स्वप्न

Submitted by अरविंद डोंगरे on 17 July, 2020 - 06:20

*_स्वप्न_*

पावसाच्या सरीत
भिजत असताना
एक आस मनी
जागी झाली।
या बेधुंद पावसात
long drive ला
जाताना तुझ्या सोबत
पावसाने साथ द्यावी।
पावसाच्या धारा
कोसळाव्या झराझरा,
त्या संगे येवो
सोसाट्याचा वारा।
झोंबे अंगा वारे
स्परसुनी कायाही थरथरे।
पावसाच्या सरीत भिजत
सजनी मिठीत सिरे।
त्या स्पर्शाने मनात
निर्मिले शहारे।
नाचे मनी मोर
पाहुनि तुझे सौंदर्य।
थांबुनी पाऊस
उजळावे आकाश।
काढुनी मान ढगातून
अवणीवरती रविकिरणे पसरावी
सोनेरी तेजामध्ये तूझी
काया ही चमकावी।
निसर्ग रम्य स्थळी
भेटलेल्या एकांतात,
तुझं भिजलेलं सौंदर्य
डोळ्यात साठवत बसावं
त्या romantic क्षणाला
तुझ्या सोबत जगावं।

Group content visibility: 
Public - accessible to all site users