आयुष्याची भागिदार

Submitted by रूपाली विशे - पाटील on 12 July, 2020 - 14:23

खिडकीतून धुवांधार कोसळणाऱ्या वर्षाधारांचा आनंद घेत असताना अचानक मनात विचार आला पावसाचा निखळ आनंद सगळ्या लोकांसाठी एक सारखाच असेल का? ज्यांच्या घराचे छप्पर गळके असेल त्यांना पाऊस खरचं आनंद देत असेल का? अश्या असंख्य प्रश्नांनी डोक्यात गर्दी केल्यावर कागदावर उतरली हि मनातील शब्दभावना...

आयुष्याची भागिदार

चार फुटके पत्रे
टाकती विटके कापड वर
अन् म्हणती कष्टकरी जन मला
मी असे त्यांचे घर...

चिंचोळी गल्ल्या अन्
असती तिथे अरुंद मार्ग
नसे मागमूस धुंद हवेचा
जेव्हा बळी चढला ना निसर्ग...

कधी जीवघेणे घडती तंटे
तर कधी ऊतू जाई प्रेमभाव
एकमेकां साहाय्य करूनी
जन ते दर्शवती सर्वधर्म समभाव...

बाजूच्या टोलेजंग इमारती मधला
गर्भश्रीमंत मला पाहूनी थुंकला
काय सांगावी कहाणी त्याच्या जीवनाची
जेव्हा बंद घरात भेटला त्याचा एकाकी सापळा...

नसेल श्रीमंती मजकडे
पर नसे मी एकाकी
सुखाची करिती सारे बेरिज
अन् दुःखाची होई वजाबाकी...

गरीब पामरं घेती श्वास अन् शोधिती
माझ्या उदरात आधार
हिणवले जरी झोपडपट्टी म्हणूनी मज
पर असे मी गरिबांच्या आयुष्याची भागिदार ...

सौ. रुपाली गणेश विशे
१२/०७/२०२०

Group content visibility: 
Use group defaults

छान.

आवडली. खूपच भेदक आहे.
>>>>काय सांगावी कहाणी त्याच्या जीवनाची
जेव्हा बंद घरात भेटला त्याचा एकाकी सापळा...>>>>>> बापरे.

छान लिहिली आहे ग.

- मला पाऊस म्हंटल की गुरु ठाकुरची ही कविता आठवते.
बहकीसी बारीशने फीर
यादोंकी गठरी खुलवाई,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

सगळे भाव कसे आपसूकच उमटतात.

धन्यवाद सिद्धी..
गुरु ठाकूर ची हि कविता नक्की वाचते.

अप्रतिम लिहिली आहे.... बरेच दिवसानंतर तुमचं लिखाण वाचायला मिळालं.... अगदी वास्तविक आणि हुबेहूब वर्णन मांडलं आहे... जेव्हा आम्ही वरळीला राहायचो तेव्हा अशीच परिस्थिती असायची

खर तर पाऊस आला कि मन उधान होऊनजाते
पण तुम्हाला काही वेगळेच सुचले
छान लिहिली आहे
मनापासून आवडली

स्तुत्य .पण अजुन खूप वाव आहे सुधारायला .इथे बेफिकिरजी, असु.निशिकांत,शशांक सारखे ग्रेट कवि आहेत .त्यांना वाचूनही खूप शिकायाला मिळते.

धन्यवाद डॉ. विक्रांतजी.. तुमच्या सुचनेचे मी नक्की पालन करेन आणि माझ्या लेखनात सुधारणा करण्याचे प्रयत्न करेन. खरतरं मायबोली वरिल सर्व मातब्बर लेखक आणि कवींच लेखन वाचूनच मी मायबोलीची सदस्य झाली आहे. पुन्हा एकदा आभार तुमचे.