दिल बेचारा

Submitted by प्रगल्भ on 9 July, 2020 - 14:52

अत्ताच कोणाचा तरी धागा वाचला सुशांतला श्रद्धांंजली म्हणून होता
सुशांत सिंह राजपूत च्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर

https://www.youtube.com/watch?v=GODAlxW5Pes

"दिल बेचार"
कोणीही शेअर केलेला पाहीला नव्हता माबो वर...म्हणलं आपणच करावं,,,

फ्री टू वॉच आहे बहुतेक वाचलय कुठे तरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अजून रिलीज नाही झालाय. 24 जुलै ला होणार आहे.
माझ्या कडून दोनदा पोस्ट झालयंं. एक कसं डिलीट करू?
एनी आयडिया?

ट्रेलर छान आहे.. सुशांतला ट्रेलर मध्ये पाहिल्यावर वाटत नाही की तो इतक्या टोकाच्या नैराश्यात होता.

ट्रेलर बघून हा चित्रपट फार रडवणार असे वाटते. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा लगेच बघणार. या लिंकबद्दल धन्यवाद.

ऋन्मेष दादा मला प्लीज सांगाल का दुसरी पोस्ट डीलिट कशी करू काल रात्री उशीरा झोपेत दोनदा पोस्ट झालीय हा! हा!हा!

बघितला ट्रेलर .
असे रडवणारे चित्रपट आवडत नाहीत . सो माझा पास Happy

"हा चित्रपट प्रदर्शित जरी आत्ता होत असला तरी याचं चित्रीकरण 2 वर्षांपूर्वी केलं गेलं आहे." ---> याचा अर्थ पिक्चर डब्य्यात पडला होता...पण सुशांतच्या मृत्यु नंतर .... त्याच्या मृत्यु ची सहानुभूती घेऊन रिलीज केलं जातय का?

याचा अर्थ पिक्चर डब्य्यात पडला होता...पण सुशांतच्या मृत्यु नंतर .... त्याच्या मृत्यु ची सहानुभूती घेऊन रिलीज केलं जातय का? >> नाही, त्याचं theatrical रिलीज मार्च मध्ये होणार होतं, पण लॉकडाऊन आला आणि त्यामुळे पुढे ढकललं होतं. पण हो, आता सुशांतच्या निधनानंतर त्याला तशीही खूप प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्या ट्रेलर ला तुफान लाईक्स मिळाले म्हणे. एखाद्या गोष्टीची किंमत ती नाहीशी झाल्यावरच का कळते कोण जाणे !