कोरोना झाल्यावर काय करावे या अ‍ॅक्शन प्लानचा कधी विचारच केला नाही..

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 July, 2020 - 12:16

आमच्या समोरच्या घरात राहणार्‍या कुटुंबातील चारपैकी तीन जणांना कोरोना झाला.
नुकतीच बातमी कानावर आदळली. आणि जाणवले कोरोना चार फूटांवर आला.

अगदी चार दिवसांपूर्वीच मी स्वत:ला आणि स्वतःच्या कुटुंबाला फार सुरक्षित समजत होतो.
अर्थात कारणही तसेच होते. या कोरोनाकाळात आमच्या कॉलनीत वा शेजारच्या पाजारच्या कॉलनीत जिथवर मी जीवनावशयक वस्तू घ्यायला जात आहे, तिथवर कोणालाही कोरोना झाल्याची बातमी आजवर आली नव्हती. याच कारणासाठी फुकटचे घरभाडे जात असूनही घर बदलायचीही घाई करत नव्हतो.

पण कोरोना अचानक अगदी दारात उभा राहिला. ते ही ईतक्या जवळ आणि ईतक्या लवकर की दारात उभा असलेला कोरोना आता कधीही घरात येईल अशी स्थिती बघता बघता कधी झाली समजलेही नाही.

आजवर ईतरांसाठीच प्रार्थना करत होतो आता ती वेळ आपल्यावरही येऊ शकते हे जाणवले,
आणि सोबत आणखी एक गोष्ट जाणवली की उद्या शिरलाच घरात कोरोना तर काय करावे याबाबत आपल्याला जुजबीच माहिती आहे. कुटुंबातील एक वा अनेक व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह झाल्यास नेमके काय करावे, हे स्टेप बाय स्टेप माहीतच नाही.

सरकारी ईस्पितळात भरती व्हायचे की प्रायव्हेट शोधायचे, तिथे खर्च किती येतो, मला झाला तर मी सरकरीत जाईन, पोरांना झाला तर त्यांना चांगले हॉस्पिटल बघू, पण पोरांची काळजी कोण घेते तिथे, जवळचे सरकारी वा प्रायव्हेट चांगले कोरोना हॉस्पिटल कुठले, त्यांना अ‍ॅप्रोच कसा करायचा... एक ना दहा शंका आणि चिंता, कित्येकाची उत्तरे नाहीत. कदाचित आसपासच शोधली तर मिळतीलही पण आजवर फक्त कोरोनापासून वाचावे कसे याचीच माहीती घेत होतो. पण वाचू शकलो नाही आणि झालाच कोरोना तर कुठे धावपळ करायचे याचा स्वत:कडे प्लानच नाही. जणू सरकारच आपल्याला मार्गदर्शन करणार या हिशोबातच होतो. किंवा कोरोनासंदर्भात जास्त बातम्या वा माहिती गोळा केले तर उगाच टेंशन येईल या विचाराने ते टाळत होतो.

पण आता हळूहळू नव्हे लगेचच कोरोना झाल्यावर पुढे काय याची शक्य तितकी माहिती घ्यायला सुरू करत आहे. त्याचसोबत समोरच्या घरात आलेला कोरोना चार पावले चालून आपल्या घरात येऊ नये यासाठीही काय करता येईल याचा विचार चालू आहे. एक घरातल्या घरात तात्काळ मिटींगही झाली. आणि दुसरा आता हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या विषयात अनेकांना स्वारस्य असु शकेल. कोणी माहिती दिली तर चांगले होईल. अनेक व्हॉट्स app संदेश अनेक प्रकारे माहिती पुरवीत आहेत पण कोणाचा कोणाला मेळ नाही. प्रत्येक टप्प्यावर काय करावे ही माहिती इथे मिळाली तर उपयुक्त ठरेल.
सिरीयस प्रतिसाद दिला आहे. आता धागा कसे वळण घेतो हे पाहणे मजेचे असेल.

तुम्ही सोसायटीत राहता का? सोसायटीतील डॅाक्टरांच्या साह्याने सोसायटी पातळीवर action plan ठरवता येईल. काहीही problematic वाटलं तर पहिल्यांदा family doctor नां संपर्क करायचा.तसेच त्या कुटूंबाला आता भावनिक /ऐहिक पातळीवर काही मदतीची आवश्यकता असेल.

माझ्या सख्ख्या मावशीला गेल्या महिन्यात कोरोना झाला होता. वय ५७ आणि सध्या पूर्णपणे कोरोनामुक्त. तीच्याकडून मिळालेली थोडीफार माहिती- त्यांनी खाजगी रूग्णालयातूनच संपूर्ण ट्रिटमेंट घेतली. चाचणीचे ४५००/- आणि १० दिवस हाॅस्पिटलमधील स्टेचे ४०,०००/- झाले होते.
काळजी घ्या.

लहान मुलांना अजिबात बाहेर जाऊ देऊ नका
तुम्हीही शक्य तितके घरीच रहा
घरच्या घरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा
जसे की तुळस खाणे, सी व्हिटॅमिन इ
पण कुठल्याही अचाट दाव्यांना भुलू नका

Corona झाल्यावर आपण काहीच करायचे नसते जे काही करायचे ते डॉक्टर आणि आपली जवळ ची माणसं करतात.
जे शांत डोक्याचे आहेत ते शांत पने निर्णय घेतात तर काही corona che nav ऐकल्या बरोबर घाबरून जातात .
खासगी हॉस्पिटल मध्ये 70000 ते 150000 लाख पर्यंत कमीत कमी बिल होते आणि जास्तीत जास्त 6 लाख पर्यंत.
Corona Jhala tar त्याचे symptron वेगळे असतात.
काहींना खूप त्रास होतो तर काही ना बिलकुल त्रास होत नाही फक्त positive report aahe म्हणून आजारी अशी अवस्था असते.

चांगला धागा ऋन्मेष !!
माझ्या भावाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक केस निघाली . आता शक्यतो लिफ्ट ऐवजी मी पायऱ्याने जा सांगितले. (फक्त दूध व पाणी आणायला ) . अत्यावश्यक असल्याशिवाय बाहेर जायचे नाही, मास्क घालून बाहेर पडायचे आल्यावर तडक स्नानाला जायचे(मुलांना जवळ घ्यायचे नाही) व बाहेरचे कपडे पुन्हा घालायचे नाही. हात धुणे आलेच यात. आपणही quarantine व तेही quarantine म्हणून कुणालाही भेट द्यायची/घ्यायची नाही. It defeats the whole purpose. कमीत कमी फेऱ्या करायच्या बाहेर.
Avoid chemist shop as much as possible.
आमच्या दुरच्या नात्यातले एक जण बाळासाठी tonic आणायला गेले आणि करोना घेऊन आले. ते पूर्ण बरे झाले पण पाच लाखावर खर्च झाला. आणि त्यांच्या सासऱ्यांना लागण होऊन सासरे तडकाफडकी गेले. Sad
तुमच्या family doc ला विचारून बघू शकतोस. ते काय सांगतात. शिवाय मुलांना झाला तर आई किंवा बाबापैकी एक जण इथे allow करतात hospital मध्ये. आपल्याकडे मात्र उलटसुलट ऐकलं आहे. माझ्यासाठी हे नाइटमेअर होते पण जेव्हा कळले की एका पालकाला राहू देतात मन थोडे शांत झाले.
तुझ्या कुटुंबाला, बाळांना सुरक्षित व निरोगी रहाण्यासाठी शुभेच्छा. या धाग्याचा पुष्कळ जणांना उपयोग होईल.

प्रभूदेसाई लिंकबद्दल धन्यवाद. वाचला आपण दिलेला धागा आणि तो अनुभव, पण तिथेच खाली प्रतिसादात अलेला प्रश्न मलाही पडला,
ज्यांची कुठल्याही हॉस्पिटलमधे ओळख नाही, जे स्वत: डॉक्टर नाहीत, अशांना सद्य परिस्थितीत दीनानाथ सारख्या हॉस्पिटलमधे सहज प्रवेश मिळतो का ?
यात कुठलीही असूया नाही, पण याचमुळे हे रिलेट झाले नाही. माझ्यासारख्या कॉमन पब्लिकला तो अनुभव काही कामाचा नाही असे वाटले. गैरसमज नसावा.

तसेच त्या कुटूंबाला आता भावनिक /ऐहिक पातळीवर काही मदतीची आवश्यकता असेल.
>>>
@ मोहिनी, तसे ते गृहस्थ उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आहेत, त्यांच्या ओळखी पाहता त्या संबंधित मदत तेच पुढे मागे आम्हाला करू शकतील. पण भावनिक येस्स, आमच्या घरीही यावर चर्चा झाली की बायकापोरे अ‍ॅडमिट असताना त्यांची मनस्थिती कशी असेल आणि त्यावर आम्ही काय करू शकतो.. आम्हीच असे नाही, तर सोसायटी मिळून.

त्यांनी खाजगी रूग्णालयातूनच संपूर्ण ट्रिटमेंट घेतली. चाचणीचे ४५००/- आणि १० दिवस हाॅस्पिटलमधील स्टेचे ४०,०००/- झाले होते.
>>
@ म्हाळसा, धन्यवाद.
सगळीकडे दिड लाखापासून सुरू होणारे आकडे ऐकत होतो. त्यामुळे हि पोस्ट फार सकारात्मक वाटली.
आपल्याला गरज पडल्यास उपचाराच्या बजेटवरही आज आमच्याकडे चर्चा झाली. जीव सर्वात जास्त मोलाचा हेच फायनल झाले.

ऑफिसची मेडीक्लेम पॉलिसी या कोरोनासाठी लागू होईल का हे आता चेक करायचेय.
नुकतीच रिन्यू झाली. बहुधा कंपनीने क्लॉज टाकून कोरोना यातून नक्कीच वगळला असेल.
कोणाला याचा काही अनुभव, आयड्या?

इतरांचे पोस्ट्स वाचून मलाही हे आकडे कमीच वाटलेत. माझ्या नातेवाईकांनी कोरोनाची ट्रिटमेंट जोगेश्वरीतल्या बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा हाॅस्पिटलमधून घेतली होती. आधीच्या पोस्टमधे ही माहिती द्यायला विसरले.

आशूचॅम्प, धन्यवाद
तुळशीची पाने तर गेले तीन महिने रोज दोन खातोय.
बाकी पोरांचेच वाईट वाटतेय. अडीच महिने ऊंबरठाही न ओलांडल्यानंतर गेल्या जूनपासून रोज संध्याकाळी टेरेसवर मोकळ्या हवेत नेत होतो. आज अचानक हे कानावर आले तेव्हा हेच डोक्यात आले की अरे आता टेरेसही बंद पोरांचे Sad

अस्मिता, धन्यवाद
मुलांना झाला तर काय हा विचार आम्हा दोघांच्याही डोक्यात पुन्हा पुन्हा येत होता. होपफुली राहू देत असावेत एका पालकाला सोबत अन्यथा शक्यच नाही. आपल्यावर तशीच वेळ आली तर कोणी आपला जीव धोक्यात घालून सोबत राहायचे, कोणाची प्रतिकारशक्ती चांगली आहे, पोरांना तेव्हा कोणाची जास्त गरज जास्त आधार वाटेल याचाही आज विचार केला. पण जास्त ताणला नाही.

हे सारे विचार काही टेंशन घेऊन करत नाहीये. घरचे सारे रिलॅक्सच आहेत. अगदी झाला तर झाला. त्यात काय एवढे असाच अ‍ॅटीट्यूड आहे सर्वांचा. पण सध्या सिस्टमवरच एवढा ताण आहे की आपण कोणाच्या भरवश्याने राहू शकत नाही. सगळे बॅकअप प्लान डोक्यात हवे असा प्रॅक्टीकल विचार आहे. अन्यथा उद्या रोग परवडला पण ईलाज नको ही म्हण शब्दशा जगायची वेळ आपल्यावर येऊ नये.

@ म्हाळसा, माहितीबद्दल धन्यवाद

www.facebook.com/khareyog/videos/3495050297172785/?flite=scwspnss&exitid...
Submitted by रेव्यु on 17 July, 2020 - 22:17
>>>>>

उपयुक्त वाटला.
आज वडिलांना फोन केला हे कळवायला तेव्हा ते हेच म्हणाले की काही दिसलीच लक्षणे तर लगेच पॅनिक होऊ नका. घरच्या उपचारानेही होऊ शकते बरे.
फक्त प्रश्न असा पडला की घरीच राहायचे हा निर्णय आपणच घेणे योग्य आहे का? आपल्याच नाही तर शेजारीपाजारी सोसायटीच्या दृष्टीनेही..

करोना झालेल्या बहुतेक लोकाना हॉस्पिटल मधल्या उपचाराची गरज नसते. मात्र आयसोलशन ची गरज असते. न्युयार्क स्टेट वर करोना पिक मध्ये होता तेव्हा ८०% लोक घरीच उपचार घेत होते तर ओहायो स्टेट मध्ये हेच प्रमाण ७३% होते. मात्र शरिरात ऑक्सीजन चे प्रमाण कमी झाले किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वेटिलेटर ची गरज लागते आणि त्यावेळी हॉस्पिटल जावे लागते. करोना बरोबर दुसरे आजार असतिल तर हॉस्पिहॉस्मध्ये अ‍ॅडमिट होण्याची शक्यता वाढते.

पि-ची, पुण्यात आमच्या सोसायटी मध्ये सुरवातीला आठवड्याला १ असे करत तिन आठवड्यापुर्वी आठवड्याला २ ते ३ केस निघायला लागल्या. सुरवातिला सगळ्याना हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट करत होते . मधल्या काळात जे असिम्प्टोमेटिक आहेत त्याना घरी आयशोलेशन साठी पाठवण्यात येत होते. नंतर हॉस्पिटल फुल झाल्यावर मुन्सिपालटीच्या सल्ल्याने क्लब. हाउस ला आयशोलेशन सेंटर बनवले. त्यात असिम्प्टोमेटिक आणि माईल्ड सिम्टम असलेल्या रुग्णाना ठेवण्यात आले. मुन्सिपालटीच्या च्या नर्स /डॉक्टरने काय झाले तर ताबडतोब हॉस्पिटल मध्ये यायचे ह्या बद्दल करोना झालेल्या लोकाना रिपोर्ट देताना माहिती दिली जात होती. ह्या आयशोलेशन सेंटर मध्ये राहुन ५ जण बरे झाले. मागच्या ५-६ दिवसापासुन एकही केस निघाली नाही.
क्लब हाउस माणशी प्रतीदीन ५०० रु चार्ज करते. हे पैसे सेनिटायझेशन, सफाई कर्मचारी लोकाकरता PPE kit त्याचे पगार , विजबिल ई साठी आकारले जातात. कमी खर्च झाला तर उरलेले पैसे परत मिळातिल. २ दिवसापासुन ह्या सेंटर मध्ये कोणीही नाही. हे सेंटर फक्त सोसाइटी रहिवास्याकरिता आहे.

आमची , समोरची आणि बाजुची सोसायटी मिळुन २०+ बिल्डीग्स आहेत त्यात सोसाइटी कमिटी मेंबर ना माहित असलेल्या १५ जणाना करोना झाला होता , ७८ वयाची एक महिला करोना चाचणी रिपोर्ट पॉज़ीटिव आल्यावर ४८ तासात दगावली. ह्या महिलेला वय जास्त असल्याने थेट हॉस्पिटल मध्ये नेले होते. दोघे जण दुसरीकडे निघुन गेले त्यामुळे त्याचाबद्दल माहित नाही . बाकी सगळे बरे झाले.

सुचना: एखाद्याला हॉस्पिटल ची गरज आहे ही की नाही हे ह्या माहितीवरुन ठरवले जाउ नये. त्यासाठी डॉक्टराचा सल्ला घ्यावा.

National Insurance (सरकारी कंपनी ) चे कोविड प्लॅन उपलब्ध आहेत त्यात पॉलिसी घेतल्यावर पहिल्या १५ दिवसात काही मिळत नाहीत. नंतर ३,६,९ महिने आणि ५० हजार ते ५ लाखा पर्यन्त स्वतः आणि फॅमिली साठी पॉलिसी आहे. कालावधी आणि कव्हरेज प्रमाणे प्रिमियम वाढत जाते. आयकरात 80D नुसार सवलत आहे.

ऋन्मेऽऽष
आपण म्हणता ते खर आहे.
सुरवातीला अशी बातमी होती कि पुण्याच्या एका कंपनीने टेस्ट किट बनवले आहे. त्याने १२०० रुपयांत टेस्ट होऊ शकते. त्याचे काय झाले ? तसेच चीन कडून आयात केलेले किट ५०० - ६०० रुपयांत टेस्ट करत होते. त्याला सर्वांनी बदनाम केले , पण ४५०० रुपयांचा हट्ट सुटत नाही. मुख्य प्रश्न - मला वाटते - कि व्हेन्टी्लेटरचा असावा. सरकार काही दिवस विमाने , रणगाडे, बोटी ह्यांची आयात थांबवून व्हेन्टी्लेटर का आयात करत नाहीत ? मध्ये एका कारखानदाराने जाहीर केले होते कि आम्ही आता दररोज फलाणा ढिकाणा व्हेन्टी्लेटर बनवायला सुरवात केली आहे
ते जाउदे . एका व्हेन्टी्लेटरची काय किंमत असते? आवाक्यांंत असेल तर एक वैयक्तिक घेऊन टाकावा, होऊ दे खर्चा !!! आपल्याला नाही तर अजून कुणाच्या कामाला येईल .

<<<चांगला धागा

खूप सारे प्रश्न मलाही पडलेत. घरी ज्ये ना असल्याने काळजीही वाटते.

मध्यंतरी एका कोरोना रुग्णाचे खाजगी हॉस्पिटलचे बिल कायप्पावर फिरत होते 22 की 25 लाखाचे. तेव्हा सगळीकडे चर्चा होती की खाजगी इस्पितळात जाऊच नये, मग रुग्णाला तो अधिकार आहे का? की जिकडे पाठविणार तिकडे जावे लागते. आणि मुख्य म्हणजे सरकारी दवाखान्यात नीट काळजी, स्वच्छता असेल काय?

हल्ली बऱ्याच जणांचे मेडिकल इन्शुरन्स असतो, पण जर इतके भरमसाठ बिल येणार असेल अन कुटुंबातील जास्त सदस्य पोसिटीव्ह आले तर तेही पुरणार नाहीत.

तसेच, कोरोना रुग्ण किंवा संशयिताला घेऊन जातात तेव्हा त्याने सोबत काय काय अन साधारण किती दिवसाचे सामान घ्यावे.

Submitted by VB on 26 June, 2020 - 10:27
>>>. हा प्रश्न मी मामी यांच्या धाग्यावर विचारला होता, पण तो धागा चांगला असूनही तिकडे जास्त प्रतिसाद नाहीत,

सो माझ्या वरील शंकांचे कोणी निरासन करेल तर बरे.

या आठवड्यात आमच्या विंग मध्ये दोन कुटुंबे पॉसिटीव्ह आलेत. त्यातील एकाने तर त्याच्या बेजबाबदार पणामुळे आपले कुटुंब अन इतरांना हा त्रास दिलाय, कितीही सांगितले तरी हा मास्क न लावता अगदी त्याच्या लहान मुलांना घेऊन फिरत होता, त्यामुळे त्याच्यासोबत त्याच्या मेव्हणा ची एक वर्षाची मुलगी कोव्हीड पॉसिटीव्ह झाली Angry

चांगला धागा. माहितीतले दोघेजण कोविड टेस्ट positive आली हे कळल्यानंतर हार्ट attack ने गेले. वय वर्ष फक्त 24 आणि 34. देव करो आणि लवकर vaccine मिळो.

बापरे ट्युलीप. खूपच दु:खद बातमी.
चांगला धागा.
प्रभुदेसाई, दोनेक महिन्यापुर्वी कोणत्यातरी डॉक्टरच्या व्हिडियोमधे ऐकल्याचे आठवते की वेंटीलेटर चालवणे सोपे नसते. त्याला एक उत्तम जाणकारच असावा लागतो जो २४ तास त्यावर लक्ष ठेवतो. त्याला जास्तीतजास्त २च यंत्रावर लक्ष ठेवता येते. त्यात सारखी अ‍ॅड्जस्टमेंट करावी लागते. आणि असे लोक जास्त उपलब्ध नाहीत. त्यामुळे नुसतीच व्हेंटीलेटरची संख्या वाढवुन उपयोग नाही ते हाताळणारे नसतील तर (डॉक्टरांनी या माहितीची शहानिशा करावी).

माहितीतले दोघेजण कोविड टेस्ट positive आली हे कळल्यानंतर हार्ट attack ने गेले. वय वर्ष फक्त 24 आणि 34.
>>>>>>
हे फार दुर्दैवी आहे.

मी काल वडिलांना फोन केला तेव्हा एक किस्सा कळला. ते सध्या मुंबईला आपल्या मित्रमंडळींच्या सोसायटीत घर भाड्याने घेऊन राहतात. ती सोसायटी डेव्हलपमेंटची आहे. त्यामुळे तिथले कल्चर जुन्या चाळींसारखेच एकमेकांत मिसळण्याचे आहे. तिथल्या एका कुटुंबाला कोरोना झाला तसे बीएमसीची माणसे आली आणि त्यांनी शेजारच्या चार घरातल्या लोकांनाही होम क्वारंटाईन केले. हातावर स्टॅम्प मारायला सुरुवात केली तसे लोकांनी घाबरून एकच गोंधळ सुरू केला. लोकं दारच उघडायला तयार नव्हती. मोठे घाबरले तसे लहान मुलांनीही रडारड सुरू केली..

सर्व सामान्य लोकांनी एकमेकांना आधार द्यावा.
घाबरून जावू नये ,एक मेकांना मदत करावी.
त्यांना वाळीत taku नये.
वेळ कोणावर पण येवू शकते.

सुनिधी
मी ते जे लिहिले होते त्याचा उद्देश थोडा निराळा होता.
मी वेंटीलेटरवरचे काही रोगी बघितले आहेत. त्यांची कोण कशी काळजी घेते ते पण पाहिले आहे. एक सांगतो नर्सबाई डॉक्टर पेक्षा जास्त महत्वाच्या. वार्ड मधले डॉक्टर तद्दन शिकाऊ डॉक्टर असतात . मोठे डॉक्टर केव्हातरी पांच मिनिटे येऊन चक्कर मारून जातात. डॉक्टरांंच्या खूप "दुर्दैवी गोष्टी" मला माहित आहेत, ते जाउद्यात. ही लिंक पहा ,टेन्शन थोडे कमी व्हायला मदत होईल.
https://medium.com/@vernunftundrichtigkeit/coronavirus-why-everyone-was-...

मला एक whatsapp मेसेज आला होता इंग्लिशमध्ये,scary but true ह्या नावानी,तो इथे पाठवू का?खरंच व्यावहारिक आहे.माझ्या जवळच्या ओळखीत खूप डॉक्टर्स आहेत,परिस्थिती गंभीर आहेच पण जे मनानी खंबीर आहेत तेच बाहेर येऊ शकतात,अर्थातच co morbidity हा issue आहेच.सोपं नाहीये पण खंबीर राहणं हाच एक उपाय आहे.मला आलेला हा मेसेज एप्रिलमधला आहे त्यामुळे कदाचित थोडा बदल झाला असेल काही पद्धतींमध्ये..

मला एक whatsapp मेसेज आला होता इंग्लिशमध्ये,scary but true ह्या नावानी,तो इथे पाठवू का?खरंच व्यावहारिक आहे.माझ्या जवळच्या ओळखीत खूप डॉक्टर्स आहेत,परिस्थिती गंभीर आहेच पण जे मनानी खंबीर आहेत तेच बाहेर येऊ शकतात,अर्थातच co morbidity हा issue आहेच.सोपं नाहीये पण खंबीर राहणं हाच एक उपाय आहे.मला आलेला हा मेसेज एप्रिलमधला आहे त्यामुळे कदाचित थोडा बदल झाला असेल काही पद्धतींमध्ये..

ज्येष्ठागौरी, धाग्याशी संबंधित असेल तर जरूर टाका. कोणाला काय माहितीचा कसा फायदा होईल सांगता येत नाही..
एप्रिलचा आहे हे नमूद केलेच आहे. कोरोनासंदर्भातील सारेच तपशील वेगाने बदलत आहेत. त्यातले काय तेव्हा होते आणि आता आहे हे सुद्धा पडताळता येईल.

.

~SCARY BUT TRUE~

Now that lockdown is easing out, there is a greater chance of virus infection, especially from asymptomatic cases.

*One has to be positive but being a Soldier, ready for the Worst*

Please do not waste time on what Modi or state govt is doing/ not doing.

*Start thinking about your own family.*

*In case any one of us gets infected by coronavirus. Then What?*

Ever thought of that?

*Before going for test, put all your valuables in the locker or in safe hidden place. Whole house will be fumigated and sealed.*

Your wife, children and parents too will be taken to Isolation ward. You may not ever meet some or all of them again. They or we may die.

Situation is still tougher if you are only husband wife living with kids abroad/ away.

*Case 1 : Only you get admitted to COVID isolation ward.*

1) What to take with you? Lets make a list.
Mobile, Charger, earphones, Routine medicines, Change of clothes for 14 days!

2) Will you need cash? Card? Make provision.

3) Mediclaim Insurance policy - Keep handy.
Govt. has included Covid19 in insurance for all.

4). How will the home run without you? Keep provision. Sign a few blank cheques as well. Share your ATM Pin with your wife/ family senior.

5) Do you have a pet? arrange for its shelter with some PETA or friends in case your wife too has to be admitted.

*Case 2 :- You die due to covid-19 in Isolation centre. Your wife is alone now. Your body also is not handed to your kins and cremated/ burried directly. Your relatives do not meet your wife to console her for the fear of infection.*

1. Make her aware *Today*, of all the current financial conditions. Leave enough cash home.

2. Your children are away out of India and cannot come to their mother nor can they take her to them. This situation remains for next 6 months. Be prepared !

*Passwords*:- Share All your passwords, Keypad lock pattern or code everything in a note for them in case you die.
You will have a lots available if you do not die.

Mental strength building now is very very essential.

Request put your thoughts here.

*Case 3 :- Both of you die! ! Say for 3 months nobody is allowed to visit your house. After that your children are able to return. What will they do? Finances- Again Keep some signed blank cheques for them. They can at least transfer the money to their A/C if they return before 3 months.*
Nomination is the best practice but if not done then may not have time to do it now.

*Documents*- Make a list of Important Documents, Bank accounts, Bank Locker and their key location, Location of various keys- Cupboard keys, Car keys, in your home (people have a tendency to keep them in फालतू secret place)

House keys should be given to some friend for keeps sake.

We do take such precautions normally when we fly out. But we never imagine a situation where one may have to face things alone and without any help!

Please give a thought to above and suggest if u have any more suggestions !!हा फॉरवर्ड आहे. पण बऱ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.

Suggested treatment for suspected contact with covid 19 positive asa सध्या व्हॉटसअप वर एक मेसेज फिरतोय. त्यामध्ये hydroxychoroquine, shelcal, zinc, limcee , dolo650, cetrizen, zedex, Sedona ya tableta घेण्यासाठी सुचविल्या आहेत. कोणती गोळी कधी v कशासाठी घ्यावी हे सुद्धा लिहलेले आहे. पण हे सगळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशन शिवाय. तरीही ओळखीतल्या बऱ्याच जणांनी (ज्यांच्या बिल्डिंग मध्ये किंवा संपर्कात कोरोना पेशंट आलेला आहे) हा कोर्स सुरू केला आहे. डॉक्टरला विचारून घ्या सांगितले तर असेही यातील बरीच औषधे विना प्रिस्क्रीपशन घेतोच की असे सांगण्यात आले.
हे असे अलोपथी ची औषधे सोशल मीडियावर सुचविणे योग्य आहे का?
वरचा मेसेज भोंदू फॉरवर्ड मध्ये येईल का? की खरचं कोण्या डॉक्टर ने लिहलेले असावे.

Pages