मोजू नकोस वर्षे

Submitted by द्वैत on 7 July, 2020 - 06:05

लग्नाच्या वाढदिवशी सुचलेल्या ह्या चार ओळी
मायबोलीवर टाकत आहे

मोजू नकोस वर्षे सरली कधी किती ते
हृदयात ठेव जपुनी क्षण मोजके प्रीतीचे
हळुवार त्या क्षणांचे होतील शुभ्र तारे
धाग्यातुनी स्मृतींच्या घे माळुनी तू सारे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, सुरेखच...
खूप, खूप शुभेच्छा...

खूप छान.. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हांला..

"धन्यवाद प्रगल्भ" --> थॅंक्स कसले त्यात, तुम्ही लिहीलच एवढंं भारी आहे. दोन तीन दिवसांपुर्वी एक प्रश्न विचारला होता कुणाच्या तरी लेखाच्या खाली सिरीअस डिस्कशन सुरू होतं.
किती लोकं कविता करत असतील स्वत:च्या बेटर हाफ वर
तुम्ही सापडलात इतक्या लगेच !! मन भरलं दादा !!