्की, लिहा. सविस्तर लिहिणार असाल तर स्वतंत्र धागाच काढा. जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.

जेम्स बॉंड , सदस्यनाम बदला. तुमच्या प्रतिसादांना साजेसे काहीतरी घ्या.

हो सर लक्ष असुद्या. फार अपेक्षा नाहीत तुमच्याकडुन. ज्याची त्याची समज आणी ज्याची त्याची....
*** काही लोकांना तो पर्यंत विश्वास बसत नाही, की ते विहीरीच्या काठावर बसलेत, जो पर्यंत ते स्वतः विहीरीत पडत नाहीत.

बाकीच्यांसाठी हा व्हाट्सप फॉर्वर्ड नाही याची नोंद घ्यावी.

Pages